बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे भारतातील सिमेंट उद्योगाला चालना

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा ५०८ किमी लांबीचा आणि अंदाजे सुमारे २ लाख कोटी रुपयांचा आहे

    13-Jun-2024
Total Views |

bullet train


मुंबई, दि. १३ :  
बहुप्रतिक्षित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा ५०८ किमी लांबीचा आणि अंदाजे सुमारे २ लाख कोटी रुपयांचा हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प ऑगस्ट २०२६मध्ये पूर्ण होणार आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ज्याचा उद्देश प्रवासाचा वेळ कमी करणे आहे. ३२० किमी/तास वेगाने चालणाऱ्या या ट्रेनमध्ये प्रत्येक दिशेने दररोज १७,९०० प्रवासी घेऊन जाण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे सिमेंट आणि स्टीलसारख्या उद्योगांना लक्षणीय चालना मिळेल,अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) दिली आहे.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आतापर्यंत ७८ लाख घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा ५०८ किमी लांबीचा आहे. यात १२ स्थानके, २४ नदीवरील पूल, ८ पर्वतीय बोगदे आणि एक समुद्राखालील बोगदा असा हा मेगा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेगच वाढणार असून यामुळे प्रकल्प क्षेत्रातील बांधकाम उद्योग, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळत आहे.

या मेगा प्रोजेक्टमध्ये उच्च दर्जाचे बांधकाम तंत्रज्ञान वापरले जात आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये दररोज सुमारे २०,००० घनमीटर काँक्रीटचा वापर केला जात आहे, जे आठ ते दहा मजली इमारतींच्या समतुल्य आहे. आतापर्यंत तेरा लाख मोठ्या ट्रान्झिट मिक्सरद्वारे सुमारे ७८ लाख घनमीटर काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून दररोज सुमारे २० हजार कामगारांच्या मेहनतीमुळेच इतक्या उच्च स्तरावर काम करणे शक्य झाले आहे. इतकेच नाहीतर या क्षेत्रात रोजगाराला चालना मिळाली आहे. हे मोठे कार्य पूर्ण करण्यासाठी, कॉरिडॉरच्या बाजूने ६५ खास डिझाइन केलेले आणि बांधलेले काँक्रीट बॅचिंग प्लांट स्थापित केले आहेत, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) दिली आहे.