मोहित सोमण: अखेरच्या सत्रात शेअर बाजार काठावर पास झालेले आहे असे म्हणावे लागेल कारण सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाल्यानंतर बाजार सावरले असून बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि पुन्हा एकदा वरच्या पातळीवर बाजार किंचित स्थिरावले व उतरलेही आहे. सेन्सेक्स निर्देशांक ३६.४५ अंशाने वाढत ७७३३७.५९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ४१.९० अंशाने घसरत २३५१६.०० पातळीवर स्थिरावला आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९१ व ०.५८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९७ व ०.४६ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांक ११२९.५३ अंशाने वाढत ५८४६८.८८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ९५७.१५ अंशाने वाढत ५१३९८.०५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात अनुक्रमे १.९७ व १.९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळप्रमाणेच संध्याकाळी संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सर्वाधिक वाढ बँक (१.९०%), फायनांशियल सर्विसेस (१.५९%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.८०%), प्रायव्हेट बँक (२.०१%) समभागात वाढ झाली आहे तर रिअल्टी (२.८३%),ऑटो (१.३०%), एफएमसीजी (०.९१%), फार्मा (०.९२%) समभागात घसरण झाली आहे.
आज बीएसईत ३९७२ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १६३७ समभागात वाढ झाली आहे तर १६३७ समभागांच्या मूल्यांकनात घसरण झाली आहे. ३१५ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यात सर्वाधिक वाढ झाली आहे तर २० समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. ४ समभाग अप्पर सर्किटवर पोहोचले आहेत तर ४ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. बीएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४३४.०१ लाख कोटींवर पोहोचले आहे.
आज एनएसईत २७११ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १११२ समभागात वाढ झाली आहे तर १५७४ समभाग घसरले आहेत. २२७ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे. तर ९ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. १२४ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ४७ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. एनएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल ४३०.३२ लाख कोटींवर पोहोचले आहे.
आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग गुंतवणूकदारांनी केल्याची शक्यता असल्याने बाजारात घसरण झाली आहे. सकाळीही प्राईज करेक्शन कायम राहिल्याने आज बाजारात घसरण झाली आहे. मात्र यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील तेजी व बँक निर्देशांक, मिड स्मॉल कॅप निर्देशांकातील मर्यादित घसरणीमुळे बाजारात एक सपोर्ट लेवल तयार झाल्याने पडझड नियंत्रित राहिली आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात ' कंसोलिडेशन ' झाल्याने बाजारात रॅली होऊ शकली नाही. सलग पाच वेळा बाजारात वाढ झाल्यानंतर बाजार खाली येणे हे स्वाभाविक असले तरी हाच अंडरकरंट कायम राहतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन टयुब्रो, भारती एअरटेल या महत्वपूर्ण हेवी वेट शेअर्समध्ये घसरण झाल्याने बाजारात पातळी खालावली होती. बाजारातील बजेटपूर्व काळात हा अंडरकंरट कायम राहण्याची शक्यता असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. बाजार भांडवलात देखील आज बीएसईत घसरण झाली आहे ही घसरण ४३७.२ वरून ४३४ लाख कोटींवर झाला आहे. केवळ ११ शेअर्समध्ये एनएसईत आज वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ एक्सिस बँक (३.११%), एचडीएफसी (३.०६%), आयसीआयसीआय बँक (१.९२%), इंडसइंड बँक (१.८६%), कोटक महिंद्रा बँक (१.४९%), एसबीआय (१.११%) या महत्वपूर्ण समभागात झाली आहे. तर घसरण टायटन (३.६०%), भारती एअरटेल (२.६०%), बजाज ऑटो (२.४०%), बीपीसीएल (२.३३%) लार्सन टयुब्रो (२.२३%) या समभागात झाली आहे.
