“विचार आणि शिस्त यामुळे रा.स्व संघाशी जोडला गेलो” - सुनील बर्वे

Total Views |

sunil barve 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : अभिनेते, गायक, निर्माते सुनील बर्वे सध्या स्वरगंधर्व सुधीर फडके या चरित्रपटामुळे चर्चेत आहेत. आजवर नाटक, मालिका, चित्रपट या मनोरंजनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेच. शिवाय सध्या सुनील बर्वे संस्कार भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष म्हणून कामकाज पाहात आहेत. ‘महाएमटीबी’च्या ‘Unfiltered गप्पा With कलाकार’ या कार्यक्रमात सुनील बर्वे यांनी हजेरी लावत राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत ते कसे जोडले गेले याबद्दल त्यांनी सांगितलं.
 
सुनील बर्वे सध्या संस्कार भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष असून त्यांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कसा संबंध आला याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “मी शाखेत जाणारा स्वयंसेवक कधीच नव्हतो. पण आई-वडिलांकडून मला जी संघाची शिस्त आणि विचारधारा मिळाली त्यामुळे मी संघाशी जोडले गेलो. ज्यावेळी मी संस्कार भारतीचा उपाध्यक्ष झालो त्यावेळी संघाचा विचारांशी माझी अधिक ओळख झाली आणि त्याचवेळी संघाच्या कामाची व्याप्ती किती आहे याबद्दलही मला तेव्हाच समजलं. पण इचकं मोठं कार्य फार उशीराने कळलं याचं दु:ख मला नक्कीच झालं. ज्या निर्व्याज, निरपेक्ष भावनेनं संघाचं काम सुरु आहे ते विलक्षण आहे. आणि उगाच कोणत्याही प्रसिद्धी शिवायही ते ज्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे ते पोहोचत आहे”, अशी संघाबद्दलच्या भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या.
 
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.