शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याची अखेर दमदार ! सेन्सेक्स निफ्टी वाढल्याने बाजारात मोठे संकेत सेन्सेक्स ८२.२५ अंशाने,निफ्टी ६४.०० अंशाने वाढला

दोन्ही बँक निर्देशांकात मोठी वाढ, कनज्यूमर ड्युरेबल्समध्ये सर्वाधिक वाढ तर आयटी समभागात घसरण

    17-May-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज आठवड्याची अखेर दमदार झाली आहे.आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. काल अमेरिकेत महागाई दर कमी झाल्याचा सलग दुसऱ्या दिवशी परिणाम दिसून आला. महागाई नियंत्रणात आल्यानंतर फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होणार अशी वावटळ सुरु झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करू शकते ही अपेक्षा बाजारात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. याशिवाय कंपनीचे तिमाही निकाल सकारात्मक आल्याने बाजारात आवश्यक असलेली तेजीची पार्श्वभूमी तयार झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
 
परिणामी ' कंसोलिडेशन ' फेज जाऊन आज सेन्सेक्स निर्देशांक ८२.२५ अंशाने वाढत २३६१०.६६ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५० निर्देशांक ६४.०० अंशाने वाढत २२४६७.८५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २४४.७४ टक्क्यांनी वाढ झाली असून निर्देशांक ५५०४७.९१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक १७८.७० अंशाने वाढत ४८१५५.७५ पातळीवर पोहोचला आहे.बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.२४ व १.४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईत मिडकॅप व  स्मॉलकॅपमध्ये ०.८२ व १.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) आज सकाळप्रमाणे कनज्यूमर ड्युरेबल्स (२.७९ %) सर्वाधिक वाढ झाली असून तेल गॅस (१.१%) मिडिया (१.०४%), मेटल (१.४४%), ऑटो (१.६४%) समभागात वाढ झाली आहे तर आयटी (०.८४%), फार्मा (०.०६%), हेल्थकेअर (०.१६%) समभागात घसरण झाली आहे.
 
बीएसईत आज एकूण ३९३९ कंपन्याचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २४०३ कंपन्यांच्या समभागात वाढ झाली असून १४१० समभागात घसरण झाली आहे. त्यातील २१८ समभाग ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकनात राहिले असून २८ समभागात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. आज एकूण ३६३ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १५५ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
एनएसईत आज एकूण २७२३ कंपन्याचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १६९२ समभागात वाढ झाली असून ९२४ समभागात घसरण झाली आहे. त्यातील १३२ समभागाचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक राहिले असून १५ समभागाचे मूल्यांकन आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी राहिले आहे. आज एकूण १५० समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ६३ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
बीएसईतील कंपन्याचे आज बाजार भांडवल (Market Capitalisation) एकूण ४१०.२१ लाख कोटी रुपये होते तर एनएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल एकूण ४०३.७६ कोटी रुपये होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत संध्याकाळपर्यंत ८३.५२ रुपयांवर स्थिरावली आहे. सकाळी रुपयांची किंमत स्थिरावली असताना संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत रुपयात ०.५ पैशाने घसरण झाली होती.
 
आज सोन्याच्या किंमतीत घसरण कायम राहिली आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावरील युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात झाल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. काल युएस ट्रेजरीत घसरण झाल्याने बाजारात डॉलरची किंमत नियंत्रित झाल्याने सोन्यात घसरण झाली होती. आज संध्याकाळपर्यंत युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.०८ टक्क्यांनी वाढ झाली होती. भारतातील एमसीएक्स निर्देशांकात सोन्याच्या निर्देशांकात ०.०९ टक्क्यांनी घसरण होत सोन्याचे दर ७२९१७ पातळीवर पोहोचले आहेत.
 
भारतातील सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम किंमतीत २५० रुपयांनी घसरण होत ६७६०० पातळीवर पोहोचले आहेत तर २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात २७० रुपयांनी घट होत सोने ७३२५० पातळीवर पोहोचले आहे. मात्र जागतिक पातळीवरील चांदीच्या दरात सकाळी मोठी वाढ झाली होती. एमसीएक्सवर चांदीच्या निर्देशांकात ०.२६ टक्क्यांनी वाढ होत चांदी ८७५२४.०० पातळीवर पोहोचली आहे. मुंबईतील चांदीचे दर प्रति १ किलो ८९१०० रुपयांवर कायम आहेत काल मात्र चांदीच्या दरात १५०० रुपये प्रति किलो दराने वाढ झाली होती.
 
