मुंबईच्या पूनम क्षीरसागर या तरूणीची हत्या निजामउद्दीनने केली. ‘लव्ह जिहाद’च्या या घटनेने मातंग समाजात प्रचंड आक्रोश आहे. समाजाने ‘मातंग विकास परिषद’ अंतर्गत दि. 2 मे रोजी अण्णाभाऊ साठे नगर, मानुखर्द येथे या घटनेविरोधात निषेध रॅली आणि सभेचेही आयोजन केले होते. सामाजिक कार्यकर्ता म्हणून रॅली-सभा नियोजन आणि कार्यवाहीमध्ये सहभागी होते. पूनमच्या हत्येचे समाजात काय पडसाद उमटले? तसेच या सभेचे अंतरंग काय? निष्पन्न काय? याबाबत या लेखातून घेतलेला हा सविस्तर आढावा...
ठे आहेत ते जय भिम जय मीम बोलणारे **घाले? आमच्या लेकराचा जीव घेतला त्या निजामानं. पण, आता त्यांची तोंड उचकटत नाहीत. आता यापुढे आमच्या मुलीवर अत्याचार कराल, तर वस्ताद लहुजींचा दांडपट्टा फिरवून तुम्हाला चराचरा कापून काढू,” जय भिम आर्मीचे अध्यक्ष नितीन मोरे म्हणाले आणि अण्णा भाऊ साठे नगरात त्या आंदोलनात उपस्थित असलेल्या शेकडो लोकांनी त्यांच्या विधानाला जोरदार समर्थनही दिले. अण्णा भाऊ साठे नगर आणि परिसरातील मातंग समाजातील व्यक्ती, संघटना यांनी ‘मातंग विकास परिषदे’च्या अंतर्गत्त ‘लव्ह जिहाद’ची बळी ठरलेल्या पूनम क्षीरसागर हत्याकांडा- विरोधात निषेध सभा आयोजित केली. त्या सभेत ते बोलत होते. मला जाणवले की, पूनमच्या हत्येने अण्णा भाऊ साठे नगरातील प्रत्येकाच्या मनात दु:ख आणि संतापाची लाट आहे. हा उद्रेक किती असू शकतो? सभेआधी रॅली होती. रॅली सुरू होण्याआधी 15 ते 17 वयाची तीसएक मुलं गोळा झाली. त्यांच्या डोळ्यात अंगार फुललेला. ते म्हणत होते- ”आमच्या बहिणी शाळेसाठी, कामासाठी वस्तीबाहेर जातात. आज पूनमताईसोबत झालं, उद्या त्यांच्यासोबत पण होईल. आमच्या वस्तीच्या आसपास पण ते लोक दिसायला नकोत. आज आम्ही सगळे जमलोय, आम्हाला बघायचं आहे अजून किती निजाम इथं फिरतात.” त्यांचा संताप पाहून क्षणभर वाटले यांना कसं समजवायचं? पण, स्थानिक ज्योती साठे, किशोर मोरे, हेमंत भास्कर यांनी त्या मुलांना समजावले की ”शांत राहा.
पूनमताईला न्याय मिळेलच आणि यापुढे वस्तीत दुसरी अशी घटना होऊ नये म्हणून आपण सगळे मिळून लक्ष देऊ.” त्यांना हे सगळे किती पटले ते माहिती नाही. गेले दशकभर ज्योती साठे या वस्तीत सामाजिक कार्य करत असल्याने तिच्या एका हाकेवर शेकडो आयाबाया आंदोलनात सामील झाल्या. किशोर मोरेही स्थानिक सामाजिक कार्यकर्ता. त्यामुळे त्याच्या हाकेवरही लोकं जमू लागले. राम अवघडे, हेमंत भास्कर, शरद कांबळे यांनीही रॅलीमध्ये समाजातील मंडळींनी सहभागी व्हावे, म्हणून जोर लावला. कामधंदे, रोजंदारी सोडून 800च्या पुढे संख्येने लोक सहभागी झाले. सगळ्यांच्या चेहर्यावर शोककळा, दु:ख आणि संताप. त्यांचा संताप योग्यच होता.
