मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. जागतिक संमिश्र संकेत असतानाही निर्देशांकात चढता आलेख कायम राहिला आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २५७.११ अंशाने म्हणजेच ०.३५ टक्क्यांनी वाढून ७४७३९.४८ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५० निर्देशांक ६५.६५ (०.२९ %) वाढून २२६७०.५० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक सकाळी ११ वाजेपर्यंत मात्र ८९.६४ अंशाने घट झाली असून बँक निफ्टीत १४१.३० अंशाने घट झाली आहे.
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६६ व ०.२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२० व ०.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषतः जागतिक पातळीवरील संमिश्र प्रतिसाद मिळत असताना ब्लू चीप कंपन्यांच्या समभागात सकारात्मक वाढ दिसत आहे.वाढलेल्या समभागांच्या टक्केवारीत १ ते ३.५ ० टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली असताना घसरलेल्या समभागात १ ते ३.५० टक्यांने घसरण झाली आहे.
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये देखील संमिश्र प्रतिसाद असताना निर्देशांकातील चढ उतार क्षेत्रीय विशेष म्हणून पहायला मिळाली आहे.सर्वाधिक वाढ निफ्टी मेटल (१.१५ %) फार्मा (०.६२%) ऑटो (१.०९%) समभागात झाली आहे. सर्वाधिक घसरण मात्र मिडिया,बँक,प्रायव्हेट बँक,रिअल्टी समभागात झाली आहे.
काल युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कोणताही बदल करता येणार नसल्याचा निर्णय युएस फेडरल ओपन मार्केट कमिटीने घेतला असून तो जैसे थे राहणार असल्याचा निर्णय जेरोम पॉवेल यांनी दिला होता. फेडरल रिझर्व्ह व्याजदर ५.२५ ते ५.५ टक्क्यांपर्यंत कायम राहणार असल्याने भारतीय बाजारात त्याचा नकारात्मक परिणाम झाला नाही मात्र नफा बुकिंगची स्थिती सुधारण्यात येत असताना पुन्हा बाजारात वेळेआधीच रॅली होईल का याचे कल मात्र आज बाजारात दिसले आहे.
सुरूवातीच्या सत्रात बीएसईत पॉवर ग्रीड, टाटा मोटर्स ,टाटा स्टील, एशियन पेंटस एम अँड एम, एनटीपीसी, सनफार्मा, एचडीएफसी बँक, जेएसडब्लू स्टील,नेस्ले, टीसीएस, आयटीसी, लार्सन, एसबीआय, रिलायन्स,टेक महिंद्रा, एचयुएल, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह या समभागात वाढ झाली आहे. तर कोटक महिंद्रा विप्रो, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, एक्सिस बँक, टायटन कंपनी, मारूती सुझुकी, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट या समभागात घट झाली आहे.
एनएसईत पॉवर ग्रीड, बजाज ऑटो, एशियन पेंटस, टाटा स्टील, एम अँड एम, सिप्ला, अदानी एंटरप्राईज, जेएसडब्लू स्टील, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, टीसीएस, नेस्ले, हिरो मोटोकॉर्प, ग्रासीम, डॉ रेड्डी, लार्सन, ब्रिटानिया, अदानी पोर्टस, एक्सिस बँक, अदानी पोर्टस, आयटीसी, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, एचयुएल, टेक महिंद्रा, कोल इंडिया या समभागात वाढ झाली असून कोटक महिंद्रा, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, डिवीज, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, हिंदाल्को, टायटन कंपनी, मारूती सुझुकी, एचसीएलटेक,आयशर मोटर्स, ओएनजीसी, इन्फोसिस या समभागात घट झाली आहे.