दशकांनंतर शरद पवार करणार बारामतीतून मतदान!

    06-May-2024
Total Views |
 
Sharad Pawar 
 
पुणे : लवकरच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून यामध्ये बहुचर्चित बारामती लोकसभेचाही समावेश आहे. दरम्यान, अनेक दशकांनंतर शरद पवार या मतदारसंघातून मतदान करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
 
येत्या ७ मे रोजी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. यावेळी बारामती लोकसभेतही मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर यंदा बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. याठिकाणी प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे.
 
हे वाचलंत का? -  रात्रीस खेळ चाले! उबाठा गटाचा बडा नेता मध्यरात्री शिवसेनेत
 
बारामती लोकसभेत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून जोरदार प्रचारही करण्यात आला आहे. मात्र, इथे कोण बाजी मारणार हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
 
दरम्यान, शरद पवार हे अनेक दशकांनंतर बारामतीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार मुंबईमध्ये मतदान करत होते. परंतू, यावेळी सुप्रिया सुळेंसाठी ते बारामती तालुक्यातील माळेगाव इथे मतदानाचा हक्क बजावणार आहेत.