शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याची अखेर बाजार घसरणीने सकाळची री संध्याकाळी कायम सेन्सेक्स निफ्टी २६९.०३ व ६५.०९ अंशाने घसरला

मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अखेर घसरण तर बँक निर्देशांकातही मोठी घसरण आयटी समभागात वाढ

    21-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: बाजाराने सकाळची 'री' संध्याकाळी ओढली आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता गेले काही दिवस बाजारात रॅली झाली होती. मात्र आता पुन्हा प्राईज करेक्शन सुरू झाल्याची चिन्हे दिसत आहेत. पुन्हा निर्देशांक खाली घसरल्याने बाजारात आशियातील पडझडीचा फटका बसल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. सेन्सेक्स अखेर २६९.०३ अंशाने घसरला असून निफ्टी ६५.९० अंशाने घसरला आहे. सेन्सेक्स ७७२०९ व निफ्टी २३५०१.१० पातळीवर स्थिरावला आहे.
 
सेन्सेक्स व निफ्टी बँक निफ्टी निर्देशांकात घसरण कायम राहिली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक १२८.२३ अंशाने घसरत ५८६९६.६० पातळीवर व निफ्टी ५१६६१.४५ पातळीवर पोहोचला आहे. बीएसई मिडकॅप मध्ये ०.२६ अंशाने घसरण झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.०२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०८ व ०.१७ अंशाने घसरण झाली आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Sectoral Indices) मध्ये बहुतांश समभागात घसरण झाली आहे. केवळ आयटी (०.७६%), मिडिया (०.९५%), मेटल (०.४०%), कनज्यूमर ड्युरेबल्स (०.७५%) वगळता इतर समभागात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण पीएसयु बँक (१.१४%), रिअल्टी (०.७४%), तेल गॅस (१.०७%), एफएमसीजी (१.२०%) झाली आहे.
 
बीएसईत आज भारती एअरटेल, इन्फोसिस, टीसीएस, जेएसडब्लू स्टील, एनटीपीसी, कोटक महिंद्रा,पॉवर ग्रीड, मारूती सुझुकी, विप्रो या समभागात वाढ झाली आहे तर अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, नेस्ले, एचयुएल, टाटा स्टील, रिलायन्स, बजाज फायनान्स, आयटीसी, एसबीआय, टायटन कंपनी, एशियन पेंटस, बजाज फिनसर्व्ह, सनफार्मा,इंडसइंड बँक, टेक महिंद्रा या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईतील भारती एअरटेल, हिंदाल्को, इन्फोसिस, अदानी पोर्टस, जेएसडब्लू स्टील, डॉ रेड्डीज, टीसीएस, एनटीपीसी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, श्रीराम फायनान्स,कोटक महिंद्रा, मारूती सुझुकी,पॉवर ग्रीड, आयसीआयसीआय बँक,विप्रो या समभागात वाढ झाली आहे तर भारती एअरटेल, हिंदाल्को, अदानी पोर्टस, जेएसडब्लू स्टील, डॉ रेड्डीज, टीसीएस, एनटीपीसी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, मारूती सुझुकी,पॉवर ग्रीड, एचसीएलटेक, आयसीआयसीआय बँक, विप्रो या समभागात घसरण झाली आहे.
 
आज बीएसईत एकूण ३९८७ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १७८४ समभाग वधारले असून २०८६ समभागात घसरण झाली आहे. ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ २७९ समभागात झाली असून ९ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. ४ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ५ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
आज एनएसईतील एकूण २७४१ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १२०४ समभाग वधारले आहेत तर १४५७ समभागात घसरण झाली आहे. १९७ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ९ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. ९९ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ४२ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
आज शेअर बाजारात ' कंसोलिडेशन' फेज कायम राहिली आहे. विशेषतः युएस बाजारातील आकडेवारीत घसरण झाल्यानंतर युएस फेडरल व्याजदरात कपात होईल ही आशा कायम राहिल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी डॉलरची घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ३ पैशाने वधारून ८३.५८ रुपयांवर पोहोचले आहे तर २२ व २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७५०, ८१० रुपयांनी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस इआयए आकडेवारीनुसार कच्च्या तेलाच्या साठ्यात घसरण झाली तरी घटलेल्या मागणीमुळे तेलाचे दर घसरले आहेत. कच्च्या तेलाच्या Brent निर्देशांकात ०.११ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर WTI Future निर्देशांकात ०.११ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एमसीएक्सवरील (MCX) निर्देशांकात ०.१५ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारावर कंसोलिडेशन शिवाय बाजारात नफा बुकिंग झाल्याने निर्देशांकात घसरण झाली आहे. परंतु दुसरीकडे मात्र बाजारातील घसरण क्षेत्रीय विशेष समभागात मर्यादित राहिल्याने बाजारातील घसरण इथपर्यंतच राहिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र वातावरणात शेअर बाजारात घसरण कायम राहीली आहे. विशेषतः बहुतांश मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण तसेच बँक निर्देशांकातही घसरण झाल्याने निर्देशांकात ही घसरण प्रामुख्याने दिसली.
 
