शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजारात त्सुनामी ! सेन्सेक्स ११९६.९८ अंशाने वाढत ७५४१८ ची पातळी पार निफ्टी ३६९.८५ अंशाने वाढत २२९६७ पार

मिडकॅप व स्मॉलकॅपमधील पातळीत वाढ, हेल्थकेअर, फार्मा समभागात नुकसान तर बँक,ऑटो, फायनांशियल सर्विसेस समभागात तुफान

    23-May-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात तुफान वाढ झाली आहे. सेन्सेक्स ११९६.९८ अंशाने (०.६१%) वाढत ७५४१८.०४ पातळीवर तर निफ्टी ५० हा ३५४.६५ अंशाने वाढत २२९५२.४५ पातळीवर पोहोचला आहे. शेअर बाजारात ही जबरदस्त वाढ झाली असतानाच दोन्ही बँक निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक तब्बल १.८८ टक्क्यांनी म्हणजेच ५५६८३.३३ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ९७४.२० अंशाने वाढत म्हणजेच २.०६ टक्क्यांनी वाढत ४८७६६.१५ पातळीवर पोहोचला आहे.
 
सकाळप्रमाणेच बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५६ व ०.२९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.५२ व ०.२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये बहुतांश समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ बँक (२.०६%),ऑटो (२.२५%), फायनांशियल सर्विसेस (१.९०%), प्रायव्हेट बँक,(२.००%) या समभागात झाली आहे तर सर्वाधिक घसरण हेल्थकेअर (०.७९%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.६८%) फार्मा (०.५२%) समभागात झाली आहे.
 
आज बीएसईत एकूण ३९४५ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १८२२ समभाग वधारले असून २०१० समभागात घसरण झाली आहे. एकूण समभागापैकी २८७ समभागांचे मूल्यांकन ५२ आठवड्यात सर्वाधिक वाढले असून २५७ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. २८७ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २५७ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
एनएसईत एकूण २७२६ समभागात ट्रेडिंग झाले असताना त्यातील १२५० समभाग वधारले असून १३६८ समभागात घसरण झाली आहे. एकूण समभागापैकी १२१ समभागांचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर १८ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण ९६ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ८० समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
आज बीएसईतील कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation ) ४२०.०९ लाख कोटी आहे तर एनएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल ४१२.३३ लाख कोटी होते. कालपर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बीएसईतून एकूण ६८६.०४ कोटींची गुंतवणूक काढून घेतली होती. एनएसईतील परदेशी गुंतवणूकदारांनी कालपर्यंत ६८६.०४ लाख कोटींची गुंतवणूक काढून घेतली होती.
 
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वधारल्याने आज भारतीय रुपया ८३.५२ रुपयाला स्थिरावला होता. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस बाजारातील सोन्याच्या गोल्ड स्पॉट निर्देशांकात ०.५५ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात ०.९४ टक्क्यांनी घसरण होत सोन्याची पातळी ७२३५७.०० पातळीवर पोहोचली आहे. भारतातील २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १०९० रुपयांनी घसरण होत किंमत ६७३०० रुपयांवर पोहोचली आहे तर २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात १०९० रुपयांनी घट होत सोने ७३४२० रुपयांवर पोहोचले आहे.
 
कालपर्यंत क्रूड (कच्च्या) तेलाच्या निर्देशांकात घट झाली असताना पुन्हा संध्याकाळपर्यंत क्रूड तेल निर्देशांकाने जोर पकडला आहे. युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात लवकरच कपात होण्याची शक्यता युएस फेडरल बैठकीत फेटाळली गेल्याने व मागणीत वाढ झाल्याने बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. WTI Future क्रूड निर्देशांकात ०.७७ टक्क्यांनी वाढ झाली असून निर्देशांक ७८.१७ पातळीवर पोहोचला आहे तर Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.८४ टक्क्यांनी वाढ होत निर्देशांक ८२.५७ पातळीवर पोहोचला आहे. भारतातील एमसीएक्स निर्देशांकात ०.४३ टक्क्यांनी वाढ झाली असून प्रति बॅरेल किंमत ६५२०.०० रुपयांवर पोहोचली आहे.
 
