मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात थोडी वाढ झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात दबाव कायम राहिला असला तरी वाढ झाली आहे. सेन्सेक्स १४१.३४ अंशाने वाढत ७७४७७.९३ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५१.०० अंशाने वाढत २३५६७ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात कालप्रमाणेच वाढ कायम राहिली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ३२२.५० अंशाने वाढत ५८७९१.३८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३१४.२५ अंशाने वाढत ५१७१२.३० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व न निफ्टी बँक निर्देशांकात ०.५५ व ०.६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४५ व ०.९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.८४ व ०.७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात ऑटो (०.५२%), आयटी (०.०१%), फार्मा (०.५३%) पीएसयु बँक (०.२९%), हेल्थकेअर (०.०६%) समभागात घसरण झाली आहे तर सर्वाधिक वाढ प्रायव्हेट बँक (१.१४%), तेल गॅस (०.९०%), रिअल्टी (१.५३%), मिड स्मॉल हेल्थकेअर (०.५६%) , बँक (०.७३%) समभागात झाली आहे.
आज बीएसईत एकूण ३९६० समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २२७६ समभागात वाढ झाली आहे तर २२७६ समभागात घसरण झाली आहे. २७३ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर १५ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. २९७ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १८२ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. बीएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४३६.७२ लाख कोटींवर पोहोचले आहे.
आज एनएसईत एकूण २६८० समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १७०० समभाग वधारले असून ८९५ समभागांच्या मूल्यांकनात सर्वाधिक घसरण झाली आहे. १८६ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ८ समभागांच्या मूल्यांकनात सर्वाधिक घसरण झाली आहे. १३६ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २७ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
बीएसईत जेएसडब्लू स्टील, कोटक महिंद्रा, टाटा स्टील, एचयुएल, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, नेस्ले, एशियन पेंटस, आयसीआयसीआय बँक, लार्सन, इन्फोसिस, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, आयटीसी या समभागात वाढ झाली आहे. तर सनफार्मा, एम अँड एम, विप्रो, एसबीआय, एनटीपीसी, भारती एअरटेल,पॉवर ग्रीड, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, मारूती सुझुकी, टीसीएस, लार्सन या समभागात घसरण झाली आहे.
एनएसईत आज हिंदाल्को, ग्रासीम, बीपीसीएल, अदानी पोर्टस, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, एचयुएल, कोल इंडिया, कोटक महिंद्रा, टेक महिंद्रा, श्रीराम फायनान्स, एचडीएफसी बँक, नेस्ले, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, डिवीज, ब्रिटानिया, डॉ रेड्डीज, लार्सन,टाटा मोटर्स, अपोलो हॉस्पिटल या समभागात वाढ झाली आहे. तर हिरो मोटोकॉर्प, सनफार्मा, एम अँड एम, एनटीपीसी, एसबीआय, विप्रो, सिप्ला,पॉवर ग्रीड, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, इंडसइंड बँक, आयटीसी,आयशर मोटर्स या समभागात घसरण झाली आहे.
आजही शेअर बाजारात आरबीआयच्या हेडलाईन्स इन्फ्लेशन (किरकोळ महागाई) आकडेवारीनंतर बाजारात सकारात्मकता कायम झाल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी काल शेअर बाजारात प्राईज करेक्शन गुंतवणूकदाराकंडून करण्यात आले होते. सलग पाच वेळा बाजारात वाढ झाल्यानंतर काल घसरण झाली होती. आता पुन्हा प्राईज करेक्शन व नफा बुकिंग होताना बँक निर्देशांकात साथ मिळाल्याने निर्देशांक वरच्या पातळीवर पोहोचला गेला. याशिवाय मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ झाल्यानेही बाजारात पायाभूत आधार मिळाला.
हेवी वेट आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स अशा समभागात (Shares) मध्ये वाढ झाल्याने बाजारात थोडी का होईना पण रॅली होण्यास मदत झाली. दुसरीकडे आयटी, पीएसयु बँक, फार्मा या समभागात घसरण झाल्याने याचा फटका बाजारात बसला होता. पीएनबी हाउसिंग, पॉवर इंडिया, अलोक इंडस्ट्रीज अशा शेअर्समध्ये ३ ते ५ टक्क्यांनी आज फटका बसला आहे. विशेषतः मायमॅपइंडिया या शेअर्समध्ये तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली असून हा समभाग अप्पर सर्किटवर पोहोचला आहे. भारती एअरटेल समभागात आज ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पुन्हा एकदा युएस मध्ये जेरोम पॉवेल यांनी आपल्या केलेल्या भाषणात इतक्यात व्याजदरात कपात होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. आशियाई बाजारातील अस्थिरता कायम राहत असली तरी काल आरबीआयच्या अहवालात (बुलेटिन) म्हटल्याप्रमाणे भारताची किरकोळ महागाई नियंत्रणात आल्याचे म्हटले होते. यापुढे पुन्हा बाजारात रॅली होणार का नफा बुकिंग होणार हे अर्थसंकल्प सादर होईपर्यंत आपल्या लक्षात येईलच तरीही गुंतवणूकदारांना सध्या कुठल्या समभागात वाढ का घसरण होईल याची अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, ' लक्षणीय अस्थिरतेचा अनुभव असूनही, देशांतर्गत बाजाराने दिवसाचा समारोप सकारात्मक केला. नजीकच्या काळात, आगामी केंद्रीय अर्थसंकल्प आणि मान्सूनच्या प्रगतीवर बाजाराचे लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. जागतिक आघाडीवर, यूएस बॉण्ड उत्पन्नातील घसरणीमुळे अलीकडच्या काही दिवसांत मजबूत FII प्रवाह सुलभ झाला आहे. GST काढून टाकणे आणि MSP मध्ये वाढ केल्यामुळे खतांच्या साठ्याने चांगली गती दाखवली.'