शेअर बाजार विश्लेषण: आज बाजारात चढउतार जोरदार अखेरीस बाजारात घसरण सेन्सेक्स २२०.०५ व निफ्टी ६९.४० अंशाने घसरला

बँक, रियल्टी, पीएसयु बँक निर्देशांकात घसरण हेल्थकेअर, फार्मा समभागात वाढ

    28-May-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात तुलनात्मकदृष्ट्या घसरण झाली आहे.आज सकाळच्या सत्रापासून बाजारात चढउतार कायम राहत अखेरीस बाजारात घसरण झाली. निवडणुकीच्या निकालपूर्वे देशांतर्गत व परदेशी गुंतवणूकदारांच्या चढाओढीत काल प्रमाणे अखेरीस बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांक २२०.०५ अंशाने घसरत ७५१७०.४५ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ६९.४० अंशाने घसरत २२८६३.०५ पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसई व एनएसई बँक निर्देशांकात देखील आज घसरण झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक १७४.२० अंशाने घसरत ५६०९७.०७ पातळीवर पोहोचला तर निफ्टी बँक निर्देशांक १२६.९० अंशाने घसरत ४९१५५.६० पातळीवर पोहोचला आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६० व ०.९९ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर एनएसईतील मिडकॅप व स्मॉल कॅपमध्ये ०.७४ व ०.६६ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Sectoral Indices) मध्ये विभाग विशेष प्रतिसाद कायम राहिला आहे. आज सर्वाधिक वाढ फार्मा (०.५२%), मिडिया (०.२६%), हेल्थकेअर इंडेक्स (०.४४%) समभागात वाढ झाली आहे तर सर्वाधिक नुकसान रिअल्टी (२.२२%), पीएसयु बँक (०.३९%) तेल गॅस (१.०९%) आयटी (०.४४%) समभागात झाले आहे.
 
आज बीएसईत एकूण ३९२२ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १२८२ समभागात वाढ झाली आहे तर १२८२ समभागात घसरण झाली आहे. आज १७५ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली असून ३७ समभागातील मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण २३३ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २९५ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
आज एनएसईत एकूण २६९९ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील ७७९ समभाग वधारले असून १८३३ समभागात घसरण झाली आहे तर ८८ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली असून ३५ समभागातील मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. ७६ समभाग (Shares) अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ११३ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
आज बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल ( Market Capitalisation ) ४१६.६५ लाख कोटी होते तर एनएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल ४१५.९२ लाख कोटी होते. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने रुपयांची किंमत ८३.१८ रुपये प्रति डॉलरवर स्थिरावली होती.
 
आज बाजारातील सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. सकाळच्या सत्रात सोन्याचे प्रति १० ग्रॅम दर २०० ते २४० रुपयांनी वाढले होते. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या युएस गोल्ड स्पॉट दर निर्देशांकात ०.३० टक्क्यांनी घसरण झाली आहे. युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.४४ टक्क्यांनी वाढ होत दर २३४४.६० पातळीवर पोहोचले होते. भारतातील एमसीएक्स (MCX) सोन्याच्या निर्देशांकात ०.२५ टक्क्यांनी घट झाली होत दर ७१८३० पातळीवर पोहोचले आहेत. गुड रिटर्न्स'या संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याचे प्रति १० ग्रॅम दर २०० ते २२० रुपयांनी वाढले होते.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओपेक राष्ट्रांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बाजारातील कच्च्या तेलाच्या दरात सकाळीच वाढ झाली होती. घटलेला पुरवठा, मध्यपूर्वेतील दबाव व ओपेक राष्ट्रांच्या बैठकीत कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याची शक्यता असल्यानं क्रूडचे संकट जागतिक पातळीवरील आले आहे. आगामी बैठकीत क्रूड उत्पादनात घट केल्यास आणखी कच्चे तेल महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय आगामी फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील हालचालींमुळे डॉलरच्या मुल्यांकनात फरक पडल्यानंतर याचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम देखील क्रूड तेलाच्या किंमतीत दिसू शकतो असा कयास मांडला जात आहे.
 
दुपारी ३.३० पर्यंत क्रूड तेलाच्या WTI Future निर्देशांकात १.५२ टक्क्यांनी वाढ झाली होती तर Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.१४ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर भारतातील एमसीएक्स क्रूड निर्देशांकात ०.३२ टक्क्यांनी वाढत पातळी ६५६८ रुपये प्रति बॅरेलवर पोहोचल्या आहेत.
 
बीएसईत एशियन पेंटस, जेएसडब्लू स्टील, विप्रो, एचयुएल, एचसीएलटेक, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, टायटन कंपनी , आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टीसीएस या समभागात वाढ झाली आहे तर पॉवर ग्रीड, एनटीपीसी, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, रिलायन्स, मारूती सुझुकी, आयटीसी, टाटा स्टील,अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा,बजाज फायनान्स, एसबीआय, इन्फोसिस, सनफार्मा,इंडसइंड बँक, नेस्ले, टीसीएस समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत डिवीज, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, ग्रासीम, हिरो मोटोकॉर्प, डॉ रेड्डीज, एशियन पेंटस, विप्रो, ब्रिटानिया, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, श्रीराम फायनान्स, हिंदाल्को, एचयुएल , बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, टायटन कंपनी, लार्सन, एम अँड एम, सिप्ला या समभागात वाढ झाली आहे. अदानी पोर्टस पॉवर ग्रीड, बीपीसीएल, कोल इंडिया, अदानी एंटरप्राईज, ओएनजीसी, एनटीपीसी, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, रिलायन्स, मारूती सुझुकी, अपोलो हॉस्पिटल, आयटीसी, आयशर मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा, इंडसइंड बँक, टाटा स्टील, बजाज फायनान्स, नेस्ले, एसबीआय, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, बजाज ऑटो, सनफार्मा या समभागात घसरण झाली आहे.
 
