सांगली आणि मुंबई नंतर आता भिवंडीतही काँग्रेसचा पत्ता कट; शरद पवारांनी केला उमेदवार जाहीर
05-Apr-2024
Total Views |
मुंबई : महाविकास आघाडीत सांगली आणि मुंबईच्या जागेसाठी रस्सीखेच सुरु असतानाच आता काँग्रेसच्या परस्पर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने भिवंडी ( Bhiwandi Loksabha ) मध्ये आपला उमेदवार घोषित केला आहे. त्यामुळे या जागेवरुन पुन्हा काँग्रेसमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. भिवंडीतुन काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरघे यांनी अपक्ष निवडणुक लढवणार असल्याचं म्हणलं आहे.
शरद पवार यांनी भिवंडीतुन लोकसभेसाठी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यमामा यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर नाराज काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरघे यांनी अपक्ष निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर दयानंद चोरघे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहीती दिली. दयानंद चोरघे काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामिणचे अध्यक्ष आहेत.
महाविकास आघाडीत यापुर्वीही काँग्रेसच्या वाट्याच्या जागांवर उबाठा गटाने आपले उमेदवार दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी सांगली आणि मुंबईतील एका जागेवर काँग्रेस इच्छुक असताना उमेदवार दिला होता. सांगलीमध्ये उबाठा गटाच्या उमेदवारीवरुन तर महाविकास आघाडीत अजुन तणाव कायम आहे. तेथे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तेथे काँग्रेसचे विशाल पाटील इच्छुक उमेदवार आहेत. ते सुद्धा अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.
भिवंडीमध्ये राष्ट्रवीदीने बाळ्या मामा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात आहेत भिवंडीचे विद्यमान खासदार आणि केंद्रिय मंत्री कपील पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत. दयानंद चोरघे यांनी आपल्या पत्रकार परीषदेत म्हटलं की ज्याप्रमाणे सांगलीत वरीष्ठांना विश्वासात न घेता उमेदवारी देण्यात आली त्याप्रमाणे भिवंडीतही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मी कार्यर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष निवडणुक लढवणार आहे.
या उमेदवारीमुळे काँग्रेस कोकण, मुंबई आणि पश्मिम महाराष्ट्रातुन जवळपास हद्दपारच झाली आहे. कोकणात काँग्रेसचा एकही उमेदवार नाही, मुंबई मधुनही काँग्रेसला हद्दपार करण्यात आलं आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुर वगळता एकाही ठीकाणी काँग्रेसचा उमेदवार नाही.