काल युएस ग्राहक महागाई दरात घट झाल्यानंतर क्रूड तेलाच्या भावात वाढ झाली होती. महागाई कमी झाल्याची आकडेवारी आल्यानंतर तेलाच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. त्यानंतर काही काळ स्थिर झाल्यानंतर पुन्हा चीनमधील उत्पादनात वाढ सुरू झाल्याने पुन्हा क्रूड तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या WTI Future निर्देशांकात आज संध्याकाळपर्यंत ०.१८ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड निर्देशांकात ०.१८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange) मध्ये क्रूड तेल निर्देशांकात ०.०६ टक्क्यांनी घट होत प्रति बॅरेल किंमत ६५८७ रुपयांवर पोहोचली होती. भारताने तेल कंपन्यांच्या विंडफॉल करात कपात केल्याने भारतात तेलाचे भाव नियंत्रणात आले आहेत.
 
बीएसईत आज एम अँड एम, जेएसडब्लू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, आयटीसी, मारूती सुझुकी, एनटीपीसी, टाटा स्टील, एसबीआय, रिलायन्स, टायटन कंपनी, पॉवर ग्रीड, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, एक्सिस बँक या समभागात वाढ झाली आहे तर टीसीएस, एचयुएल, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले, एचसीएलटेक, इन्फोसिस, विप्रो, लार्सन, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, सनफार्मा या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत एम अँड एम, जेएसडब्लू स्टील, ग्रासीम, अल्ट्राटेक सिमेंट, बीपीसीएल, कोटक महिंद्रा, आयटीसी, एनटीपीसी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टायटन कंपनी, रिलायन्स, एसबीआय, अदानी एंटरप्राईज, एचडीएफसी लाईफ, कोल इंडिया, अपोलो हॉस्पिटल, हिंदाल्को, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक,पॉवर ग्रीड, एक्सिस बँक या समभागात वाढ झाली आहे तर टीसीएस, सिप्ला, टीसी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एचसीएलटेक, बजाज ऑटो, ब्रिटानिया, हिरो मोटोकॉर्प, नेस्ले, डॉ रेड्डीज, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, अदानी पोर्टस, डिवीज, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, सनफार्मा, बजाज फायनान्स, लार्सन, टेक महिंद्रा, एशियन पेंटस, ओएनजीसी, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक या समभागात घसरण झाली आहे.
 
आज युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल अशी चर्चा सुरू झाल्याने त्याचा फायदा अथवा परिणाम भारतीय बाजारात दिसून आला. आता भारतीय गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करेल अशी आशा निर्माण झाल्याने बाजारात गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः आज मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये १.६१ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने बाजारात तेजी कायम राहिली होती. दुसरीकडे लार्जकॅप वाढत असताना मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये झालेल्या वाढीमुळे बाजारात तेजीचा बेस निर्माण झाला. गेले काही दिवस मोठ्या ब्लू चिप्स समभागात चढ उतार वाढल्यानंतर मात्र आता समभागात वाढ झाली आहे.
 
सकारात्मक तिमाही निकाल, व पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याच्या अपेक्षा वाढीमुळे तसेच महागाई कमी होण्याच्या अपेक्षेने बाजारात निर्देशांक वरच्या बाजूला झुकले होते. काही मोठ्या कंपन्यांचे समभाग ५ ते ६ टक्क्यांनी अखेरीस वाढल्याने दुसरीकडे नुकसान झालेल्या समभागांची पातळी २ टक्क्यांपर्यंत राहिल्याने बाजारात रॅली झाली होती.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना, असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च एनालिस्ट हृषिकेश येडवे म्हणाले, ' जागतिक संकेतांच्या अनुषंगाने शुक्रवारी निफ्टी सपाटपणे उघडला. सुरुवातीच्या गुडघेदुखीच्या प्रतिक्रियेनंतर, निर्देशांक सकारात्मक झोनमध्ये व्यवहार केला आणि २२४६६ स्तरांवर स्थिरावला. तांत्रिक दृष्टीकोनातून, निर्देशांकाने २१ दिवसांच्या वर मजबूत पकड राखली आहे. एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज (२१-DEMA), जो २२३२० स्तरांवर आहे तोपर्यंत रॅली २२६०० पर्यंत वाढू शकते, तथापि, आम्ही हळूहळू २२८०० च्या मागील प्रतिकारापर्यंत पोहोचत आहोत. अशा प्रकारे, व्यापाऱ्यांना टेबलमधून काही नफा घेण्याचा सल्ला दिला जातो.
 