आज निवडणूक निकालपूर्वे काळात बाजारात समभागातील खाली वर येणे पुन्हा एकदा वाढले असून बाजारातील अस्थिरतेचा परिणाम आजही बाजारात जाणवला आहे. बाजारातील बहुतांश तज्ञांच्या मते भाजपा पुन्हा सत्तेत आली असली तरी बहुमत मिळेल की नाही यावर खलबत सुरू असल्याने बाजारातील गुंतवणूकदारांनी निकाल लागेपर्यंत सावधतेची भूमिका शक्य असू शकते. दुसरीकडे घसरलेला किंमतीमुळे गुंतवणूकदारानी ' नफा बुकिंग ' केल्याची शक्यता आहे. या कंसोलीडेशनच्या स्थितीत १२ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. अखेरीस तो २.९८ टक्क्यांनी खाली गेला होता. याशिवाय मिडकॅप स्मॉलकॅपमध्ये व बँक निर्देशांकातही घसरण झाल्याने बाजारात रॅली झाली नाही.
 
दुसरीकडे बाजारातील अस्थिरता कायम असताना अदानी पोर्टस, पॉवर ग्रीड, कोल इंडिया, ओएनजीसी अशा कंपन्यांच्या समभागात फायदा झालाआहे. तर एसबीआय लाईफ, ग्रासीम इंडस्ट्रीज, एचडीएफसी लाईफ अशा समभागात नुकसान झाले आहे. मे महिन्यात ८८ टक्क्यांनी वीआयएक्स (VIX Volatility Index) निर्देशांकात हालचाल झाली आहे. आज शेअर बाजारात ४२० लाख कोटींवरून बाजार भांडवल ४१७ कोटींवर आल्याने गुंतवणूकदारांना तीन लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना, ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, ' आजचा बाजार हा पूर्णपणे नफा वसुली करताना दिसत आहे. कालपासून नफा वसुली सुरू झाली आहे. आज सर्वच क्षेत्रात नफा वसुली झाली आहे. रिलायन्स,स्टेट बँक व इतर शेअर थोडे थोडे खाली आले आहेत.अजुन निवडणूक निकाल येईपर्यंत चार दिवसाचे कामकाजात काय काय बदल होतात ते पहाणे गरजेचे आहे. एकंदरीत बाजार चार तारखेची वाट पहात आहे.
 
तोपर्यंत मागील आठवड्यातील तेजीचे रोखीत रूपांतर करीत आहे. प्रत्येक नवीन उच्चांकानंतर करेक्शन ही खुप हेल्दी साईन आहे.पुढील आठवड्यात मंगळवारनंतर तेजीची तयारी करताना दिसतोय.अमेरिकेतील बाजार कच्चे तेल, डाॅलर याकडे आपला बाजार बघायलाच तयार नाही.अर्थात तिकडेही तेजीचेच वातावरण आहे.असाच बाजार एक दोन दिवस फ्लॅट राहील व पुढील आठवड्यात आक्रमक तेजी दाखवू शकतो.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना, असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च एनालिस्ट निरज शर्मा म्हणाले, ' देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक जागतिक संकेतांच्या अनुषंगाने सकारात्मक नोटवर उघडले परंतु दिवसभर ते निस्तेज राहिले. शेवटी, निफ्टी २२८८८ स्तरांवर नकारात्मक नोटवर समाप्त झाला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांक सोमवारी तयार झालेल्या गडद ढगांच्या आवरणातील मेणबत्तीची उच्च पातळी ओलांडण्यात अपयशी ठरला.अशाप्रकारे २३११ हा अल्पावधीत निर्देशांकासाठी मोठा अडथळा ठरेल. नकारात्मक बाजूने,२२८००-२२७८० मागणी क्षेत्र म्हणून काम करेल. जर निर्देशांक २२७८० च्या खाली टिकला तर कमजोरी आणखी वाढू शकते.'
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक जागतिक संकेतांच्या अनुषंगाने सकारात्मक नोटवर उघडले परंतु दिवसभर ते निस्तेज राहिले. शेवटी, निफ्टी २२८८८ स्तरांवर नकारात्मक नोटवर समाप्त झाला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांक सोमवारी तयार झालेल्या गडद ढगांच्या आवरणातील मेणबत्तीची उच्च पातळी ओलांडण्यात अपयशी ठरला. अशाप्रकारे, २३१०० हा अल्पावधीत निर्देशांकासाठी मोठा अडथळा ठरेल. नकारात्मक बाजूने, २२८०० -२२७८०मागणी क्षेत्र म्हणून काम करेल. जर निर्देशांक २२७८० च्या खाली टिकला तर कमजोरी आणखी वाढू शकते.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, 'देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक जागतिक संकेतांच्या अनुषंगाने सकारात्मक नोटवर उघडले परंतु दिवसभर ते निस्तेज राहिले. शेवटी, निफ्टी २२८८८ स्तरांवर नकारात्मक नोटवर समाप्त झाला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांक सोमवारी तयार झालेल्या गडद ढगांच्या आवरणातील मेणबत्तीची उच्च पातळी ओलांडण्यात अपयशी ठरला. अशाप्रकारे, २३११० हा अल्पावधीत निर्देशांकासाठी मोठा अडथळा ठरेल. नकारात्मक बाजूने, २२८०० -२२७८० मागणी क्षेत्र म्हणून काम करेल. जर निर्देशांक २२७८० च्या खाली टिकला तर कमजोरी आणखी वाढू शकते.'