मुंबई: आज बकरी ईद निमित्त डेट व इक्विटी शेअर बाजार बंद राहणार आहे. आज डेरीएटिव्ह व फॉरेक्स बाजार देखील बंद राहणार आहे. उद्या मंगळवारी शेअर बाजार नियमित सुरु होणार आहे. शुक्रवारी अखेरच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टीत वाढ झाली होती. सेन्सेक्स ०.२४ टक्क्यांनी वाढत ७६९९२.२८ ला बंद झाला होता तर निफ्टी ०.२९ टक्क्यांनी वाढत २३४६५.६० पातळीवर बंद झाला होता.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आज सकाळच्या सत्रात बंद राहणार आहे तर संध्याकाळी ५ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत एमसीएक्स सुरू राहणार आहे. यानंतर १७ जुलै रोजी मोहरम निमित्ताने शेअर बाजार बंद राहणार आहे.
या तारखांना बाजार बंद राहतो-
१) प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी
२) महाशिवरात्री - ८ मार्च
३) होळी - २५ मार्च
४) गुड फ्रायडे - २० मार्च
५) रमझान ईद - ११ एप्रिल
६) राम नवमी - १७ एप्रिल
७) महाराष्ट्र दिन - १ मे
८) बकरी ईद -१७ जून
९) मोहरम - १७ जुलै
१०) स्वातंत्र्य दिन - १५ ऑगस्ट
११) महात्मा गांधी जयंती - २ ऑक्टोबर
१२) लक्ष्मीपूजन - १ नोव्हेंबर
१३) गुरूनानक जयंती - १५ नोव्हेंबर
१४) नाताळ - २५ नोव्हेंबर