शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याची अखेर दमदार सलग चौथ्यांदा रॅली कायम सेन्सेक्स १८१.८७ व निफ्टी ६६.७० अंशाने वाढला

मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठी वाढ मिडिया आयटी समभागात घसरण

    14-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या रॅलीची अखेरच्या सत्रात पुनरावृत्ती होत बाजारात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स १८१.८७ अंशाने वाढत ७६९९२.७७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक ६६.७० अंशाने वाढत २३४६५.६० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ११५.४० अंशाने वाढत ५६८६४.७७ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी बँक निर्देशांक १५५.३० अंशाने वाढत ५०००२.०० पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.१८ व १.०३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एनएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.०५ व ०.४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळप्रमाणेच आयटी (०.८७%), मिडिया (०.०३%) समभागात घसरण झाली आहे तर बाकी इतर समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ मिड स्मॉल हेल्थकेअर (१.२४%), कनज्यूमर ड्युरेबल्स (१.२०%), रिअल्टी (०.८२%), तेल गॅस (०.६०%) समभागात वाढ झाली आहे.
 
बीएसईत आज एकूण ३९८० समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २३८ समभाग वधारले असून १६२५ समभागात घसरण झाली आहे. ३१९ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर १२ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. ६ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १२ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
आज एनएसईत एकूण २७६१ समभागात ट्रेडिंग झाले असताना त्यातील १५५६ समभागात वाढ झाली आहे तर १११४ समभागात घसरण झाली आहे. २३६ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ४ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. १३९ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २७ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल ४३४.८८ कोटींवर पोहोचले आहे तर एनएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४३१.३४ लाख कोटींवर पोहोचले आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत रुपया वधारला असल्याने ८३.५० रुपयांवर डॉलर स्थिरावला आहे. यापूर्वी कच्च्या तेलाच्या घसरणीने डॉलर वधारला होता.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र वातावरण व युएसमध्ये किरकोळ महागाई दरात घट झाल्याने व्याजदरात कपात एकदा तरी होईल या आशेने बाजारात सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.१९ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.२१ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.३ टक्क्यांनी वाढत ७१८७१.०० पातळीवर पोहोचला आहे. भारतातील सोने दरात संध्याकाळपर्यंत घसरण होऊन प्रति १० ग्रॅम २५० ते २७० रुपयांनी घसरण झाली आहे.
 
आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या (Crude) तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आशेने व किरकोळ महागाई दरात अपेक्षेपेक्षा अधिक घट झाल्याने बाजारात तेलाची मागणी वाढण्याची स्थिती निर्माण झाली असली तरी प्रत्यक्षात साठ्यातील तुलनेत मागणीत वाढ झाल्याने निर्देशांकात घसरण झाली आहे. संध्याकाळपर्यंत WTI Future क्रूड निर्देशांकात ०.३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड निर्देशांकात ०.५१ टक्क्यांनी वाढ झाली होती. एमसीएक्सवरील तेलाच्या निर्देशांकात ०.२७ टक्क्यांनी वाढ होत तेलाची किंमत प्रति बॅरेल ६५६८.०० पातळीवर पोहोचली आहे.
 
युएस बाजारातील किरकोळ महागाई दराची आकडेवारी अपेक्षेनुसार अधिक सकारात्मक आल्यानंतर युएस बाजारात वाढ होण्याची शक्यता आहे. तर युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात यावर्षी एकदा कपात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बाजारात रॅली होण्याची शक्यता निर्माण झाली होती. युरोपातील बाजारात घसरण कायम असून भारतीय बाजारात संमिश्र प्रतिसाद असतानाही रॅली कायम राहिल्याने यांचे गमक भारतातील अर्थव्यवस्थतेतील सुधारणा हे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये १ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने बाजारात पाठिंबा मिळाला होता तर लार्ज कॅप मध्ये हेवी वेट म्हणून ओळखले जाणारे रिलायन्स, एचडीएफसी सारख्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजारात वाढ झाली होती.
 
