अजय देवगणचा ‘मैदान’ चक्क एका महिन्यात आला OTT वर; पण असणार ‘हा’ मोठा ट्विस्ट

    22-May-2024
Total Views |

ajay devgan 
 
 
मुंबई : अभिनेता अजय देवगण याचे सध्या चांगले चित्रपट येत नाहीत असंच काहीसं चित्र दिसत आहे. काही दिवसांपुर्वीच प्रदर्शित झालेला ‘मैदान’ हा चित्रपट त्यापैकीच एक, कथानक, विषय चांगला असूनही अजयचा ‘मैदान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जागा निर्माण करु शकला नाही. त्यामुळे आता ओटीटीवर तरी आपलं नशीब आजमावण्याच्या दृष्टीने हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार असून सोबत एक मोठा ट्विस्ट देखील असणार आहे.
 
अजय देवगण आणि प्रियामणी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘मैदान’ प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला असून हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही सबटायटल्ससह पाहता येणार आहे. पण प्रेक्षकांना मोफत हा चित्रपट पाहता येणार नाही. प्राइम व्हिडीओचं सबस्क्रिप्शन जरी असलं तरीही तुम्हाला ३४९ रुपये मोजावे लागणार आहे. आणि जर का तुम्हाला हा चित्रपट मोफत पाहायचा असेल तर त्यासाठी दोन आठवडे वाट पाहावी लागणार आहे.
 

ajay devgan 
 
अमित शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ या चित्रपटाचे २३५ कोटी रुपये बजेट होते. पण या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर ७० कोटीच कमावले. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांना आवडेल की नाही ते लवकरच कळेल.