विठ्ठल-रुक्मिणी गाभारा संवर्धन कामासंदर्भात महत्त्वाची अपडेट

    06-May-2024
Total Views |

Vitthal Rukmini Pandharpur
(Vitthal-Rukmini)

मुंबई (प्रतिनिधी) :
पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal-Rukmini) मंदिर संवर्धन व जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरु आहे. यात दोन्ही ठिकाणच्या गाभाऱ्याच्या संवर्धनाचे काम १५ मार्च पासून सुरु करण्यात आले होते. ४५ दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र कामादरम्यान नव्याने दुरुस्ती कराव्या लागणाऱ्या कामांचीही भर पडल्याने उर्वरीत काम मे अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली.

हे वाचलंत का? : हर हर महादेवाच्या जयघोषात बाबा केदारनाथच्या पंचमुखी विग्रह मूर्तीचे प्रस्थान

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धाराच्या कामासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये गाभारा संवर्धन कामाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी मंदिर समिती सदस्यांसह पुरातत्व विभागाचे अधिकारी, काही वास्तुविशारद, अतुलशास्त्री भगरे गुरुजी आदि मंडळी उपस्थित होती. महिनाअखेरीस काम पूर्ण करून भाविकांना विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.