मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या अपहरणाचा व्हिडिओ समोर आला होता. त्याचे कारण समोर आले असून लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘ड्रामा ज्युनिअर्स’ हा कार्यक्रम सुरु होणार असून या कार्यक्रमाच्या परिक्षणासाठी या दोन्ही कलाकारांचे बाल कलाकार स्पर्धकांनी अपहरण केले होते.
‘ड्रामा ज्युनिअर्स’ या कार्यक्रमाचे संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकर परीक्षक असणार आहेत तर श्रेया बुगडे ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रम २२ जूनपासून शनिवार-रविवार रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.
दरम्यान, ‘झी मराठी’च्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमानंतर आणखी एक नवी मालिका सुरू होणार असून यात अभिनेता नितीश चव्हाण व अभिनेत्री दिशा परदेशीची मुख्य भूमिका असणार आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ असे या मालिकेचे नाव असून या मालिकेत नितीश व दिशा व्यतिरिक्त अभिनेत्री कोमल मोरे, समुद्धी साळवी, इशा, जुई तनपुरे या सूर्यादादाच्या बहिणी म्हणून झळकणार आहेत.