दक्षिण मुंबई मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत अंदाजे 'इतकं' मतदान!

    20-May-2024
Total Views |

Voter 
 
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजतापासून सुरुवात झाली. ३१- मुंबई दक्षिण मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ३६.६४ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
दक्षिण मुंबई लोकसभेत महायूतीकडून शिवसेनेच्या यामिनी जाधव आणि महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांच्यात थेट लढत आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना पाहायला मिळणार आहे.
 
३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी (अंदाजे) पुढीलप्रमाणे : 
 
१८४-भायखळा - ३७.२७ टक्के
 
१८७-कुलाबा - ३०.६२ टक्के
 
१८५-मलबार हिल - ४०.०१ टक्के
 
१८६-मुंबादेवी - ३७.०१ टक्के
 
१८३- शिवडी - ३८.८० टक्के
 
१८२-वरळी - ३६.१२ टक्के
 
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.