शेअर बाजार विश्लेषण: बाजारात रेकॉर्डब्रेक वाढ ! बँक निफ्टीची धमाल सेन्सेक्स ९०४.९५ अंशाने वाढत ७४६३५.११ व निफ्टी २२२.०५ वाढत २२६४२ पातळीवर

सेन्सेक्स बँक निर्देशांकात १४१६.२२ अंशाने व निफ्टी बँक निर्देशांकात १२२३.०० अंशाने वाढ ! बँक व वित्तीय सेवा निर्देशांक जोरात तर आयटी, रियल्टी समभागात घसरण

    29-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज शेअर बाजारात रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज तगडी रॅली दिसून येत आहे.शेअर बाजारातील काही दिवसातील सर्वाधिक वाढ आज शेअर बाजारात झालेली आहे.एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांकात ९०४.९५ अंशाने वाढत ७४६३५.११ अंकाने व निफ्टी ५० निर्देशांकात २२२.०५ अंशाने वाढ होत २२६४२ पातळीवर वाढ झाली आहे. आजच्या दिवशी बाजारात सेन्सेक्स व निफ्टीत अनुक्रमे १.२८ टक्क्यांनी व १.०० टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे.
 
सकाळच्या सत्राप्रमाणेच आज अखेरचे सत्र तेजीत राहिल्याने बाजारात मोठी उलाढाल झाली आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांकात तब्बल २.५९ टक्क्यांनी म्हणजेच १४१६.२२ अंशाने वाढ झाली आहे. निफ्टी बँक निर्देशांकात २.५४ टक्क्यांनी म्हणजेच १२२३.०० अंशाने वाढ झालेली आहे.आज बँक निर्देशांकात मोठी वाढ झाल्याने बाजार मोठ्या फरकाने वधारले आहे.
 
बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.८० व ०.११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.४३ व ०.२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices ) मध्ये बहुतांश समभागात आज वाढ झाली आहे. निफ्टी आयटी, रियल्टी,ऑटो समभागात आज घसरण झाली आहे. तर सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (२.५६ %) व निफ्टी बँक (२.५४%) व फायनांशियल सर्विसेस (२.१४ %) प्रायव्हेट बँक (२.१६%) समभागात झाली आहे.
 
बीएसईत आज ४०८८ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २०३८ समभाग आज वधारले असून १८७५ समभागात आज पडझड झाली आहे.त्यातील २८४ समभागांच्या ५२ आठवड्यातील मूल्यांकनात आज सर्वाधिक वाढ झाली आहे तर ११ समभागाचे मूल्यांकन आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी राहिले आहे. यामध्ये ४३७ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले असून २४० समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
एनएसईत आज २७६१ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना एकूण १३८९ समभाग वधारले असून १२३३ समभागात आज घसरण झाली आहे. एकूण समभागापैकी १७१ समभागांचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक राहिले असून १३ समभागांचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी राहिले आहे.त्यातील १४९ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ६४ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
का बाजार वधारले? - मध्यपूर्वेतील तणाव शांत झाल्यानंतर अमेरिकन गुंतवणूकदारांनी आपले लक्ष युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल की नाही यावर लक्ष केंद्रीत केले होते. अमेरिकेत निवडणूकीचा पार्श्वभूमीवर १ मे रोजी फेडरल रिझर्व्हची पत्रकार परिषद होणार आहे ज्यामध्ये एप्रिलसाठी अमेरिकेतील रोजगाराच्या आकड्यांचे अवलोकन केले जाणार आहे. तसेच फेडरल रिझर्व्ह व्याजदरात फेड अध्यक्ष जेरोम पॉवेल वक्तव्य करण्याची शक्यता आहे. यामध्ये गुंतवणूकदारांनी सकारात्मकता राखत गुंतवणूकीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय बाजारात कंपनींच्या तिमाहीतील निकाल व तिमाहीतील बँकेच्या चांगल्या कामगिरीमुळे बाजारात मोठी वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते यावेळी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कुठलीही कपात करण्याची शक्यता नसून हे दर 'जैसे थे' राहू शकतात.
 
याशिवाय मागील आठवड्यात DOW Jones,S & P 500, NASDAQ बाजारात मोठी वाढ झाली होती. आशियाई बाजारातील NIKKEI,HANG SENG ,SHANGHAI या तिन्ही बाजारात वाढ झाली आहे.परिणामी भारतातील गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला होता. जागतिक पातळीवरील क्रूड तेलाच्या व सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाल्याने त्याचाही फायदा भारतीय बाजारात झाला आहे.क्रूड तेलाच्या निर्देशांकात आज संध्याकाळपर्यंत ०.२४ टक्क्यांनी घसरण झाल्याने तेलाची प्रति बॅरेल किंमत ६९८२ रुपयांवर पोहोचली होती. सोन्याच्या किंमतीत देखील युएस गोल्ड फ्युचरमध्ये घट झाल्याने प्रति १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत भारतात ३३० रूपयांनी घट झाली होती. चांदीच्या किंमतीत कुठलाही बदल झालेला नाही.
 