पूनम ही गरीबाघरची लेक. अठराविश्व दारिद्य्र असलेल्या घरात ती एकटीच कमावती. घरकाम करून तिने वडिलांच्या पश्चात घर सांभाळलेले. घरदार नसलेल्या आणि सँडहर्स्टरोडच्या रस्त्यावर टॅक्सीतच राहणारा टॅक्सी ड्रायव्हर निजामाउद्दीन अली. त्याची बिबी-पोरं गावाला. त्याने कल्याण परिसरात पूनमची गळा दाबून हत्या केली. तिचे प्रेत गोणीत बांधून उरणला फेकले. एकट्या निजामचे हे कामच नव्हते. नुकतेच पोलिसांनी उरणच्या दिघोडी गावात फूड स्टॉल लावणार्या 19 वर्षांच्या सोहेल खानला पकडले. पूनमच्या हत्याकांडात त्याने निजामला मदत केली होती. कालपर्यंत साठे नगरातील कष्टकर्यांनी ‘लव्ह जिहाद’ हा शब्द फक्त ऐकला होता. कधी श्रद्धा वालकर, तर कधी दिल्लीच्या साक्षीच्या मृत्यूनंतर. मात्र, आज त्यांच्याच वस्तीतल्या लेकीची हत्या झाली होती. त्यामुळे या वस्तीत आक्रोश होता. वस्तीत ‘दलितांना, कष्टकर्यांना न्याय आम्हीच मिळवून देऊ ’ असे म्हणणार्या कम्युनिस्ट विचारांच्या, पुरोगामी मानवातवादी वगैरे अनेक संस्था आहेत. पण, या घटनेवर त्यांची अळीमिळी गुपचिळी असणारच; कारण खुन्याचे नाव निजामउद्दीन आहे.
या पार्श्वभूमीवर पूनमच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी सकल हिंदू समाज पुढे सरसावला. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री बजरंगलाल बागडा अशा सर्वच संवेदनशील व्यक्तींनी पूनमच्या कुटुंबाला धीर दिला. इतरही अनेक राजकीय नेते इथे आले. रा. स्व. संघ आणि त्याअंतर्गत येणार्या सगळ्याच संघटनांनी पूनमच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. खुनी नराधमांना शासन केल्याशिवाय शांत राहणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यामुळे आपली वस्ती, आपला समाज एकटा नाही, अशी जाणीव साठे नगरमध्ये निर्माण झाली. ’आमच्या लेकीबाळींच्या नादी लागाल, तर तुम्हाला गाडून टाकू ’हा संदेश जिहादी नराधमांना देण्यासाठी समाजाने ’मातंग विकास परिषद’अंतर्गत पूनम हत्याकांड निषेध रॅली-सभा घेण्याचे ठरवले. कष्टकरी बांधव शिस्तबद्ध पद्धतीने तीन तीनच्या रांगा करून हातात पूनमच्या हत्येच्या निषेधाचे बॅनर, फलक घेऊन रॅलीत सहभागी झाले. रॅली अण्णा भाऊ साठे प्रवेशद्वारातून सुरू झाली. ती पुढे लल्लूभाई कंपाऊंड संविधान चौकाकडून पुन्हा अण्णा भाऊ साठे नगरात मांगिरबाबा मंदिराच्या जवळ समाप्त झाली. तिथे या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. सभेच्या व्यासपीठावर फक्त पूनमचे कुटुंबच बसेल, सभेचे वक्ते खालीच उभे राहतील, एकही राजकीय नेता व्यासपीठावर नसेल, हे आधीच समाजाने ठरवलेले. या सभेच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्याकडे होती.
पूनमला श्रद्धांजली देऊन सभेची सुरुवात झाली. सुरुवातीला ज्योती साठे यांनी प्रास्ताविक केलेे. त्या म्हणाल्या ”दोन वर्षांपूवी चेंबूर पी. एल. लोखंडे मार्ग येथे रूपाली चंदनशिवेची हत्या झाली. आज माझ्या समाजभगिनीची पूनम क्षीरसागरची हत्या झाली. यापुढे समाजातील कोणत्याही मुलीवर झालेला अत्याचार सहन केला जाणार नाही. एकजूट करून समाज अत्याचार्याला धडा शिकवेल. आज मी शपथ घेते की, माझ्या मातंग समाजातल्या एकाही मुलीसोबत असे होणार नाही, यासाठी मी प्रत्येक क्षणी, प्रत्येक स्तरावर काम करणार. माझा समाज मागणी करतोय की, सरकारने ‘लव्ह जिहाद’विरोधात कडक कायदा करावा. तसेच पूनमताईंच्या गुन्हेगाराला फाशीची सजा झालीच पाहिजे.” त्यानंतर वर्षा भोसले यांनी विचार मांडले. ‘लव्ह जिहादी’ प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी धर्म-संस्काराचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले, तर राम अवघडे यांनी पालकांनी आपल्या पाल्यांकडे आता विशेष लक्ष द्यायलाच पाहिजे. युवक-युवतींनीही कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, स्वत:चे आयुष्य घडवावे, याबद्दल समाजाला आवाहन केले. यानंतर नरेश पाटील यांनी वस्तीपातळीवर ‘लव्ह जिहादी’ कशा प्रकारे निष्पाप मुलींना जाळ्यात फसवतात, हे अगदी सोप्या भाषेत सांगितले.
