आरबीआयकडे दोन हजारांच्या ९७.७६ टक्के नोटा परत !

चलनातील नोटा आरबीआयच्या कुठल्याही कार्यालयात परत करण्याची मुभा

    03-May-2024
Total Views |

RBI
 
 
मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या ९७.७६ टक्के नोटा परत आल्याचे म्हटले आहे. २००० रुपयांच्या ९७.७६ टक्के नोटा परत आल्या असताना ७९६१ कोटी किंमतीच्या नोटा अजून लोकांकडे असल्याचे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. १९ मे २०२३ ला आरबीआयने २००० नोटा रद्द केल्याचे सांगत लोकांकडून त्या परत मागितल्या होत्या त्यातल्या बहुतांश नोटा आरबीआयकडे परत आल्या असल्या तरी काही नोटा लोकांकडे शिल्लक आहेत.
 
१९ मे पर्यंत २००० रुपयांच्या नोटा वितरणात आल्या असताना त्यांचे मूल्य एकूण ३.५६ लाख कोटी होते. जेव्हा बँकेने नोटा परत मागवल्या होत्या तेव्हा ७९६१ कोटींच्या नोटा आरबीआयने नाकारल्या होत्या असे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर आरबीआयने अजनूही २००० नोटांचा अधिकृत दर्जा ठेवलेला आहे.
 
यापुढे शिल्लक असलेल्या २००० रुपयांच्या नोटा आरबीआयच्या कुठल्याही १९ कार्यालयात लोक जमा करू शकतात असे आरबीआयने म्हटले आहे. याशिवाय पोस्ट ऑफिस अथवा बँकेमार्फत व्यवहार करू शकतात. आरबीआयने २००० चलनाच्या परताव्याची मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ठेवली होती आता पैसे जमा करण्याची अंतिम मुदत ७ ऑक्टोबर पर्यंत वाढवली होती.