मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सामान्य वाढ झाली आहे. विशेषतः अमेरिकन बाजारातील ग्राहक महागाई निर्देशांकाची माहिती आहे बाजारात अपेक्षित असल्याने तसेच भारतातील महागाई दराची आकडेवारी बाजारात येणार असल्या ने सकारात्मकता कायम राहत बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांक १४९.९८अंशाने वाढत ७६६०६.५७ पातळीवर पो होचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ५८.१० अंशाने वाढत २३३२२.९५ पातळीवर पोहोचला आहे.
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.१० व १.०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये व अनुक्रमे १.१५ व १.२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक १७७.२७ अंशाने वाढत ५६८३६.१९ पातळीवर पोहो चला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २३३.३५ अंशाने वाढत ४९९३९.१० पातळीवर पोहोचला आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. ऑटो (०.०३%), एफएमसीजी (०.५७%), आयटी (०.०२%), रिअल्टी (०.०८%) समभागात घसरण झाली असून सर्वाधिक वाढ मीडिया (१.८४%), पीएसयु बँक (१.१९%), फायनांशियल सर्विसेस (०.६७%), मेटल (०.४९%), हेल्थकेअर (०.८२%) समभागात झाली आहे.
आज बीएसईत एकूण ३९८८ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २५९१ समभाग वधारले असून १३६४ समभागात घसरण झाली आहे. आज २५० समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर २१ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण ३८९ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ४२ सम भाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत. बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४२९.२६ लाख कोटी होते.
एनएसईत एकूण २७५० समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १८३४ समभाग वधारले असून ८२५ समभागात आज घसरण झाली आहे.१६८ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर १० समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. १७६ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १० समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. आज एनएसईतील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४२३.४९ कोटी रुपये राहिले आहे.
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत अखेरीस वधारल्याने ८३.५० रुपयांवर स्थिरावला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या मागणीत वाढ होताना सोन्याच्या किंमतीत स्थिरता आली आहे. दुसरीकडे अमेरिकन बाजारातील लेबर मार्केटच्या आकडेवारीनंतर आता ग्राह क महागाई दर येणार असल्याने बाजारात उलाढालीत वाढ झाली होती. भारतातही आज महागाईचे आकडेवारी जाहीर होणार असल्याने सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाली होती. विशेषतः युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.१५ टक्क्यांनी घस रण झाली आहे.
युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात ०.०१ टक्क्यांनी वाढ झाली होती. प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे सोन्याच्या २२ व २४ कॅरेट दरात ३०० ते ३२० रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबई तील सोन्याच्या दरात ३०० ते ३२० रुपयांनी वाढ झाल्याने २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ६६१५० व २४ कॅरेट सोन्याचे प्रति १० ग्रॅम दर ७२१६० रुपये पातळीवर पोहोचले आहेत.
ओपेक राष्ट्रांच्या बैठकीनंतर कच्च्या तेलाच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. ही वाढ मुख्यतः भविष्यातील वाढणारी मागणी व घटता पुरवठा बघता झाली होती. कालांतराने घटत्या महागाईमुळे व कमी झालेल्या मागणीमुळे व पुरेश्या साठ्यात वाढ झाल्या ने घसरण झाली होती. मात्र पुन्हा एकदा तज्ञांनी फ्युचर ट्रेडमध्ये वाढती मागणी येण्याची शक्यता असल्याने पुन्हा कच्चे (Crude) तेल महागले आहे.