जिहादी मानसिकतेचा नायनाट करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन जागरुक व्हायला हवे, असे ते म्हणाले. त्यानंतर किशोर मोरे यांनी सभेसमोर विचार मांडले. ते म्हणाले, ”आमच्या ताईची निर्घृण हत्या झाली. कोणत्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये. मी समाजातल्या लेकींना विनंती करतो की, तायांनो शिका, स्वत:च्या पायावर उभ्या राहा. आमची इज्जत आमचा अभिमान तुम्ही आहात. तुमच्यासोबत तुमचा किशोर दादा आणि अख्खा समाज आहे. समाजात यासंदर्भात जागृती यावी आणि पुढे कुणीही विकृत प्रवृत्तीच्या जाळ्यात फसू नये, यासाठी आम्ही डोळ्यात तेल घालून लक्ष देऊ यासाठी प्रयत्न करू.” त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता प्रिती राऊत यांनी विचार मांडले. पूनमच्या खुन्यावर अॅट्रोसिटी तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल पाहिजे, ‘लव्ह जिहाद’विरोधात कडक कायदा निर्माण करावा, अशी त्यांनी मागणी केली. त्यानंतर ‘जयभिम आर्मी’चे नितीन मोरे यांचे मार्गदर्शन केले. मातंग समाजाच्या कथा, व्यथा, कष्ट, इतिहास त्यांनी ओघवत्या आणि स्थानिक वस्तीच्या भाषेते मांडले. ’‘पूनमताईची हत्या करणारा निजाम आहे, म्हणून का पुरोगाम्यांनी ताईच्या मृत्यूनंतर कँडल मार्च काढला नाही” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘दलित-मुस्लीम भाई-भाई बोलणारे कुठच्या कोपर्यात लपलेत? आम्ही लहूजींच्या आणि अण्णाभाऊंच्या रक्ताचे लोक आहोत, आम्ही एक झालोय.
आमच्या लेकीबाळीकडे वाकड्या नजरेने पाहणार्यांना आता आम्ही लहुजींच्या दांडपट्ट्याने चराचरा कापू.” ते असे म्हणाले आणि इतका वेळ पूनमच्या आठवणीने डोळे पुसत उभ्या असलेल्या आयाबाया, ते संतापलेले लोक, ‘आम्हाला आमच्या वस्तीत एकही निजाम नाही पाहिजे’ म्हणणारे ती किशोरवयीन मुलं मुठी आवळून म्हणू लागली- “आमच्या पूनमताईला न्याय मिळालाच पाहिजे, तिच्या खुन्याला फाशीची सजा होणारच. आमच्या लेकीकडं वाकडी नजर करणार्या निजामच्या अवलादिंनो धूर आन जाळ संंगट काढू. जय लहूजी!” त्यानंतर ज्योती साठे, किशोर मोरे, राम अवघडे, शाहीर सुनिल साठे, पूनमचे कुटुंब हे सगळे व्यासपीठावर एकत्र उभे राहिले. ज्योती साठे यांनी समाजाला शपथ दिली - ”आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे आणि आद्यक्रांतिकारक लहुजी वस्तादांची शपथ घेतो की, यापुढेही आम्ही एकजुटीने राहणार. पूनमताईला न्याय मिळेलच. समाजात अशी घटनाच घडू नये, यासाठी काळजी घेणार, जागरुक राहणार. लेकींना शिकवून-सवरून इतकं सक्षम बनवणार की, यापुढे कुणीही आमच्या लेकींना फसवू शकणार नाही. जय लहुजी!” पूनमची हत्या करणार्या त्या हिंसक खुनी मानसिकतेविरोधात समाजात त्वेष उत्पन्न झाला होता. पूनमच्या हत्येविरोधात झालेली एकी आता कायम ठेवायची. राजकीय, सामाजिक गटतट सोडून आता ‘हिंदू-मातंग’ म्हणून एक राहायचे. देव, धर्म, संस्कृती, कुटुंब आणि समाज जपायचा, असा समाजाने संकल्प केला.
- ९५९४९६९६३८