एकूणच काही क्षेत्रातील वाढ व काही क्षेत्रात घसरण यामुळे शेअर बाजारात एक प्रकारे सपाट पातळीवर बाजार बंद झाले आहे. आज शेअर बाजारातील बँक निर्देशांक पातळी पाहता आगामी काळात ही पातळी स्थिर राहते का हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
बीएसईत आज एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, एसबीआय, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएलटेक या समभागात वाढ झाली आहे तर टायटन कंपनी, भारती एअरटेल, मारूती सुझुकी, एनटीपीसी, रिलायन्स, बजाज फायनान्स, पॉवर ग्रीड, आयटीसी, एचयुएल, जेएसडब्लू स्टील, नेस्ले, सनफार्मा, एम अँड एम, टाटा मोटर्स, एशियन पेंटस, टीसीएस,बजाज फिनसर्व्ह या समभागात घसरण झाली आहे.
एनएसईत आज एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएलटेक, अदानी पोर्टस या समभागात वाढ झाली आहे तर टायटन कंपनी, मारूती सुझुकी, लार्सन, हिंदाल्को, बीपीसीएल, बजाज ऑटो, कोल इंडिया, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, हिरो मोटोकॉर्प, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, ओएनजीसी, रिलायन्स, अदानी एंटरप्राईज, श्रीराम फायनान्स, आयटीसी, आयशर मोटर्स, सनफार्मा, अपोलो हॉस्पिटल, नेस्ले, एशियन पेंटस, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, डॉ रेड्डीज, बजाज फिनसर्व्ह या समभागात घसरण झाली आहे.
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' निफ्टी५० आणि सेन्सेक्सने आज सलग चौथ्या सत्रात नवीन विक्रमी उच्चांक गाठला. अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या यूएस किरकोळ विक्री डेटाच्या प्रकाशनानंतर, बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील समभागांमुळे फायदा झाला. तथापि, या घटकांमुळे फेडरल रिझर्व्हने नजीकच्या काळात व्याजदरात कपात करण्याच्या अपेक्षांना बळकटी दिली. यूएस १०-वर्षीय रोखे उत्पन्न देखील ४.२२% पर्यंत घसरत आहे. हे घटक एफआयआयला अधिक खरेदी करण्यास प्रवृत्त करत आहेत ज्यामुळे एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक सारख्या समभागांना फायदा होत आहे. आकर्षक मुल्यांकनात उपलब्ध आहेत.
अलीकडील ट्रेडिंग सत्रांमध्ये अथक रॅलीनंतर गुंतवणूकदारांनी नफा बुकिंगमध्ये गुंतल्यामुळे संरक्षण समभाग लाल रंगात होते. भारत डायनॅमिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL), भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) आणि Mazagon Dock Shipbuilders Ltd (MAZDOCK) या सर्वांनी ५% पर्यंत घसरण अनुभवली.'
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च निरज शर्मा म्हणाले, ' देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक निफ्टी५० ने बुधवारी सलग पाचव्या दिवशी नवीन उच्चांक गाठला, बँकिंग, आयटी क्षेत्र आणि अनुकूल जागतिक संकेतांमुळे चालना. शेवटी, निफ्टीने सर्व फायदे गमावले आणि दिवसाचा शेवट २३५१६ स्तरांवर नकारात्मक नोटवर झाला. तांत्रिकदृष्ट्या, दैनंदिन आधारावर, निर्देशांक मागील आठवड्याच्या २३००० ते २३५०० पातळीच्या एकत्रीकरण श्रेणीच्या ब्रेकआउटच्या वर टिकून आहे, जो ताकद दर्शवितो. या ताज्या ब्रेकआउटनुसार, नजीकच्या भविष्यात निर्देशांक २३८००-२४००० स्तरांची चाचणी घेऊ शकतो. अशा प्रकारे, निफ्टीमध्ये २३३२० वर समर्थनासह खरेदी-ऑन-डिप्स धोरण वापरावे.'
