मथुरेच्या प्रसिद्ध पंजाबी बाजाराचे इस्लामिक बाजार असे नामकरण; नाव बदलणाऱ्या 'वाहिद कुरेशी'ला अटक
27-May-2024
Total Views | 554
लखनौ : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील कोसीकलन येथील बाजाराचे नावच एका दुकानदाराने बदलले. तो विकत असलेल्या पिशव्या आणि जाहिरात साहित्यावर पंजाबी बाजाराचे नाव बदलून इस्लामिक बाजार असे ठेवले. दुकानदाराला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहिद कुरेशी नावाच्या व्यक्तीचे मथुरा येथील कोसीकलन येथील पंजाबी बाजारात कपड्यांचे दुकान आहे. 'ट्रेंड नेव्हर एंड्स' असे त्याच्या दुकानाचे नाव आहे.
वाहिद कुरेशीने त्यांच्या दुकानात दिलेल्या वस्तूंच्या पिशव्यांवर ‘इस्लामिक बाजार’ असा पत्ता छापून आला. त्याच्या दुकानातून वस्तू खरेदी करणाऱ्या एका व्यक्तीने बॅगेवर बदललेला पत्ता पाहिल्यानंतर त्याने सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट केली. यानंतर पंजाबी बाजारातील लोक संतप्त झाले. त्यांनी विरोध सुरू केला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
दुकानदार वाहिद कुरेशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या दुकानावर छापा टाकून त्याच्या दुकानातून २५ किलोचा माल जप्त केला. यानंतर पोलिसांनी वाहिद कुरेशीला अटक करून न्यायालयात हजर केले. येथे न्यायदंड आधिकाऱ्यांनी त्याला जामीन देण्यास नकार दिला. यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
वाहिदला १४ दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. कोशिकला नगरपरिषदेनेही दुकानदाराला नोटीस बजावली आहे. वाहिदच्या दुकानाशेजारी एक मशीद असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. पूर्वी पंजाबी समाजाने येथे भाड्याने दुकाने घेतली होती. मात्र गेल्या काही वर्षांत येथे इतर लोकांची दुकाने वाढली आहेत. त्यानंतरच ही घटना समोर आली आहे.
दुकानदाराने त्याच्या व्हॉट्सॲपवर इस्लामिक बाजार लिहिलेल्या पिशवीचा फोटो टाकल्याचेही सांगण्यात आले, मात्र या संपूर्ण प्रकरणावर गदारोळ झाल्यानंतरही त्याने हा फोटो काढला नाही. या प्रकरणाची केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी स्थानिक दुकानदारांनी केली आहे.