जगामध्ये संमिश्र प्रतिसाद असताना देखील भारताची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत राहिल्याने बाजारात वाढ झाली आहे.जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था म्हणून युएसकडे पाहिले जाते मात्र काल युएस फेडरल व्याजदरात कपात करण्याची इतक्यात शक्यता नसल्याचे त्यांच्या बैठकीच्या मिनिट्समध्ये म्हटले गेल्याने युएस बाजारात मरगळ येऊ शकते. फेडरल रिझर्व्ह २ टक्के मर्यादेत महागाई येईपर्यंत व्याजदर कपातीत शक्यता नाही किंबहुना हे महिन्यात अमेरिकन बाजारातील महागाई दर नियंत्रणात आले असले तरी अपेक्षेपेक्षा कमी झालेले नाहीत. त्यामुळे इतक्यात दर कपात होणे नाही दुसरीकडे युरोपीय बाजारात फारशी मजबूत स्थिती नाही.
 
भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत असल्याने त्यांनी आपली गुंतवणूक काढून घेतली आहे मात्र देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिल्याने बाजारातील गुंतवणूक भरून काढण्याचे काम भारतीय बाजारात झाले आहे. दुसरीकडे युएस परिस्थितीकडे दुर्लक्ष करता भारतीय गुंतवणूकदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर बाजार ४ जूननंतर वाढेल ' अथवा काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी केलेल्या शेअर बाजारात वाढ होण्याच्या वक्तव्यांने बाजारात आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
 
याशिवाय भारतीय गुंतवणूकदारांनी युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची चिन्हे नसतानाही भारतातील घडामोडींना अधिक प्राधान्य दिल्याने बाजारातील गुंतवणूकीत मोठी वाढ झाली आहे. निवडणूक पूर्व काळात सावधतेचा ' कंसोलिडेशनच्या ' काळातून बाजाराची मुक्तता झाली असून पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार येण्याचे जवळपास निश्चित झाल्याने बाजारात वाढ होण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे
 
दुसरीकडे पहिल्यांदाच २.११ लाख कोटींचा ऐतिहासिक लाभांश आरबीआयने सरकारला देण्याचे ठरवल्यानंतर भारतीय सरकारची तिजोरी मजबूत स्थितीत पोहोचली होती ज्याचा परिणाम शेअर बाजारात होताना दिसत आहे. विशेषतः मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ झाल्याने ब्लू चिप्स कंपन्यप्रमाणे या विभागात अधिक मोठी वाढ भविष्यात होऊ शकते. भारतीय कंपन्यांचा तिमाही निकाल,पीएमआय निर्देशांकाची ताजी आकडेवारी पाहता बाजारात मोठी रॅली होण्यास मदत झाली आहे.
 