बँक निफ्टी निर्देशांक एका अंतराने उघडला आणि दिवसभर मजबूत गती पाहिली. परिणामी बँक निफ्टीने 51,957 चा विक्रमी उच्चांक नोंदवला आणि दिवसाचा ऐतिहासिक उच्चांक 51,398 वर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, दैनंदिन स्केलवर, बँक निफ्टीने 51,134 चा पूर्वीचा अडथळा पार केला आहे आणि त्याच्या वर बंद होण्यात यश मिळविले आहे, ज्यामुळे ताकद सूचित होते. अशाप्रकारे, जोपर्यंत बँक निफ्टी 51,000 पातळी धारण करते, तोपर्यंत ते अल्पावधीत 51,800-52,000 पातळीची चाचणी घेऊ शकते.”
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीजचे हेड इक्विटी रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले, ' आज, बेंचमार्क निर्देशांकांमध्ये अस्थिर व्यापार सत्र दिसून आले. रोलर कोस्टर क्रियाकलापानंतर, निफ्टी ४२ अंकांनी कमी झाला तर सेन्सेक्स ३६ अंकांनी वर होता. क्षेत्रांमध्ये, बँक निफ्टी निर्देशांकाने चांगले प्रदर्शन केले, २ टक्क्यांहून अधिक वाढ केली तर रिॲलिटी इंडेक्सने तीव्र सुधारणा केली, २.७५ टक्क्यांहून अधिक घट झाली. तांत्रिकदृष्ट्या, उच्च स्तरावर विक्रीच्या दबावाला सातत्याने तोंड देत असलेल्या ओपनिंग इंडेक्सच्या अंतरानंतर. दैनंदिन चार्टवर, याने मंदीची मेणबत्ती तयार केली आहे, जी वर्तमान पातळीपासून तात्पुरती कमजोरी दर्शवते. तथापि, बाजाराचा अल्पकालीन पोत अजूनही सकारात्मक बाजूने आहे.
आमचे मत आहे की, २३४५० /७७१०० हे दिवसाच्या व्यापाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समर्थन क्षेत्र असेल; त्याच खाली,आम्ही २३३५० -२३३००/७६८०० -७६६००पर्यंत एक द्रुत इंट्राडे सुधारणा पाहू शकतो. उलटपक्षी, २३६६०/७७८५० हे बुल्ससाठी तात्काळ ब्रेकआउट पातळी असू शकतात. २३६६०/७७८५० च्या वर, बाजार २३७७५-२३८०० /७८०००-७८२०० वर जाण्याची शक्यता आहे. इंट्राडे मार्केट टेक्सचर दिशाहीन आहे त्यामुळे दिवसाच्या ट्रेडर्ससाठी लेव्हल बेस्ड ट्रेडिंग हे आदर्श धोरण असेल.'
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, ' बाजारांनी अस्थिरता अनुभवली आणि मिश्र सिग्नल दरम्यान जवळजवळ अपरिवर्तित बंद झाले. सपाट सुरुवात करून २२५१९ च्या आसपास स्थिरावण्यापूर्वी निफ्टी दिवसभरात लक्षणीय चढ-उतार झाला. बहुतेक क्षेत्रांमध्ये नफा-टेकिंग दिसून आला, बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील ताकदीने एकूण तोटा कमी केला. विस्तृत निर्देशांक, मजबूत कामगिरीनंतरचे दिवस, अंदाजे ०.५% ते १ % पर्यंत घसरले.
तरीही स्पष्ट खात्री न देता प्रमुख क्षेत्रांमध्ये फिरणारी खरेदी सकारात्मक बाजार भावनेला समर्थन देत आहे. म्हणून, आम्ही निर्देशांकात "डिप्सवर खरेदी" करण्याचे धोरण सुरू ठेवण्याचा सल्ला देतो आणि क्षेत्रीय किंवा थीमॅटिक घटकांवर आधारित निवडक स्टॉक पिकांवर भर देतो. बँकिंगने नवीन उच्चांक गाठला आहे आणि ती गती टिकवून ठेवण्याची अपेक्षा आहे, तर अलीकडील एकत्रीकरणानंतर आयटीमध्ये नवीन स्वारस्य अपेक्षित आहे.