दुसरीकडे API (अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट) आकडेवारीनुसार तेलाच्या साठ्यात घट झाल्याने पुन्हा एकदा तेलाचा तुटवडा झाला आहे. डिपार्टमेंट ऑफ एनर्जी (DOE) ने तेलाच्या साठ्यात वाढ झाल्याचे सांगितले होते. गॅसलिन इन्व्हेंटरीमध्ये घसरण झाल्याने तुटवडा निर्माण झाला. अमेरिकन बाजारातील रोजगाराचे आकडे अपेक्षित आकड्याहून अधिक आल्याने बाजा रात बुलिश वातावरण होते. परिणामी डॉलर वधारला. WTI Future क्रूड तेलाच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत तब्बल १.२१ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात १.०१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एमसीएक्सवरील तेलाच्या निर्दे शांकात ०.८० टक्क्यांनी वाढ होत तेल प्रति बॅरेल ६५६९.०० पातळीवर पोहोचले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर बाजारात संमिश्र प्रतिसाद असताना भारतीय बाजारात आज मात्र अंतिम सत्रात वाढ झाली आहे. सकाळची वाढ संध्याकाळी वाढ कायम राहिली आहे. मुख्यतः भारताच्या सक्षम अर्थव्यवस्थेतील बदलामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार परतल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळेल कशी अपेक्षा अजूनही गुंतवणूकदारांमध्ये कायम आहे. भारतात महागाई दराचे आकडेवारी आज जाहीर होणार असल्याने बाजारात ' बुलिश' वातावरण कायम राहिले होते. विशेषतः मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये १ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने बाजारात मोठा सपोर्ट बेस तयार झाला होता. बँक निर्देशांकात मोठी वाढ झाल्याने बाजार शेवटपर्यंत वरच्या पातळीवर कायम राहिला होता. वर्ल्ड बँकेने आज भारताची अर्थव्यवस्था वेगवान आहे असे म्हटले होते. बँकेने आपला भारतीय अर्थव्यवस्थेवरचा सुधारित अंदाज ६.४ वरून ६.६ टक्क्यांवर व्यक्त केला ज्यामुळे बाजारात रोमहर्षक वातावरण निर्माण झाले.
दुसरीकडे काही क्षेत्रातील समभागात घसरण झाली होती तर काही समभागात वाढ झाली. विशेषतः एफएमसीजी,ऑटो,रिअल्टी समभागात घसरण झाली असली तरी मिडिया, पीएसयु बँक या समभागात तेजी झाली होती.एसबीआय, आयशर मोटर्स ,टेकम हिंद्रा, रिलायन्स, एसबीआय,आयसीआयसीआय बँक या समभागात आज वाढ झाली झाल्याने रॅली झाली आहे. तर ब्रिटानिया ,टाटा कनज्यूमर, एक्सिस बँक, कोटक महिंद्रा या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
आज दुपारी शेअर बाजारात ४२० अंशाने बीएसईत व १२० अंशाने अधिक वाढ एनएसईत झाली होती. अखेरीस मात्र निर्देशांक १४९.९८ अंशाने वाढत ७६६०६.५७ पातळीवर स्थिरावला होता तर निफ्टी ५८.१० अंशाने वाढत २३३२२.९५ पातळीवर स्थिरा वला होता. आज बीएसईत व एनएसईत अनुक्रमे ०.२० व ०.२५ टक्क्यांनी वाढ झाल्याने निर्देशांक वरच्या बाजूला झुकला होता.
बीएसईत आज पॉवर ग्रीड, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्लू स्टील, एचडीएफसी लाईफ, टाटा स्टील, एचसीएलटेक, एसबीआय, रिलायन्स, सनफार्मा, विप्रो, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक या समभागात वाढ झाली आहे तर एम अँड एम, एचयुएल, इन्फोसिस, एक्सिस बँक, नेस्ले, कोटक महिंद्रा, आयटीसी, एशियन पेंटस या समभागात घसरण झाली आहे.
एनएसईत कोल इंडिया,पॉवर ग्रीड,आयशर मोटर्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, टेक महिंद्रा, श्रीराम फायनान्स, बजाज फाय नान्स, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, बीपीसीएल, अपोलो हॉस्पिटल, लार्सन, भारती एअरटेल, जेएसडब्लू स्टील, ओएन जीसी, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, सनफार्मा, रिलायन्स, एसबीआय, डॉ रेड्डीज, इंडसइंड बँक, विप्रो, हिंदाल्को, एशियन पेंटस, आयसीआयसीआय बँक, हिरो मोटोकॉर्प या समभागात फायदा झाला असून एम अँड एम, ब्रिटानिया, एचयुएल, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, टायटन कंपनी, इन्फोसिस, अदानी पोर्टस, डिवीज, ग्रासीम, कोटक महिंद्रा, नेस्ले, मारूती सुझुकी, अदानी एंटरप्राईज या समभागात घसरण झाली आहे.