आज बीएसईत ( BSE) लार्सन, मारूती सुझुकी, एक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एम अँड एम, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टायटन कंपनी, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, रिलायन्स, टाटा मोटर्स, टीसीएस, बजाज फायनान्स, टाटा स्टील, इन्फोसिस, विप्रो, एचसीएलटेक, एचयुएल, टेकमहिंद्रा, आयटीसी, कोटक महिंद्रा, एशियन पेंटस, नेस्ले या समभागात (Stocks)वाढ झाली आहे तर सनफार्मा, पॉवर ग्रीड, एनटीपीसी जेएसडब्लू स्टील या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत (NSE) अदानी एंटरप्राईज, अदानी पोर्टस, लार्सन, एम अँड एम, एक्सिस बँक, आयशर मोटर्स, मारूती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टायटन कंपनी, ओएनजीसी, भारती एअरटेल, बजाज ऑटो, अपोलो हॉस्पिटल, रिलायन्स, एसबीआय, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, डिवीज, टाटास्टील, बजाज फायनान्स, इन्फोसिस,बीपीसीएल, एचडीएफसी लाईफ, ग्रासीम, एचयुएल, एशियन पेंटस, कोटक महिंद्रा, टेक महिंद्रा, सिप्ला, आयटीसी, ब्रिटानिया, नेस्ले, जेएसडब्लू स्टील या समभागात वाढ झाली आहे तर सनफार्मा, हिंदाल्को, पॉवर ग्रीड, कोल इंडिया, एनटीपीसी, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 'सर्वात अलीकडील फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या काही मिनिटांनंतर तेल आणि सोने सलग तिसऱ्या दिवशी घसरले, काही अधिका-यांनी सूचित केले की महागाई स्थिर राहिल्यास व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सरकारच्या तिसऱ्या टप्प्याच्या बाजूने निवडणुकीचा निकाल लागण्याची अपेक्षा असल्याने बाजारात आशावाद निर्माण झाला आहे.संरक्षण कंपन्यांमध्ये प्रभावी परिणाम आणि मजबूत ऑर्डर बुकची अपेक्षा संरक्षण समभागांमध्ये अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे.
 
Awfis Space Solutions' IPO साठी बोली लावण्याच्या दुसऱ्या दिवशी, ३.१९ पट ओव्हरसबस्क्राइब झाले. ऑफरवरील ८६.२९ लाख शेअर्सच्या तुलनेत २.७५ कोटी बोली प्राप्त झाल्या. इश्यूसाठी किंमत बँड ३६४-३८३ रुपये प्रति शेअर सेट केला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांच्या वाटप केलेल्या कोट्याच्या ९.६१ पट सदस्यता घेतली.गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्या कोट्याच्या ४.६२ पट सदस्यत्व घेतले. पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी (QIBs) वाटप केलेल्या कोट्याच्या ३१% सदस्यत्व घेतले, तर कर्मचाऱ्यांसाठी वाटप केलेल्या विभागाची सदस्यता ५.५६ पटीने जास्त होती.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, ' बँकिंग आणि ऑटोमोटिव्ह सारख्या आघाडीच्या क्षेत्रांसह हेडलाइन इंडेक्सने विक्रमी वाढ नोंदवली. आरबीआयचा विक्रमी लाभांश हा अप्रत्यक्ष दर कपातीसारखाच आहे, आणि त्यामुळे रोखे उत्पन्न कमी होण्याची अपेक्षा आहे. संमिश्र HSBC द्वारे सहाय्यक, व्यापक बाजार उत्साही राहिला. मे महिन्यातील पीएमआय डेटा, ज्याने दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या सुरुवातीच्या जोरदार विस्ताराचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे देशांतर्गत बाजाराला चालना मिळाली आहे, जी इतर उदयोन्मुख बाजारपेठांसाठी गेल्या २ महिन्यांत कमी कामगिरी करत होती.'
 
सोने व कच्च्या तेलाच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीजचे ज्येष्ठ व्यवस्थापक कायनात चैनवाला म्हणाले, सोन्याच्या किमती सलग दुस-या दिवशी घसरल्या आणि बुधवारी जवळजवळ १.४% घसरल्या, कारण काल रिलीझ झालेल्या FOMC बैठकीच्या मिनिटांनंतर गुंतवणूकदारांनी फेड रेट कट बेटांचे पुनर्कॅलिब्रेट केले. डॉलर निर्देशांक आणि ट्रेझरी उत्पन्न वाढले कारण मे FOMC बैठकीच्या मिनिटांनी धोरणकर्त्यांनी सहमती दर्शविली की Q1 मध्ये महागाईवर अलीकडील निराशा जनक वाचन, मजबूत आर्थिक गतीच्या चिन्हांसह, याचा अर्थ दर जास्त काळ राहू शकतात. उत्पन्न न देणाऱ्या सराफांवर जास्त दर मिळण्याची शक्यता होती. दिवसासाठी, यूएस साप्ताहिक बेरोजगार दाव्यांसह पाश्चात्य अर्थव्यवस्थांमधील फ्लॅश पीएमआय बाजार हलवू शकतात.
 
डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल फ्युचर्सने सलग तिसऱ्या दिवशी घसरण वाढवली आणि बुधवारी दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला, यूएस क्रूड स्टॉकमध्ये अनपेक्षित वाढ आणि मागणीच्या दृष्टीकोनावर वजनदार FOMC बैठक मिनिटे. यूएस मधील कच्च्या तेलाच्या साठा मागील आठवड्यात १.८२५ दशलक्ष बॅरलने वाढल्या,मागील कालावधीत २.५०८ दशलक्ष घट झाल्यानंतर. दरम्यान, रशियाने सांगितले की, राष्ट्राने एप्रिलसाठी क्रूड उत्पादनाची वचनबद्धता ओलांडली आहे आणि लवकरच ओपेक आणि त्याच्या सहयोगी देशांना अतिरिक्त उत्पादनाची भरपाई करण्याची योजना सादर करेल. तेल बाजारातील सध्याच्या कमकुवत पणामुळे, OPEC १जून रोजी भेटेल तेव्हा आउटपुट कर्ब 2H २०२४ पर्यंत वाढवू शकते.'
 
वाढलेल्या निफ्टी विषयी प्रतिक्रिया देताना जेएम फायनांशियल सर्विसेसचा सहाय्यक उपाध्यक्ष सोनी पटनाईक म्हणाल्या,'२१८०० स्तरांवरून १००० गुणांची रॅली, जसे की FII लाँग पोझिशनिंग करत असताना सिस्टीममधून शॉर्ट्स बाहेर पडतात: शॉर्ट रेशो २६% लाँग्स वरून बाउन्स होतो. निफ्टी फ्यूचर्स आजपर्यंत इंट्राडे आधारावर २.५% फ्रेश लाँग्स साक्षीदार आहेत. निफ्टी निर्णायक रेस पार करण्यात यशस्वी झाला आहे. आजच्या साप्ताहिक कालबाह्यतेच्या मागील २२८००+ स्तरांवर आणि वर्तमान स्तरांवरून महिन्याच्या समाप्तीपर्यंत २३००० अंकांच्या दिशेने जाऊ शकतात आक्रमक पुट ऑप्शन्स लेखन २२५०० PE पासून २२८०० PE पर्यंत सर्व प्रकारे मजबूत समर्थन आधार तयार करते. आता २२६००/२२७०० पातळीवर.दुसरीकडे, BankNifty, FII नी काल अंदाजे १२७९ कोटींची विक्री केल्यामुळे, बँकनिफ्टीने किंचित कमी कामगिरी केल्याचे दिसत आहे. BankNifty साठी निर्णायक प्रतिकार त्याच्या पूर्वीच्या ४९०००+ पातळीच्या ATH वर कायम आहे ज्याच्या पलीकडे BankNifty ४९५००+ पातळी पाहू शकतो.'
 
सोन्याच्या हालचालीवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'फेडरल रिझर्व्ह च्या बैठकीचे इतिवृत्त जाहीर झाल्यानंतर सोन्याचे भाव ७२४०० च्या खाली, आज ७०० रुपयांच्या खाली आणि २००० रुपयांच्या खाली गेले. फेडरल रिझव्र्हच्या बैठकीचे इतिवृत्त जारी झाल्यानंतर या मिनिटांनी सूचित केले की फेड व्याजदर कपातीची घाई करत नाही, कारण चलनवाढीचा स्तर अजूनही दूर आहे. २% च्या टार्गेट झोनमधून या बातमीमुळे सोन्यामध्ये नफा बुकिंगला चालना मिळाली, जे पूर्वी व्याजदर कपातीच्या अपेक्षेने ७४००० पर्यंत पोहोचले होते आणि फेडच्या मिनिटांनी थंड पाणी ओतले होते दर कपातीच्या आशा आणि भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे सोन्याचे भाव झपाट्याने मागे पडले.'