रणदीप हुड्डाने पोर्ट ब्लेयर येथे साजरी केली स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती

    29-May-2024
Total Views |
randeep  
 
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त झी५ वर प्रदर्शित झालेल्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाच्या यशामुळे सध्या अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा भारावला आहे. नुकताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१ जयंतीनिमित्त मुंबईतील दादर भागात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर आणि विनायक दामोदर सावरकर यांचे निकटवर्तीय रणजीत सावरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात रणदीपला 'स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार' प्रदान करण्यात आला. क्रांतिकारी नेत्याच्या जीवनाचे अस्सल, प्रामाणिक आणि सच्चे प्रतिनिधित्व करण्याचे प्रयत्न आणि समर्पणासाठी रणदीपचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
 
याव्यतिरिक्त, वीर सावरकरांच्या १४१ व्या जयंतीपूर्वी आणि झी५ वर सिनेमाच्या जागतिक डिजिटल प्रीमिअर आधी, रणदीप हुड्डाने पोर्ट ब्लेअर या शहराला भेट दिली. या शहराचे सावरकरांच्या जीवनाशी घनिष्ठ नाते आहे. रणदीपने प्रतिष्ठित सेल्युलर तुरुंगाला भेट दिली. इथल्याच कोठडीत महान क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाला एकूण पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यावेळी अभिनेत्याने तुरुंगातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत केक कापून सावरकरांचे जीवन आणि वारसा साजरा केला.
 
रणदीपसाठी हा आठवणींचा प्रवास ठरला. कारण त्याने यापूर्वी चित्रीकरणासाठी सेल्युलर तुरुंगाला भेट दिली होती. रणदीपने रॉस बेटाला देखील भेट दिली. जिथे सावरकरांना गोळी मारण्यात आली होती. तसेच फ्लॅग पॉईंट जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 30 डिसेंबर 1943 रोजी भारतीय भूमीवर प्रथमच भारतीय ध्वज फडकवला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन आणि वारशाचा उत्सव 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या विशेष स्क्रिनिंगद्वारे साजरा झाला. यावेळी रणदीप हुड्डा पत्नीसमवेत उपस्थित राहिला. अंदमान आणि निकोबार बेटांचे माननीय राज्यपालांनी विशेष स्क्रिनिंगचे आयोजन केले होते.
 
या प्रसंगी रणदीप हुड्डा म्हणाला, "वीर सावरकरांनी अपार दुःख सहन केले. परंतु भारताच्या स्वातंत्र्याप्रती त्यांच्या वचनबद्धतेमध्ये कधीही डगमगले नाहीत, अशा ऐतिहासिक आणि भयानक सेल्युलर तुरुंगात उभे राहणे अत्यंत नम्र आहे. त्यांची कथा लवचिकता आणि देशभक्तीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे.  या कलाकृतीच्या माध्यमातून, महान क्रांतिवीराचा विलक्षण प्रवास समोर आणणे आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दुःख सहन केले. त्या ठिकाणी आपल्या नायकाच्या जयंतीनिमित्त मला येथे आमंत्रित केल्याबद्दल अंदमान आणि निकोबार बेटांचे माननीय राज्यपालांचे आभार मानतो. टॅब्लॉईडवर 'काला पानी' प्रदर्शित करण्यासाठी आणि 'स्वातंत्र्यवीर सावरकर'च्या निर्मितीसाठी प्रामाणिकपणे माझे रक्त, घाम आणि अश्रू गाळण्याच्या माझ्या प्रयत्नांचे फळ मिळाले आहे. या सिनेमाला सर्वदूर चाहत्यांकडून मान्यता आणि प्रोत्साहन मिळत आहे, यासाठी मी नम्र आहे ".
 
वीर सावरकर हे ब्रिटीश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्याचे प्रखर समर्थक आणि क्रांतिकारी चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. काळेपाणी म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या वसाहतवादी काळातील तुरुंगात वीर सावरकरांना एक दशकाहून अधिक काळ ठेवण्यात आले होते, ज्या दरम्यान त्यांनी सहकारी कैद्यांना प्रेरित केले आणि त्यांच्या लेखनाद्वारे स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. सेल्युलर तुरुंगातील त्यांचा संकल्प बळकट केला आणि हिंदुत्वाच्या त्यांच्या मूलभूत कार्यासह त्यांच्या लेखनाचा भारतीय राजकीय विचारांवर आजही प्रभाव आहे.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा एक प्रामाणिक चरित्रात्मक नाट्यपट आहे. जो आतापर्यंतचा सर्वात भयंकर असा भारतीय क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करतो. ते स्वातंत्र्यलढ्यातील भारतातील सर्वात प्रभावशाली परंतु वादग्रस्त व्यक्तींपैकी एक आहेत आणि तरीही लोकप्रिय संस्कृतीत त्यांच्याबद्दल फारच कमी माहिती किंवा लेखन उपलब्ध आहे. खरे तर ते 'हिंदुत्व' आणि 'अखंड भारत' चे प्रवर्तक आहेत. नेताजी, भगतसिंग आणि खुदीराम बोस यांच्यासारख्या महान नेत्यांमागील आणि स्वातंत्र्यसैनिकांमागील प्रेरणा आहेत. हा सिनेमा केवळ त्यांच्या दृष्टीकोनातून सावरकरांची कथा कथन करतो, निर्भयपणे त्यांच्या आदर्शांचा आणि विश्वासांचा स्वीकार करतो. जे सुरुवातीला वादग्रस्त होते. परंतु अखेरीस आधुनिक भारताच्या रचनेत त्यांचा मार्ग सापडला.