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'अमेरिकन फेडमध्ये समाधानकारक महागाईचे अपेक्षित आकडे ,त्यानुसार व्याजदर कपात, या दोन दिवसांत होईल का जुलै किंवा सप्टेंबर मधे ढकलली जाईल याकडे सर्व देश डोळे लावून बसले आहेत.भारतात व्याजदर कपातनंतरच्या काळात लगेचच अपेक्षित आ हे.आजच्या अमेरिकेतील बैठकीमुळे बाजार थोडा 'लाईव्ह ' राहीला. रिलायन्स,एचडीएफसी स्टेट बँक,बजाज फायनान्समुळे नि र्देशांक पॉझिटिव्ह दिसला.बाजारात एकंदरीत वातावरण ठीक होतं. आजच्या अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल नाहीतर काही दिवस बाजार करेक्शन,आणि कंसोलीडेशन करतच राहील. जुलैनंतर परत रिझल्ट सीझन सुरू होईल व बाजारात चैतन्य दिसेल.'
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, ' यूएस चलनवाढ डेटा आणि FOMC बैठकीपूर्वी, जागतिक बाजार मोठ्या प्रमाणावर सकारात्मक राहिले. एकमत यूएस चलनवाढीच्या स्थिरतेच्या अपेक्षा दर्शवते, परंतु संभाव्य दर कपातीचा मार्ग भविष्यातील दिशेसाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण दरक पातीच्या अपेक्षा पूर्वीच्या ३ वरून २ वर आल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठ विकासावर लक्ष केंद्रित करून अंतिम अर्थसंकल्पा च्या अपेक्षेनुसार नवीन उच्चांकावर व्यापार करत असताना, जीडीपी वाढीच्या अंदाजात आरबीआयच्या अपग्रेडमुळे वाढ झा ली आहे.'
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 'यूएस चलनवाढ डेटा आणि FOMC बैठकीपूर्वी, जागतिक बाजार मोठ्या प्रमाणावर सकारात्मक राहिले. एकमत यूएस चलनवाढीच्या स्थिरतेच्या अपे क्षा दर्शवते, परंतु संभाव्य दर कपातीचा मार्ग भविष्यातील दिशेसाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण दर कपातीच्या अपेक्षा पूर्वीच्या ३ व रून २ वर आल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठ विकासावर लक्ष केंद्रित करून अंतिम अर्थसंकल्पाच्या अपेक्षेनुसार नवीन उच्चां कावर व्यापार करत असताना, जीडीपी वाढीच्या अंदाजात आरबीआयच्या अपग्रेडमुळे वाढ झाली आहे.'
बाजारातील परिस्थितीविषयी व्यक्त होताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, ' सलग तिसऱ्या दिवशी बाजार एका अरुंद श्रेणीत राहिले आणि किंचित वाढीसह संपले. सुरुवातीच्या चढ-उतारानंतर, निफ्टी सुरुवातीच्या तासांमध्ये वाढला परंतु निवडक हेवीवेट्समधील नफा-टेकिंगमुळे नफा कमी झाला. तो शेवटी ०.२ % ने २३३२२.९५ वर स्थिरावला. क्षेत्रीय कल संमिश्र होता, ऊर्जा, आर्थिक आणि धातू उच्च पातळीवर बंद झाले, तर एफएमसीजी आणि वाहन क्षेत्र कमी झाले. विस्तृत निर्देशांकांनी उसळण दाखवणे सुरू ठेवले, प्रत्येकाने एका टक्क्यापेक्षा जास्त वाढ केली.