आयटी समभागात वाढ झाली असताना बँक निर्देशांकात मोठी घट झाली. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेतील आगामी घडामोडी, तसेच आगामी अर्थसंकल्प जाहीर होण्यापर्यंत बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. परदेशी गुंतवणूकदारांना मागील आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवला असला तरीदेखील बजेटचे आकडेवारी येईपर्यंत बाजारात परदेशी गुंतवणूकदार कसा प्रतिसाद देतात ते पाहणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बँकेने मागील महिन्यात २.५ लाख कोटींचा ऐतिहासिक लाभांश जाहीर केला होता. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च एनालिस्ट हृषिकेश येडवे म्हणाले, ' देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक, निफ्टी गॅप अप नोटवर उघडला, परंतु उच्च स्तरावर टिकू शकला नाही आणि दिवसाचा दिवस नकारात्मक २३५०१ वर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, दैनंदिन आधारावर, निर्देशांकाने मंदीची मेणबत्ती तयार केली आहे. शिवाय, निर्देशांकाने सर्व साप्ताहिक नफा पुसून टाकला आणि आठवडा एका फ्लॅट नोटवर सेटल केला, जे उच्च पातळीवर वितरण दर्शवते. जोपर्यंत निर्देशांक २३३०पातळी धारण करतो तोपर्यंत तेजीचा वेग कायम राहील, वरच्या बाजूने, २३७०० आणि २३८०० हे अल्पकालीन अडथळा म्हणून काम करतील.'
 
बँक निफ्टी निर्देशांक गॅप-अप नोटसह उघडला परंतु उच्च पातळी टिकवून ठेवू शकला नाही. परिणामी, बँक निफ्टीने दिवसाचा दिवस नकारात्मक नोटेवर ५१६६१ वर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, दैनंदिन स्तरावर, बँक निफ्टीने मंदीचा अंतर्भाव करणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केला आहे. या पॅटर्ननुसार, ५१९३५ रेझिस्टन्स म्हणून काम करेल. तथापि, निर्देशांक ५११३४ च्या पूर्वीच्या अडथळ्याच्या वर टिकून राहण्यात यशस्वी झाला. अशाप्रकारे, ५१५००–५१००० निर्देशांकासाठी तात्काळ समर्थन म्हणून काम करतील. अशाप्रकारे, अल्पावधीत बँक निफ्टी ५१०००-५२००० च्या श्रेणीत एकत्र येण्याची आम्हाला अपेक्षा आहे.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना कोटक सिक्युरिटीजचे व्हीपी टेक्निकल रिसर्च अमोल आठवले म्हणाले, ' गेल्या आठवड्यात, बेंचमार्क निर्देशांकांनी उच्च पातळीवर विक्रीचा काही दबाव पाहिला, निफ्टी २३४५५ वर संपला तर सेन्सेक्स ७७२१० वर बंद झाला. क्षेत्रांमध्ये, बँकिंग आणि वित्तीय निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली. बँक निफ्टी निर्देशांक ३ टक्क्यांहून अधिक तर ऑटो आणि एफएमसीजी निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक घसरले. तांत्रिकदृष्ट्या, आठवड्यादरम्यान बेंचमार्क निर्देशांकांनी २३६६७.१/७७८५१.६३ या नवीन सर्वकालीन उच्चांकाची नोंद केली परंतु उच्च स्तरावर काही नफा बुकिंग पाहिली. साप्ताहिक चार्टवर लहान मंदीची मेणबत्ती आणि इंट्राडे चार्टवर दुहेरी टॉप फॉर्मेशन सध्याच्या पातळीपासून आणखी कमजोरी दर्शवते. तथापि, बाजाराचा मध्यम मुदतीचा पोत अजूनही सकारात्मक बाजूने आहे.'
 
