'...तर राम मंदिराचा निकाल फिरवू'; राहुल गांधींनी वक्तव्य केल्याचा मोठा दावा

    06-May-2024
Total Views |

Rahul Gandhi

मुंबई (प्रतिनिधी) :
अयोध्येतील श्रीराम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय सत्तेत येताच उलटून टाकला जाईल. ही काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधींची (Rahul Gandhi) भूमिका असल्याचा मोठा दावा काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णन यांनी केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर आचार्य प्रमोद कृष्णन यांनी केलेल्या विधानामुळे राहुल गांधींच्या अडचणीत चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे.

हे वाचलंत का? : दशकांनंतर शरद पवार करणार बारामतीतून मतदान!

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना आचार्य म्हणाले की, "मी काँग्रेस पक्षीत ३० हून अधिक वर्षे कार्यरत होतो. राम मंदिराचा ऐतहासिक निर्णय जेव्हा आला आणि राम मंदिर निर्माणाचे कार्य सुरु झाले तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या निकटवर्तीयांसह एका बैठक घेतली होती. त्यामध्ये अमेरिकेत राहणारे त्यांचे एक शुभचिंतकही होते. बैठकीत राहुल गांदी म्हणाले होते, जर आगामी निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आल्यास ते एक शक्तिशाली न्यायिक आयोग स्थापन करतील आणि राजीव गांधींनी ज्याप्रमाणे शाहबानोचा निर्णय उलटवला होता, त्याचप्रमाणे राममंदिराचा निर्णयही उलटून टाकला जाईल."


सत्तेत आल्यानंतर राममंदिराचे रुपांतर रुग्णालयात करणार का?
सत्तेत आल्यानंतर राममंदिराचे रुपांतर रुग्णालयात करणार का? सत्तेत आल्यानंतर काशी विश्वनाथ कॉरिडोअरवर बुलडोझर चालवणार का? असा खडा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला विचारला आहे. रविवार, दि. ५ मे रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यातील धौरहरा येथील प्रचारसभेत ते बोलत होते.