मुंबई: डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) ने बीएसएनएल (BSNL), एमटीएनएल (MTNL) या दोन सरकारी टेलिकॉम कंपनीच्या अधिकच्या मोकळ्या जागा विकण्याचे ठरवले आहे. यासाठी सरकार या जागांचा लिलाव करू शकते. सरकारने एमटीएनएलचा एकूण १०० जागा व बीएसएनएलच्या जागा विक्रीसाठी काढणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
या जागेचा लिलाव व लिस्टिंग टेलिकॉम विभागाचे सेक्रेटरी निरज मित्तल यांनी करण्याचे ठरवले असून यासंदर्भातील माहिती त्यांनी सरकारी विभागाला दिली आहे. लवकरच या जागेचा लिलाव होण्यापूर्वी याची सूची संकेतस्थळावर उपलब्ध करुन विक्री साठी काढण्यात येऊ शकते. बीएसएनएल कंपन्यांना याबद्दल आदेश देण्यात आले आहेत.
सचिव मित्तल यांनी याबद्दलचे आदेश देतानाच सगळ्या सरकारी विभागाना, पीएसयु कंपन्या, इतर संस्था यासंबंधी माहिती देऊन संबंधित जागांची विक्री करण्यात येणार आहे. जागांमध्ये मुंबई व महाराष्ट्रातील अतिरिक्त जागांचा देखील समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ५२ जागा असतील. २०१९ मध्येच बीएसएनएल व एमटीएनएलचा अतिरिक्त जागा विकण्याचा प्रस्ताव मंत्रालयाने मंजूर केला होता. या विक्रीतून सरकारला मोठा निधी उपलब्ध होऊ शकतो. विशेषतः यातून फ्रेश भांडवल सरकारला मिळणार आहे. २०००० हून अधिक निधी सरकारला यामध्ये मिळू शकतो असे प्रसारमाध्यमांना म्हटले आहे.
यातील प्रकिया एमटीएनएल व बीएसएनएल यांनी थंडावल्याने सरकारने त्यांना लवकरच ही विक्री प्रकिया जलदगतीने सुरु करण्यासाठी सांगितले आहे.