आमचे मत आहे की जोपर्यंत बाजार 23650/77500 च्या खाली व्यापार करत आहे तोपर्यंत खालच्या बाजूने कमकुवत भावना चालू राहण्याची शक्यता आहे बाजार 23300/76700 ची पातळी पुन्हा तपासू शकतो. पुढील डाउन साइड देखील चालू राहू शकते जे बाजार 23175/76100 पर्यंत ड्रॅग करू शकते. दुसऱ्या बाजूला, 23650/77500 ही बैलांसाठी तात्काळ ब्रेकआउट पातळी असेल. ब्रेकआउटनंतर मार्केट 23800-24000/78000-78500 पर्यंत वाढू शकते. आता बँक निफ्टीसाठी, ट्रेडर्स फॉलो करणाऱ्या ट्रेंडसाठी 51000 हे पवित्र समर्थन क्षेत्र असेल. त्याच वर, तो 52700-53000 पर्यंत वाढू शकतो. उलटपक्षी, 51000 पेक्षा कमी व्यापारी ट्रेडिंग लाँग पोझिशनमधून बाहेर पडणे पसंत करू शकतात.
 
परदेशी गुंतवणूकीवर प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीजचे हेड इक्विटी रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले, ' परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII )च्या ट्यून पर्यंत निव्वळ रोख विक्रेते आहेत. जून २४ मध्ये आजपर्यंत ७९४.५३ कोटी रुपये होते. मे मध्ये भारताची वस्तू व्यापार तूट US$ २३.८ अब्ज पर्यंत वाढली, ज्यामुळे तेल व्यापार तूट मोठ्या प्रमाणात वाढली, तर मे मध्ये सेवा व्यापार अधिशेष US$ १२.९ अब्ज एवढा झाला, जो एप्रिलच्या वरच्या सुधारित US$ १३.९ अब्ज डॉलरच्या मुद्रित पासून मध्यम आहे. सरकारने १४ खरीप पिकांसाठी एमएसपी जाहीर केला, धानासाठी MSP ५.४ % ने वाढवला आहे. FPI प्रवाह अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
 
जून २४ मधील आजपर्यंतचा FPI प्रवाह उदयोन्मुख बाजारपेठांसाठी संमिश्र होता. भारत, ब्राझील, इंडोनेशिया, फिलीपिन्स, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांनी अनुक्रमे US$ ४८दशलक्ष, US$ १३८० दशलक्ष, US$ १८५ दशलक्ष, US$ ८२ दशलक्ष, US$ ६६९ दशलक्ष, आणि US$४१६ दशलक्ष एवढा प्रवाह पाहिला. मलेशिया, दक्षिण कोरिया आणि तैवानमध्ये अनुक्रमे US$ १०१ दशलक्ष, US$ ३६३७ दशलक्ष आणि US$ ३३८१ दशलक्ष इतकी आवक झाली.'
 
रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले ,'रुपयाने ८३.५५ वर मजबूत व्यवहार केला, दिवसासाठी ०.०७ रुपये वाढले परंतु साप्ताहिक आधारावर सपाट राहिले. डॉलरमधील मजबूतीमुळे रुपयाला प्रत्येक वाढीवर ८३.४० च्या जवळ सातत्याने प्रतिकार करावा लागत आहे. याशिवाय, गेल्या काही आठवड्यांत क्रूडच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रुपयावर दबाव निर्माण झाला आहे. रुपया ८३.३५ ते ८३.७५ च्या मर्यादेत व्यवहार करेल.'
 
सोन्याच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले,
'कमकुवत सीपीआय (CPI) संख्या आणि किरकोळ विक्री डेटामुळे वाढलेल्या आठवड्यासाठी सोन्याच्या किमती सकारात्मक होत्या. सोन्याला ७१००० वर मजबूत समर्थन मिळाले, ७३२५० च्या आसपास प्रतिकार दिसून आला. सहभागी आता पुढील आठवड्यातील महत्त्वाच्या डेटाची वाट पाहत आहेत, ज्यात नवीन घर विक्री, यूएस मधील जीडीपी आणि कोर PCE किंमत निर्देशांक डॉलर आणि सोन्याच्या किंमतींवर प्रभाव टाकून एकूण बाजारावर परिणाम करतील.'
 
बँक निफ्टीविषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले, 'बँक निफ्टी (BankNifty) निर्देशांकाने अस्थिर ट्रेडिंग सत्र पाहिले परंतु खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील स्पष्ट भांडण ठळकपणे एका सपाट नोटवर संपले. तात्काळ प्रतिकार ५२००० वर ठेवण्यात आला आहे, जेथे कॉलच्या बाजूने सर्वाधिक खुले व्याज तयार केले गेले आहे. निर्देशांकाला आवश्यक आहे डाउनसाइडवर, लोअर एंड सपोर्ट ५१००० वर ठेवला जातो, जेथे या सपोर्ट लेव्हलच्या दिशेने सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट तयार केला जातो.'