बँक निफ्टी कमकुवत नोटेवर उघडला, परंतु सुरुवातीच्या अस्वस्थतेनंतर, निर्देशांकाने गती घेतली आणि शेवटी ४८११६ वर सकारात्मक नोटवर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाने २१-दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज (२१-DEMA) अडथळ्यावर मात केली आहे, जी ४८०५० च्या जवळ ठेवण्यात आली होती, जी ताकद दर्शवते. त्यामुळे, नजीकच्या भविष्यात, बँक निफ्टी ४८५००-४८७०० पातळीची चाचणी घेऊ शकते'
 
आजच्या बाजारावर भाष्य करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,'संमिश्र जागतिक संकेत आणि यूएस फेडच्या सभोवतालची अनिश्चितता असूनही, भारतीय बाजाराने एक मजबूत पुनर्प्राप्ती अनुभवली, जी मोठ्या प्रमाणावर व्यापक बाजाराच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि सकारात्मक Q4 कमाईमुळे वाढली. पुढे, काही निर्देशांक हेवीवेट कमाई अपेक्षेपेक्षा जास्त झाली आणि मिडकॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक्स ऑटो आणि कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये घसरण सुरू राहिली, विशेषत: मजबूत कमाईच्या गतीने.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 'आज निफ्टी ०.२८% ने वाढून २२४६६ वर बंद झाला तर सेन्सेक्स ०.३४4% ने ७३९१७ वर बंद झाला. निफ्टी ऑटो आणि निफ्टी मेटल अनुक्रमे १.७४% आणि १.६२% ने सर्वोच्च कामगिरी करणारे क्षेत्रीय निर्देशांक होते.
 
गुंतवणूकदार संरक्षण आणि इन्फ्रा समभागांकडे अधिक आकर्षित झाले होते, कंपन्यांना निवडणुकीनंतर बजेटमध्ये चांगल्या ऑर्डरचा ओघ मिळू शकतो.नुवामा वेल्थ मॅनेजमेंटने निफ्टी ५० इंडेक्समध्ये संभाव्य प्रवेशकर्ते म्हणून सूचना दिल्यानंतर ट्रेंट आणि भारत इलेक्ट्रॉनिक्सने वाढ केली. ट्रेंट ०.८२% वाढला, तर भारत इलेक्ट्रॉनिक्सने ४.३३% रॅलीसह विक्रमी उच्चांक गाठला.
 
M&M, JSW स्टील, ग्रासिम, अल्ट्राटेक सिमेंट आणि BPCL हे निफ्टीमध्ये सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये होते तर TCS, Cipla, SCI Life Insurance, HCL Tech आणि Bajaj Auto हे निफ्टीमध्ये सर्वाधिक नुकसान करणाऱ्यांमध्ये होते.'
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'भारतीय शेअर बाजार हा जागतिक व आंतरिक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून हळूहळू नवनवीन क्षेत्रात उच्चांक दाखवण्यास तयार आहे. डिफेन्स क्षेत्रातील कंपन्या कालपासून तेजीत दिसत आहेत.कदाचित हेच सरकार परत येणार हा विश्वास बाजाराला वाटला आहे. हिंदुस्तान अँरोनाॅटिकस व भारत डायनॅमिक्स यांची घोडदौड परत सुरु झाली आहे.
 
भारत डिफेन्स क्षेत्रातील एक मानाचं स्थान पुढील काही काळात होऊ शकेल. डिफेन्सच्या अनेक कंपन्या या सरकारी मालकीच्या असल्या कारणाने हेच सरकार परत येणार असे अंदाज तेजीवरून बाजारात दिसत आहेत. तसेच रिलायन्स, एचडीएफसी एसबीआय, व स्टील कंपन्या.तसेच मायनिंगमध्ये तेजी दिसुन आली. आठवड्याचा शेवटचा दिवस असूनही सर्व क्षेत्रात वाढ हे संकेत बाजारासाठी निश्चितच चांगले आहेत.'
 
रुपयाच्या परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'रुपयाने सकारात्मक व्यवहार केला, ०.१७ पेक्षा जास्त वाढून ८३.३५ वर बंद झाला. ही वाढ भारतीय भांडवली बाजाराच्या अनुकूल मतदानाच्या संख्येवर सकारात्मक प्रतिक्रिया आणि सध्याचे सरकार चालू ठेवण्याच्या अपेक्षेमुळे प्रेरित आहे.देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) प्रवाहाने योगदान दिले आहे. रुपयाच्या स्थिरतेसाठी, आणि आरबीआयच्या कठोर शून्य-सट्टा नियमांमुळे आगामी सत्रांमध्ये, रुपया ८३.१० आणि ८३.५५ दरम्यान सकारात्मक श्रेणीत व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे.'