तीन दिवसांच्या एकत्रीकरणानंतर, गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारांमध्ये यूएस फेडच्या बैठकीच्या निकालावर बाजारांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे अपेक्षित आहे, जे दिवसासाठी टोन सेट करू शकते. घट झाल्यास निफ्टी २३०००- २३१०० झोनमध्ये राहील, तर २३६००-२३८०० झोन तत्काळ प्रतिकार म्हणून काम करू शकेल असा आमचा अंदाज आहे. या परिस्थितींमध्ये,आम्ही सातत्याने स्वारस्य असलेल्या क्षेत्रांवर आणि थीमवर लक्ष केंद्रित करून, डिपवर खरेदीच्या संधी शोधण्याच्या आमच्या शिफारसीचा पुनरु च्चार करतो.'
आजच्या रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी करन्सी व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले,'सोन्याचा व्यापार ७१४५०-७१५०० च्या आसपास झाला कारण बाजारातील सहभागी संध्याकाळी युएस सीपीआय डेटा रिलीझची आणि आज रात्री युएस फेडच्या धोरण घोषणेची वाट पाहत आहेत. या घटनांमुळे सोन्याच्या किमतींमध्ये उच्च अ स्थिरता निर्माण होण्याची अपेक्षा आहे. सध्या, सोन्याला ₹ दरम्यान समर्थन मिळतो. ७०५००-७०००० आणि ७२५००-७३००० रुप यांच्या रेंजमध्ये प्रतिकाराचा सामना करावा लागतो आणि सीपीआय (CPI) डेटा आणि फेडचा धोरणात्मक निर्णय पुढील किमती ची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, संभाव्यत: या समर्थन आणि प्रतिकार स्तरांमध्ये लक्षणीय हालचाली सुरू होतील '.
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च ऋषिकेश येडवे म्हणाले, ' निफ्टीने २३४४१.९५ चा नवीन विक्रमी उच्चांक गाठल्याने बुधवारी भारतीय इक्विटी बाजार सकारा त्म कपणे उघडले, परंतु त्यानंतर निर्देशांकाने नफा बुकिंग अनुभवले आणि दिवसाचा समारोप २३३२३ वर सकारात्मक नोटेवर झा ला.तांत्रिकदृष्ट्या,गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांपासून, निर्देशांकात वाढ झाली आहे. २३०००- २३५०० श्रेणीत एकत्रीकरण करणे,२३५०० चा आकडा ओलांडणे कठीण आहे अशा प्रकारे, जोपर्यंत निर्देशांक २३५०० च्या खाली राहतो तोपर्यंत नफा बुकिंग शक्य आहे. अल्पकालीन निर्देशांक २३७००- २३८०० पातळीपर्यंत वाढू शकतो, डाउनसाइडवर, निफ्टीला २३००० च्या जवळ, त्यानंतर २२६ ८० जेथे ३४ -दिवसीय एक्सपोनेन्शियल मूव्हिंग सपोर्ट (MADE) ठेवले आहे.'
बँक निफ्टी निर्देशांक एका अंतराने उघडला, परंतु नंतर दिवसाच्या सकारात्मक नोटवर 49,895 वर बंद होण्यापूर्वी एका अरुंद श्रेणीत एकत्रित झाला. दैनंदिन प्रमाणात, बँकनिफ्टी ट्रिस्टार डोजी कँडलस्टिक पॅटर्न बनवते. या पॅटर्ननुसार, जर निर्देशांक 49, 530 च्या खाली टिकला तर नफा बुकिंग शक्य होऊ शकते. डाउनसाइडवर, निर्देशांकासाठी त्वरित समर्थन 49,000 स्तरांजवळ ठेवले जाते, जेथे 21-DEMA ठेवले जाते.
आजच्या रुपयातील हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'रुपयाने ८३.५१ -८३.५७ च्या मर्यादेत सपाट व्यवहार केला कारण डॉलरचा निर्देशांक वाढीनंतर $१०४.८० च्या जवळ स्थिरावला. आता फोकस युएस सीपीआय डेटाकडे वळला आहे, जो संध्याकाळी रिलीज होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे डॉलरमध्ये अस्थि रता वाढू शकते. जरी रुपया श्रेणीबद्ध दिसत आहे, तो घसरण्याचा धोका आहे कारण रुपयाचा प्रतिकार ८३.२५ वर आहे, ८३.७५ वर समर्थन आहे.'