वक्फ बोर्डाप्रमाणे सनातन बोर्डसुद्धा असला पाहिजे! : देवकीनंदन ठाकुर महाराज

    06-May-2024
Total Views |

Devkinandan Thakur Maharaj

मुंबई (प्रतिनिधी) :
'वक्फ बोर्डाप्रमाणे सनातन बोर्डसुद्धा (Sanatan Board) असला पाहिजे!', असे मत देवकीनंदन ठाकुर महाराज यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सनातन बोर्डाच्या निर्मिती संदर्भात आपली भूमिका मांडल्याचे दिसते आहे.

हे वाचलंत का? : विठ्ठल-रुक्मिणी गाभारा संवर्धन कामासंदर्भात महत्त्वाची अपडेट

सनातन बोर्डाच्या मागणीला धरून महाराज पुढे म्हणाले, "वक्फ बोर्ड बनवण्याची गरज काय? वक्फ बोर्डास इतके अधिकार का देण्यात आले? इतके नियम-अटीशर्ती का तयार केल्या गेल्या? जर भारताचे संविधान सर्वांसाठी समान असेल, मग अशाप्रकारचे आणखी एक कायदा का? असे असेल तर सनातन बोर्डसुद्धा निर्माण झाला पाहिजे. वक्फ बोर्डाकडे जितके अधिकार आहेत, तेवढेच सनातन बोर्डाला सुद्धा अधिकार मिळाले पाहिजेत. यासाठी आम्ही जनजागृती करू. त्यामुळे निवडणुकीनंतर आमचे दोनच उद्देश असतील, पहिले श्रीकृष्णजन्मभूमी संदर्भात आवाज उठवणे आणि दुसरे म्हणजे वक्फ बोर्डाप्रमाणे सनातन बोर्डाचीसुद्धा निर्मिती झाली पाहिजे."