समुद्राखालील बोगद्यासाठी अदित पोर्टलचे काम पूर्ण

३९४ मीटर लांबीचा बोगदा बजावणार महत्वाची कामगिरी

    28-May-2024
Total Views |

adit portal


मुंबई, दि. २७ : विशेष प्रतिनिधी 
महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटा दरम्यान २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीच्या इंटरमीडिएट बोगद्याचे (एडीआयटी) खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे.
२६ मीटर खोल झुकलेल्या एडीआयटीमुळे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) द्वारे ३.३ किमी (अंदाजे) बोगद्याचे बांधकाम सुलभ होईल, ज्यामुळे दोन्ही बाजूंनी १.६ मीटर (अंदाजे) बोगद्यासाठी एकाच वेळी प्रवेश मिळेल. बोगद्याच्या २१ किमी बांधकामापैकी १६ किमी टनेल बोरिंग मशिनद्वारे तर उर्वरित ५ किमी न्यू टनेलिंग मेथडद्वारे आहे. एडीआयटीसाठी ६ डिसेंबर २०२३ रोजी खोदकाम सुरू करण्यात आले असून ३९४ मीटर लांबीची संपूर्ण लांबी सहा महिन्यांच्या अल्पावधीत खोदण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली २७ हजार ५१५ किलो स्फोटकांचा वापर करून एकूण २१४ नियंत्रित स्फोट करण्यात आले आणि सुरक्षित उत्खननासाठी उच्च दर्जाच्या उपकरणांचा वापर करण्यात आला.
अंतर्गत परिमाणाचे एडीआयटी: ११ मीटर X ६.४ मीटर बांधकाम आणि ऑपरेशनदरम्यान मुख्य बोगद्यात थेट वाहनांना प्रवेश मिळेल. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतर प्रक्रियेच्या उद्देशाने देखील वापरला जाऊ शकतो. बोगदा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व वास्तूंचे सुरक्षित उत्खनन व्हावे, यासाठी अनेक मॉनिटरिंग उपकरणांचा वापर केला जात आहे. या कामासाठी एसएसपी (सरफेस सेटलमेंट पॉइंट), ओडीएस (ऑप्टिकल डिस्प्लेसमेंट सेन्सर) किंवा दोन्ही अक्षातील विस्थापनासाठी टिल्ट मीटर, बीआरटी (टार्गेट/थ्रीडी टार्गेट प्रतिबिंबित करून), बोगद्याच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म ताणांसाठी स्ट्रेन गेज, पीक पार्टिकल व्हेलोसिटीसाठी सिस्मोग्राफ (पीपीव्ही) किंवा व्हायब्रेशन अँड सिस्मिक वेव्ह मॉनिटर ही उपकरणे वापरली जात आहेत.
महाराष्ट्र राज्यातील मुंबई बुलेट ट्रेन स्थानक ते शिळफाटा या २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. या बोगद्याचा ७ किमीचा (अंदाजे) भाग ठाणे खाडी (इंटरटाइडल झोन) येथे समुद्राखाली असेल. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच बोगदा उभारण्यात आला आहे. २१ किमी लांबीचा हा बोगदा अप आणि डाऊन ट्रॅकसाठी असलेल्या दोन ट्रॅकला सामावून घेणारा सिंगल ट्यूब बोगदा असेल. हा बोगदा तयार करण्यासाठी १३.६ मीटर व्यासाच्या कटर हेड असलेल्या टनेल बोरिंग मशिनचा (टीबीएम) वापर करण्यात येणार आहे. सामान्यत: एमआरटीएस - मेट्रो प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या शहरी बोगद्यांसाठी ६-८ मीटर व्यासाचे कटर हेड वापरले जातात, कारण हे बोगदे केवळ एका ट्रॅकला सामावून घेतात. बीकेसी, विक्रोळी आणि सावली येथे निर्माणाधीन तीन शाफ्टमुळे टीबीएमच्या माध्यमातून १६ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करणे शक्य होणार आहे.