१) Dindigul Farm Ltd - इनन्यूट्रिका (EnNutrica) दिंडीगुल फार्म (Dindigul Farm Product Limited) कंपनीचा आयपीओ उद्या २० जूनपासून बाजारात दाखल होणार आहे. या आयपीओत ६४.५ लाखांचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. २० ते २४ जून या कालावधीत आयपीओ बाजारात राहणार आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओत ५१ ते ५४ रुपये प्रति समभाग प्राईज बँड निश्चित केला गेला आहे. २००० समभागांचा एक गठ्ठा (Lot) गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. कमीत कमी १०८००० रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदारांना आयपीओसाठी करावी लागणार आहे.
Beeline Capital Advisors Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Link Intime India Private Ltd कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. Spread X Securities ही कंपनी आयपीओसाठी मार्केट मेकर म्हणून काम पाहणार आहे. २४ जून रोजी आयपीओसाठी अंतिम तारीख असणार आहे. पात्र झालेल्या गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप २५ जूनपर्यंत करण्यात येणार आहे तर अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २६ जूनपासून करण्यात येणार आहे.
एकूण आयपीओपैकी गुंतवणूकीचा ५० टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) उपलब्ध असणार आहे तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) साठी ३५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) १५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. आर राजसेकरन, राजाधरशिनी राजसेकरन, इंद्रायणी बायोटेक लिमिटेड हे कंपनीचे प्रमोटर (प्रवर्तक) आहेत.
२०१० साली ही कंपनी स्थापन झाली होती. ही कंपनी दूधाशी संबंधित उत्पादने बाजारात पुरवते. कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार, कंपनीला ३१ मार्च २०२२ व ३१ मार्च २०२३ दरम्यान कंपनीच्या १८८.१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर करोत्तर नफ्यात ( Profit After Tax) मध्ये २२५.१६ टक्क्यांनी वाढ झाली होती. कंपनींच्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२३ मध्ये कंपनीला ८१९९.३४ कोटींचा महसूल मिळाला होता जो ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कमी होत ६८७६.६५ कोटींवर पोहोचला आहे. करोत्तर नफ्यात ३१ मार्च २०२३ मधील तुलनेत ५२५.७९ कोटींच्या तुलनेत वाढ होत ५८८.४० कोटींपर्यंत वाढ झाली आहे.
कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) १३१.९२ कोटी रुपये आहे. कंपनींच्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर भांडवली खर्च करण्यासाठी, वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
२) Winny Immigration and Education Services Ltd - विनी इमिग्रेशन एज्युकेशन सर्विसेस लिमिटेड या कंपनीचा आयपीओ उद्या २० जून ते २४ जून या काळात बाजारात दाखल होणार आहे. या आयपीओत ६.५१ लाख समभाग (Shares) उपलब्ध असणार आहेत. विनी इमिग्रेशन आयपीओ (IPO) २५ जूनपासून बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. १००० समभागांचा एक गठ्ठा (Lot) उपलब्ध असणार आहे. कमीत कमी गुंतवणूकदारांना १४०००० रुपयांची गुंतवणूक आयपीओत करावी लागणार आहे.
कंपनीने आयपीओसाठी प्राईज बँड १४० रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात केला आहे. Interactive Financial Services Limited ही कंपनी बुक लिडींग मॅनेजर म्हणून आयपीओसाठी काम पाहणार आहे. Bigshare Services Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. Aftertrade Broking कंपनी आयपीओसाठी मार्केट मेकर म्हणून काम पाहील. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप २५ जूनपासून मिळणार आहे तर अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २६ जूनपासून मिळणार आहे.
एकूण आयपीओपैकी ५० टक्के समभाग वाटा रिटेल (किरकोळ) गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे तर इतर गुंतवणूकदारसाठी ५० टक्के समभाग वाटा उपलब्ध असणार आहे. २००८ साली ही कंपनी स्थापित करण्यात आली होती. ही कंपनी मुख्यतः विसा कन्सल्टंसी सेवा पुरवते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२४ व ३१ मार्च २०२३ या कालावधीत कंपनीच्या महसूलात ८ टक्क्यांनी घसरण झाली होती. तर कंपनींच्या करोत्तर नफ्यात ७२.८६ टक्क्यांनी घसरण झाली होती.
कंपनीच्या माहितीप्रमाणे, ३१ मार्च २०२३ मधील ११९७.९१ कोटींच्या तुलनेत महसूलात घसरण होत ३१ मार्च २०२४ पर्यंत ११०२.१२ कोटीवर पोहोचला आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये ३१ मार्च २०२३ मधील १४४.७१ कोटींवरुन घटत ३१ मार्च २२०४ मध्ये ३९.२७ कोटींवर पोहोचले आहे. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ३०.३८ कोटी रुपये आहे.कंपनीच्या माहितीप्रमाणे, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर नवीन कार्यालय उघडण्यासाठी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी , थकबाकी चुकवण्यासाठी, ब्रँडिंग व जाहिरातीसाठी, दैनंदिन कामकाजासाठी, पब्लिक इश्यू खर्चासाठी वापरला जाणार आहे.