मुंबई: TRAI (टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया) ने भारतात टेलिफोन सबस्क्राईबरमध्ये ११९७.७५ दशलक्ष सबस्क्राईबरमध्ये वाढ झाल्याचे सांगितले आहे. आपल्या मासिक अहवालात म्हटल्याप्रमाणे वायर सबस्क्राईबरमध्ये ३३.१० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारीमधील ३२.५४ दशलक्ष तुलनेत या महिन्यात ही वाढ ३३.१० पर्यंत झाली आहे. ही ०.५६ %ने सबस्क्राईबरमध्ये वाढ होत महिन्याच्या अनुषंगाने ही वाढ १.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शहरी व ग्रामीण भागातील सबस्क्राईबर प्रत्येकी ९१.५० टक्के व ८.५० टक्क्यांनी अनुक्रमे वाढ झाली आहे. वायरलेस विभागात फेब्रुवारी महिन्यात ११६४.६४ दशलक्ष सबस्क्राईबरची वाढ झाली आहे. मागील महिन्यातील ११६०.७१ तुलनेत ही वाढ ०.६४ टक्क्यांनी सबस्क्राईबरमध्ये झाली आहे. ग्रामीण भागातील सबस्क्राईबरमध्ये जानेवारी महिन्यातील ५२६.७५ दशलक्षाचा तुलनेत मार्चमध्ये ५२८.५३ तुलनेत वाढ झाली आहे.
वायरलेस सबस्क्राईबरमध्ये वी एल आर (Active Wireless Subscribers) मध्ये सर्वाधिक वाढ भारती एअरटेल (९९.६३%) कंपनीची झाली आहे. २९ फेब्रुवारीपर्यंत, खाजगी प्रवेश सेवा प्रदात्यांकडे वायरलेस ग्राहकांचा ९२.५ टक्के बाजार हिस्सा होता, तर BSNL आणि MTNL या दोन सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्सचा बाजारातील हिस्सा केवळ ७.९५ टक्के होता.
ट्रायने सांगितलेल्या माहितीनुसार मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी फेब्रुवारीपर्यंत ११.५४ दशलक्ष सबस्क्राईबरमध्ये वाढ झाली आहे.जानेवारी महिन्यात ही वाढ ९११.०३ दशलक्ष सबस्क्राईबनी झाली होती.मासिक आधारावर ही वाढ ०.६३ टक्क्यांनी झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात एकूण मुख्य कंपन्याचे मार्केट शेअर ९८.३५ टक्के इतके राहिले आहे.
ज्यामध्ये रिलायन्स जिओ (४७८.५१ दशलक्ष सबस्क्राईबर) एअरटेल (२६९.६३ दशलक्ष सबस्क्राईबर) व्होडाफोन आयडिया
(१२६.५६ दशलक्ष सबस्क्राईबर) बीएसएनएल (२४.६७ दशलक्ष सबस्क्राईबर) अट्रिया कन्व्हरजंस (२.२४ दशलक्ष सबस्क्राईबर) इतके आहे.