१८ वर्षांत २१ वेळा बदल्या, आता असंघटित कामगार विभागात विकास आयुक्त!

    18-Jun-2024
Total Views |
ias officer transfered
 

मुंबई :     भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. त्यांच्या १८ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील ही २१ वी बदली आहे. ते आता असंघटित कामगार विभागात विकास आयुक्त म्हणून काम पाहतील. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षी जुलै महिन्यात त्यांची पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव पदावर पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यास वर्ष पूर्ण होण्याआधी पुन्हा बदली करण्यात आली. त्यांच्या जागी राजेश कुमार यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
 

तुकाराम मुंढे यांचा प्रशासकीय प्रवास :-
 
तुकाराम मुंढे हे २००५ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी
 
२००७ सालापर्यंत ते सोलापूरचे उपजिल्हाधिकारी
२००७ मध्ये प्रकल्प अधिकारी धारणी
२००८ – उपजिल्हाधिकारी नांदेड
२००८ जिल्हा परिषद सीईओ नागपूर
२००९ – अति आदिवासी आयुक्त नाशिक
२०१० केव्हीआयसी मुंबई
२०११ जिल्हाधिकारी जालना
२०११- १२ जिल्हाधिकारी सोलापूर
२०१२ – सहआयुक्त विक्रीकर विभाग मुंबई
२०१६ – महापालिका आयुक्त नवी मुंबई
२०१७ – अध्यक्ष पीएमपीएएल
२०१८ – महापालिका आयुक्त नाशिक
२०१८ – सहसचिव मुंबई नियोजन विभाग
२०१८ – एड्स नियंत्रण मंडळ प्रकल्प संचालक
२०२०- नागपूर महापालिका आयुक्त
२०२० – सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई
२०२१ – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
२०२२ (सप्टेंबर) - आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान
२०२३ – मराठी भाषा विभाग
२०२३ – पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग