शेअर बाजार विश्लेषण: अमेरिकेत मंदी तरीही भारताची चांदी! सेन्सेक्स १२८.३३ अंशाने वाढत ७४६११.११ पातळीवर व निफ्टी ५० निर्देशांक ४३.३५ अंशाने वाढत २२६४८.२० पातळीवर

मिडिया, बँक समभागात घसरण तर मेटल, ऑटो, फार्मा समभागात वाढ

    02-May-2024
Total Views |
z
Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी सकारात्मकता कायम राखली होती. जागतिक पातळीवरील मिश्र संकेत कायम असताना भारतीय बाजाराने आपली वाढ कायम राखली आहे. युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात अमेरिकन फेडरल ओपन मार्केट कमिटीने कुठलाही बदल न केल्याने व्याजदर जैसे ५.२५ ते ५.५ टक्क्यांवर कायम राहिली होती. त्यामुळे बाजारात गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने काल अमेरिकन शेअर बाजारात उसळल्याने भारतीय बाजारात आज रॅली झाली आहे.
 
अखेरच्या सत्रात सेन्सेक्स निर्देशांकात १२८.३३ अंशाने वाढ होत ०.१७%) ७४६११.११ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांकात (०.१९%) ४३.३५ अंशाने वाढ होत निफ्टी २२६४८.२० पातळीवर पोहोचला आहे. सकाळच्या सत्राप्रमाणेच बँक सेन्सेक्स निर्देशांकात ०.४५ टक्क्यांनी म्हणजेच २५१.०० अंशाने घट होत निर्देशांक ५५७४६.७९ पातळीवर पोहोचला आहे. बँक निफ्टीत १६५.७० अंशाने (०.३४ %) घट होत ४९२३१.०५ पातळीवर बँक निफ्टी पोहोचला आहे.
 
बीएसईत आज मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.९१ व ०.२९ टक्क्यांनी वाढ झाली आहे एनएसईत मिडकॅप,स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४९ व ०.००४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईत क्षेत्रीय निर्देशांकात क्षेत्रीय विशेष प्रतिसाद कायम राहिला.आज मिडिया, बँक, पीएसयु बँक, प्रायव्हेट बँक या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.तर सर्वाधिक फायदा मेटल (१.१५%)ऑटो (१.१३%) फार्मा (०.८१ %) समभागात झाला आहे.
 
बीएसईत आज एकूण ३९५७ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १९१२ समभाग वधारले आहेत तर १९२४ समभागात घसरण झाली आहे. एकूण २६८ समभाग ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकनात राहिले असून १२ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. यामध्ये ५ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ३ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
एनएसईत आज २७६४ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १३८० समभाग वधारले असून १२६३ समभागात घसरण झाली आहे. त्यातील १६० समभाग ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकनात राहिले असून १३ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण १२६ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ५३ समभाग आज लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र वातावरणामुळे तसेच फेडरल रिझर्व्ह व्याजदरात बदल न झाल्याने सोने निर्देशांकात वाढ झाली पर्यायाने आशियाई बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७६० रुपयांनी वाढ झाली आहे. १ किलो चांदीच्या दरात ५०० रुपयांना वाढ झाली आहे.
 
जागतिक पातळीवरील क्रूड तेलाच्या भावात संध्याकाळपर्यंत वाढ झाली आहे. दुपारपर्यंत क्रूड निर्देशांकात घसरण झाली होती. मुख्यतः मध्यपूर्वेतील तणाव शमल्याने तसेच मागणीत घट होऊन पुरेसे उत्पादन असल्याने बाजार भावात घट झाली होती. याशिवाय ईआयएने क्रूड (कच्च्या) तेलाच्या उत्पादनात वाढ होऊन प्रति दिनी बॅरेल मध्ये १३.१५ लक्ष बॅरेलची वाढ झाल्याचे निदर्शनास आणले होते. मात्र ५ टक्क्याने घटलेले क्रूड निर्देशांकात स्पॉट मागणीत वाढ झाल्याने महागले आहे. Brent Crude निर्देशांकात ०.५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.WTI Future Crude निर्देशांकात ०.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
भारतीय एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) निर्देशांकात क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.२३ टक्क्याने वाढ होत तेलाची किंमत प्रति बॅरेल ६६३७.०० रुपयांवर पोहोचली आहे.आज बीएसईचे एकूण बाजार भांडवल ( Market Capitalisation) ४०८.४९ लाख कोटी होते तर एनएसईत बाजार भांडवल ४०४.९३ लाख कोटी होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ८३.४३ रुपयांवर स्थिरावली होती.
 
भारतीय वित्तीय पतधोरणात 'जैसै थे' परिस्थिती राहिल्यानंतर अपेक्षितपणे अमेरिकन वित्तीय धोरणात फेडरल व्याजदरात कपात न केल्यामुळे अमेरिकन बाजारातील कर्ज महाग होण्याची अथवा व्याजदर महागण्याची शक्यता धूसर झाल्याने बाजारात संमिश्र प्रतिसाद उमटत होते. अमेरिकन बाजारात कनज्यूमर प्राईज इंडेक्स व इन्फ्लेशन इंडेक्स नकारात्मक आल्यावर युएस मध्ये रोजगार निर्मिती व महागाई नियंत्रणात राहिल का प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता.४ टक्क्यांच्या मर्यादेत महागाई न राहिल्याने सध्या अमेरिकेत कुठलीही व्याजदर कपात न केल्याचे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह ओपन मार्केट कमिटीचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी स्पष्ट केले होते परिणामी DOW बाजारात ०.२३ टक्क्यांनी उसळी घेतली होती. S & P 500 मध्ये ०.३४ व NASDAQ मध्ये ०.३३ टक्क्याने निर्देशांक घसरला होता.
 
युरोपातील बाजार FTSE 100, DAX बाजारात अनुक्रमे ०.३९ व ०.०८ अंकाने वधारला होता. CAC 40 बाजारात मात्र ०.७५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. आशियाई बाजारात NIKKEI बाजारात ०.१० टक्क्यांनी घसरण झाली असून HANG SENG बाजारात २.५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. SHANGHAI बाजारात ०.२६ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
 
भारतीय बाजारात अमेरिकेतील निर्णयाचा फायदा झालेला दिसून आला गेले काही दिवसांपासून बाजारात चढ उतार होत असताना परवा बाजारात नफा बुकिंग झाले होते. या प्राईज करेक्शन मूडमध्ये बाजार असताना अमेरिकन बाजारातील DOW Jones मध्ये वाढ झाल्याने आज भारतीय शेअर बाजारात वाढ झाली आहे. मात्र बँक निर्देशांकात घट झाल्याने बाजारातील वाढ मर्यादित राहिली आहे. प्राईज करेक्शन मूडमध्ये बाजार असताना मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये तेजी कायम असल्याने जास्त नुकसान बाजारात झालेले नाही.तुलनेने भारतातील अर्थव्यवस्थेतील चांगले आकडे लक्षात घेता जूनपर्यंत परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक काढुन घेण्याची शक्यता कमी आहे याखेरीज आज एचएसबीसी उत्पादन वाढीचा पीएमआय निर्देशांक सकारात्मक आल्याने बाजारात वाढीचा ट्रेड कायम राहिला आहे.
 
मुख्यतः बाजारात वाढलेले घसरलेले समभाग पाहता चढलेल्या मुख्य समभागात सरासरी ४ ते ५ टक्क्यांनी वाढ झाली असताना घसरलेल्या मुख्य समभागात २ ते ३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आज बाजारात वाढीचे मार्जिन कायम राहिले आहे.
 
बीएसईत अखेरच्या सत्रात पॉवर ग्रीड, एशियन पेंटस, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एम अँड एम, एनटीपीसी, सनफार्मा, टीसीएस, एचडीएफसी बँक, आयटीसी, एसबीआय, नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन, मारुती सुझुकी, रिलायन्स, एचयुएल या समभागात वाढ झाली आहे. तर कोटक महिंद्रा, भारती एअरटेल, विप्रो, आयसीआयसीआय बँक बजाज फायनान्स, टायटन कंपनी, एचसीएलटेक, इन्फोसिस, मारूती सुझुकी, एचयुएल या समभागात घट झाली आहे.
 
