दूरदर्शनवर ‘द केरळ स्टोरी’चे प्रसारण थांबवा; डावे-काँग्रेसची निवडणुक आयोगाकडे मागणी

    05-Apr-2024
Total Views |
 The Kerala Story
 
नवी दिल्ली : दूरदर्शनवर दि. ५ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८ वाजता ‘द केरळ स्टोरी’ प्रसारित करण्यात येणार आहे. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट दूरदर्शनवर प्रसारित होणार अशी घोषणा होताचं डावे आणि काँग्रेसजनांनी एका आवाजात विरोध सुरू केला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही चित्रपटच्या प्रसारणला विरोध केला आहे. त्यांनी दूरदर्शनच्या निर्णयाचा निषेध केला आहे. काँग्रेस नेते व्हीडी साठेसन यांनीही याप्रकरणी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
 
२०२३ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट लव्ह जिहाद आणि केरळमध्ये इस्लामिक दहशतवादी संघटना आयएसआयएस च्या प्रसाराबद्दल आणि लव्ह जिहादवरआधारित आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्विटरवर लिहिले, “दूरदर्शनद्वारे ध्रुवीकरण करणारा चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ चे प्रसारण अत्यंत निषेधार्ह आहे. राष्ट्रीय वृत्तवाहिनीने भाजपचे प्रचारयंत्र बनू नये आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनातून माघार घ्यावी. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी जातीय तेढ वाढवण्याचा हा प्रयत्न असेल. "केरळ द्वेष पसरवण्याच्या अशा घृणास्पद प्रयत्नांविरुद्ध ठामपणे उभे राहील."
 
 
केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते व्हीडी साठेसन यांनीही याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता हा चित्रपट दूरदर्शनला प्रसारित करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. हा चित्रपट राज्याची वाईट प्रतिमा मांडत असल्याचा दावा साठेसन यांनी केला आहे. हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
उल्लेखनीय आहे की द केरळ स्टोरी चित्रपट दि. ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा केरळमधील मुलींचा लव्ह जिहाद आणि नंतर त्यांना दहशतीच्या तोंडात ढकलले जाण्याची होती. तेव्हाही या चित्रपटाला डाव्या आणि उदारमतवाद्यांनी कडाडून विरोध केला होता. पश्चिम बंगाल सरकारनेही या चित्रपटावर बंदी घातली होती. ही बंदी सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. या चित्रपटाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आणि बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. या चित्रपटाने जवळपास ३०० कोटींची कमाई केली होती.