आज एकूण बाजारात वाढ होताना बाजारात पुन्हा प्राईज करेक्शन होणार का व गुंतवणूकदार आपले नफा बुकिंग करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दुसरीकडे बाजारातील रॅली राहत असताना मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ होणे हे शेअर्स बाजारातील वाढ होण्याचे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परदेशी गुंतवणूकदार बाजारात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आगामी कपातीचा चर्चेमुळे कसा प्रतिसाद देतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आज शेअर बाजारात बीएसईतील कंपन्यांच्या बाजार भांडवलाने ४३४.८८ लाख कोटींचा टप्पा गाठला होता. एनर्जी, रिअल्टी समभागात वाढ झाली असली तरी आयटी, मिडिया समभागात घट झाली आहे.
 
आज बीएसईत एम अँड एम, टायटन कंपनी, एचडीएफसी बँक, रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, एक्सिस बँक, जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह,पॉवर ग्रीड या समभागात वाढ झाली आहे. तर टेक महिंद्रा, टीसीएस, विप्रो, एचसीएलटेक, एसबीआय, एनटीपीसी, इन्फोसिस, नेस्ले, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, मारूती सुझुकी या समभागात घसरण झाली आहे.
 
आज एनएसईत आयशर मोटर्स, एम अँड एम, अदानी पोर्टस, श्रीराम फायनान्स, टायटन कंपनी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, सिप्ला, बीपीसीएल, अदानी एंटरप्राईज, रिलायन्स, एचडीएफसी लाईफ, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासीम, हिंदाल्को, एशियन पेंटस, बजाज ऑटो, सनफार्मा, टाटा स्टील, ब्रिटानिया, बजाज फिनसर्व्ह, अपोलो हॉस्पिटल या समभागात वाढ झाली आहे टेक महिंद्रा, टीसीएस, एसबीआय, कोटक महिंद्रा, लार्सन, ओएनजीसी, नेस्ले, इन्फोसिस,इंडसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, टाटा कनज्यूमर ड्युरेबल्स, आयसीआयसीआय बँक, मारूती सुझुकी या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च एनालिस्ट ऋषिकेश येडवे म्हणाले, ' निफ्टीने सर्वकालीन उच्चांक गाठल्यानंतर मध्यम वाढीसह दिवस स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, दैनंदिन प्रमाणात, निर्देशांकाने ड्रॅगनफ्लाय डोजी कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे, जो अनिश्चितता दर्शवतो. या पॅटर्ननुसार, जर निर्देशांक २३३३० च्या खाली टिकला तर नफा बुकिंग अपेक्षित आहे. उलटपक्षी, जर निर्देशांक २३५०० च्या वर टिकून राहिला तर रॅली २३८००-२४००० पर्यंत वाढू शकते. नकारात्मक बाजूने, निफ्टीला तात्काळ समर्थन २३००० पातळीच्या जवळ आहे, त्यानंतर २२७६० पातळी आहे, जिथे ३४-दिवसीय एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज (DEMA) समर्थन स्थित आहे.'
 
बँक निफ्टी निर्देशांक एका अंतराने उघडला परंतु नंतर ५०००२ वर सकारात्मक नोटवर दिवस बंद करण्यापूर्वी एका अरुंद श्रेणीत एकत्रित झाला. तांत्रिकदृष्ट्या, दैनंदिन प्रमाणात, बँक निफ्टीने एक डोजी कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे, जो उच्च स्तरावरील अनिश्चितता दर्शवतो. नकारात्मक बाजूने, निर्देशांकासाठी तात्काळ समर्थन ४९०३६ पातळीच्या जवळ आहे, जेथे २१ दिवसांची साधी मूव्हिंग सरासरी (DSMA) स्थित आहे.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, ' यूएस फेडच्या अडाणी समालोचनानंतर नवीन ट्रिगर्सच्या अभावामुळे, अल्प-मुदतीसाठी दर कपातीची संभाव्यता कमी झाल्यामुळे बाजाराच्या गतीमध्ये तात्पुरती घसरण झाली आहे. देशांतर्गत गुंतवणूकदार आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संकेतांची वाट पाहत असल्याने नजीकच्या मुदतीचे एकत्रीकरण संभाव्य दिसते. उपभोगाच्या नेतृत्वाखालील साठा वाढवून सरकार कल्याणावर भर देऊ शकते, असे मत वाढत आहे.'