एनएसईतील बीपीसीएल, बजाज ऑटो, एशियन पेंटस, बजाज ऑटो, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एनटीपीसी, सिप्ला टाटा स्टील, एम अँड एम, श्रीराम फायनान्स, सनफार्मा, टीसीएस,अदानी पोर्टस, जेएसडब्लू स्टील, एचडीएफसी बँक, एसबीआय, हिरो मोटोकॉर्प, टेक महिंद्रा, नेस्ले, लार्सन, अल्ट्राटेक सिमेंट, आयशर मोटर्स, बजाज फिनसर्व्ह या समभागात वाढ झाली आहे तर कोटक महिंद्रा, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, भारती एअरटेल, एक्सिस बँक, विप्रो, एचडीएफसी लाईफ, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, टायटन कंपनी, अदानी एंटरप्राईज, हिंदाल्को, एचसीएलटेक, इन्फोसिस, एचयुएल, कोल इंडिया, मारूती सुझुकी, रिलायन्स, ओएनजीसी या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'दोन दिवसांच्या युएस फेडच्या बैठकीनंतर वास्तवाकडे अमेरिकेला यावेच लागेल. IMF कडुन घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज हेही कुठेतरी विचारात घेऊन जगातील सुरू असलेली युद्धे कुठेतरी थांबवावी लागतील .त्यायोगे कच्चे तेल,महागाई, यावर नियंत्रण मिळवणे व अमेरिकेतील कंपन्यांना लोकांना व्याज दर वाढणार नाहीत ही ग्वाही द्यावी लागेल.व त्यानंतर व्याज दरकपातीवर लक्ष देणे.
 
सर्वात महत्त्वाची गोष्ट पुढील २५ वर्ष पुरेल एवढ्या डिफेन्स ऑर्डर पूर्ण करण्यासाठी अमेरिकन अर्थव्यवस्था ट्रॅकवर आणणे गरजेचे आहे, दुर्दैवाने जागतिकीकरणाचे परिणाम आपल्यावरही होतात,आपली अर्थव्यवस्था कितीही चांगली असुन चालणार नाही..आता अमेरिका आपलं घर ऑर्डर मधे करायला सुरुवात करतोय असं वाटतंय असो, काल अमेरिकेत व्याज दर वाढले असते तर कित्येक हजार कोटी परत आपल्या बाजारातुन काढले गेले असते.व्याज दर जैसे थे ठेवल्याने अमेरिकन बाजार सावरला असं आत्तातरी दिसतयं.पण पुढील फेड ची बैठक जुन १५ तारखेला असल्याने आशा परत पल्लवित होतील व बाजार स्थिर होईल.वर म्हणल्या प्रमाणे युद्ध थांबणे, कच्चे तेल ७५ डाॅलर खाली आणणे ,महागाईवर नियंत्रण ठेवण्याकरीता CRR वाढवणे यासारखे ठोस उपाय अमेरिकेला योजावे लागतील.तोपर्यंत आपली कंसोलीडेशनची फेज जवळजवळ पूर्ण होउन आपण तेजीकरिता सज्ज होऊ.'
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट निरज शर्मा म्हणाले,'यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर अपरिवर्तित ठेवल्यामुळे गुरुवारी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक माफक प्रमाणात वाढले. दरम्यान, एप्रिलमधील विक्रमी GST संकलन, सामान्य आर्थिक स्थिरतेसह, गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास मजबूत झाला. शिवाय, अस्थिरता निर्देशांक, भारत VIX, ४.४६ % पुढे वाढला. सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून, दैनंदिन स्तरावर निर्देशांकाने एक तेजीची मेणबत्ती तयार केली आहे परंतु शेवटी, निफ्टी ५० निर्देशांक २२७८० -२२८०० वर सकारात्मक पातळीवर स्थिरावला आहे जोपर्यंत निर्देशांक २२८०० च्या खाली राहतो तोपर्यंत निर्देशांक २२८०० च्या वर टिकून राहिल्यास, २३००० -२३१०० पर्यंत वाढ करणे शक्य आहे. अल्प मुदतीसाठी,२२५०० आणि २२३०० मजबूत समर्थन पातळी म्हणून काम करतील, तर २२८०० आणि २३००० निर्देशांकासाठी अडथळे म्हणून काम करतील.
 
बँक निफ्टी सकारात्मक नोटेवर उघडला परंतु उच्च पातळी टिकवून ठेवू शकला नाही, परिणामी नफा बुकींग झाला आणि 49231 वर नकारात्मक नोटवर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, दैनंदिन स्तरावर, निर्देशांकाने वरच्या ट्रेंड लाइन रेझिस्टन्सच्या जवळ एक शूटिंग स्टार कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे. मंगळवारी वाढणारा वेज पॅटर्न आणि आज शूटिंग स्टार कॅन्डलच्या कमी खाली टिकून राहणे, कमकुवतपणा दर्शवते. अशा प्रकारे, जोपर्यंत निर्देशांक 49,975 पातळीच्या खाली राहील, तोपर्यंत 48500 कडे अल्पकालीन रिट्रेसमेंट नाकारता येत नाही'
 
बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' गोदरेज कुटुंबाने कंपनीचे दोन विभागात विभाजन करण्यास संमती दिली आहे. सूचीबद्ध उद्योग आदि आणि त्यांचा भाऊ नादिर यांच्याकडे राहतील, तर असूचीबद्ध व्यवसाय आणि जमीन बँक त्यांच्या चुलत भाऊ जमशीद यांच्या अखत्यारीत असतील. ३० एप्रिल रोजी, हा करार स्टॉक एक्सचेंजमध्ये वितरित करण्यात आला. या करारामध्ये लँड बँक विकास, ब्रँड वापर आणि रॉयल्टी समस्या समाविष्ट आहेत. कौटुंबिक समझोता करार (FSA) लागू होण्यापूर्वी आणि भारतीय स्पर्धा आयोगाद्वारे मंजूर होण्यापूर्वी विविध कॉर्पोरेशनमध्ये संचालकपद आणि शेअरहोल्डिंग हितसंबंध पुनर्संचयित करणे आवश्यक असेल.
 
कंपनीचे MD आणि CEO वैयक्तिक कारणास्तव सोडण्याचा विचार करत आहेत,तथापि ICICI बँकेने या अफवा खोट्या आणि असत्य असल्याचे म्हटले आहे. "आयसीआयसीआय बँकेच्या एमडीने वैयक्तिक कारणांमुळे आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल लेखात प्रकाशित केलेली माहिती आम्ही स्पष्टपणे नाकारू इच्छितो," व्यवसायाने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. ही माहिती पूर्णपणे खोटी आणि फसवी आहे कारण ती एखाद्याच्या कल्पनेची काल्पनिक आहे. असे दिसते की या अफवा पसरवण्याचा उद्देश बँक आणि तिच्या भागधारकांना दुखावण्याचा आहे, शक्यतो दुष्ट हेतूने."
 
मार्चमध्ये हंगामी समायोजित ५९.१ आणि एप्रिलमध्ये ५८.८ सह, HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) ने साडेतीन वर्षांत या क्षेत्राच्या आरोग्यामध्ये दुसरी-उत्तम वाढ दर्शविली. PMI त्याच्या दीर्घकालीन सरासरी ५३.९ आणि ५०.० च्या तटस्थ थ्रेशोल्ड या दोन्हीपेक्षा खूप जास्त होता. मजबूत मागणीमुळे साडेतीन वर्षांत दुसऱ्या-जलद दराने ऑपरेटिंग परिस्थिती सुधारली. व्यवसायांमध्ये नवीन ग्राहकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे आणि त्यानुसार त्यांचे आउटपुट स्तर सुधारले आहेत.'
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, 'बेंचमार्क निर्देशांकांनी मध्यम वाढ पाहिली, जे FED ने व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर जागतिक ट्रेंडचे प्रतिबिंबित केले, जसे की व्यापकपणे स्विकारले गेले. यूएस मध्यवर्ती बँकेने उच्च चलनवाढीचा कल टिकवून ठेवण्याबाबत सावध राहून संभाव्य दर कपातीचे संकेत दिले. व्यापक बाजारपेठेने मोठ्या प्रमाणावर व्यापलेल्या श्रेणीबद्ध , तर अलीकडील व्हॉल्यूम नंबर्सवर ऑटो कंपन्यांकडून सकारात्मक भाष्यामुळे या क्षेत्राला मागे टाकले गेले."
 
सोन्याच्या हालचालीवर व्यक्त होताना एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी करन्सी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, सोन्याच्या किमती ७१२०० ते ७०६०० पर्यंतच्या उच्च पातळींवरून घसरल्याचा अनुभव आला, जे अंतर उघडल्यानंतर नफा बुकिंगच्या संधींमुळे चालते. व्याजदर चक्राभोवती असलेली बाजारातील अनिश्चितता आणि भविष्यातील संभाव्य कपात यामुळे सोन्याच्या किमतींवरील घसरणीचा दबाव वाढला. डॉलर निर्देशांक आढळून आला. फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) स्टेटमेंटने व्याजदर दीर्घ कालावधीसाठी जास्त ठेवल्याचा संकेत दिल्यानंतर सपोर्ट, सराफामध्ये नफा बुकिंगसाठी गुंतवणूकदार आता सराफा किमतीची नॉनफार्म पेरोल्स आणि बेरोजगारी डेटाची वाट पाहत आहेत, जे या दिशेने आणखी अंतर्दृष्टी प्रदान करतील अशी अपेक्षा आहे.'