अमेरिकन बाजारातील Yield Bond मध्ये आज १० वर्षातील सर्वाधिक घट झालेली आहे. बाँडची किंमत आज ७.१७६ वर पोहोचली होती जी शुक्रवारी ७.१९९ होती.बाँड यिलडमधील घसरण झाल्याने बाजारातील गुंतवणूकदारांची रिस्क कमी होत गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.बँक तिमाहीतील निकालांच्या पार्श्वभूमीवर बँक समभागात मोठी वाढ झाली असल्याने आज बँक निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे.युरोपातील DAX वगळता FTSE,CAC 40 शेअर बाजारात वाढ झाली आहे. एकूणच बाजारात आज विन विन सिच्युएशन कायम राहिली आहे.
 
एनएसईत एकूण कंपन्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४०६.४६ लाख कोटी होते तर एनएसईत एकूण कंपन्याचे बाजार भांडवल ४०२.९० लाख कोटी होते. संध्याकाळपर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपयाची काही पैशांची घसरण झाल्याने भारतीय रुपया ८३.५० वर पोहोचला होता.
 
बीएसईत आज आयसीआयसीआय बँक,एसबीआय,इंडसइंड बँक,अल्ट्राटेक सिमेंट,एक्सिस बँक,एनटीपीसी,कोटक महिंद्रा, टीसीएस,बजाज फायनान्स,एचडीएफसी बँक,टाटा स्टील,जेएसडब्लू स्टील,रिलायन्स, नेस्ले, लार्सन, एम अँड एम,एशियन पेंटस, टेक महिंद्रा, भारती एअरटेल,पॉवर ग्रीड,इन्फोसिस,एचयुएल,टाटा मोटर्स या समभागात वाढ झाली असून एचसीएलटेक, आयटीसी,विप्रो,मारूती सुझुकी,बजाज फिनसर्व्ह या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत आयसीआयसीआय बँक,इंडसइंड बँक,अल्ट्राटेक सिमेंट,एक्सिस बँक,कोटक बँक, ग्रासीम,एनटीपीसी,बीपीसीएल, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक,टीसीएस, सनफार्मा,एम अँड एम,टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील,नेस्ले इंडिया,रिलायन्स, भारती एअरटेल या समभागात आज वाढ झाली आहे.एचसीएलटेक,अपोलो हॉस्पिटल,बजाज ऑटो,एचडीएफसी बँक,डिवीज, अदानी पोर्टस,आयशर मोटर्स,कोल इंडिया,श्रीराम फायनान्स,टाटा कनज्यूमर,मारूती,अदानी एंटरप्राईज या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले,"बुल्सने निर्देशांकाला मागील स्विंग उच्च पातळीच्या वर ढकलले आहे, जो मजबूत तेजीचा कल दर्शवित आहे. याव्यतिरिक्त,निर्देशांक अलीकडील एकत्रीकरण टप्प्याच्या पलीकडे गेला आहे. RSI (१४) निर्देशक तेजीच्या क्रॉसओवरमध्ये आहे आणि वाढत आहे. एकूणच भावना अपेक्षित आहे. अल्पावधीत सकारात्मक राहण्यासाठी ४९८००-५०००० पर्यंत वाढ अपेक्षित आहे.
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'आज ब्रॉड मार्केट तेजी पहायला मिळाली. आज निफ्टीने २२५०० ची लेवल पार केली आहे. कदाचित याच आठवड्यात नवीन टाॅप दाखवेल. बॅक निफ्टी नवीन टाॅप दाखवला आहे. आज प्रायव्हेट बॅका व SBI, बजाज फायनान्स मुळे बॅक निफ्टी तेजीत आहे.तसेच रिलायन्स व स्टील कंपनी तेजीत भागीदार आहेत.तसेच अनेक नवीन नवीन कंपन्या 52 आठवडयांचे उच्चांक दाखवत आहेत, याचाच अर्थ ही तेजी सर्व क्षेत्रात पसरत चालली आहे. हे सर्व संकेत दीर्घकाळ टिकणारी सर्व क्षेत्रात व्यापणारी तेजी असावी असे वाटतेय.भारतातील अपेक्षित चांगला जीडीपी (GDP),अपेक्षित स्थिर सरकार,अमेरीकेतील निवडणुक,कच्चे तेलावरील नियंत्रण,पुढील काही काळात अपेक्षित दर कपात व अगोदर अमेरिकेत नंतर आपल्याकडे, या सर्व गोष्टींकडे पाहता नक्कीच आपला बाजार भक्कमपणे पुढे जात राहील असा अंदाज आहे.'
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' आज निफ्टी १.00% ने २२६४३ वर सकारात्मक नोटवर बंद झाला तर सेन्सेक्स १.२८ % ने ७४६७१ वर बंद झाला. निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी बँक हे क्षेत्र होते ज्यांनी आज २.५६ % आणि २.५४ % ने वाढ केली आहे.
 
आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे मजबूत परिणाम, इतर बँकांकडून चांगल्या निकालांच्या उच्च अपेक्षांसह, गुंतवणूकदारांना PSU आणि खाजगी बँकांकडे आकर्षित केले. फेडरल रिझर्व्ह धोरणाची बैठक आणि या आठवड्यात अपेक्षित असलेली यूएस नॉन-फार्म पेरोल्सची आकडेवारी केंद्रस्थानी घेऊन, युनायटेड स्टेट्समध्ये या वर्षी लवकर व्याजदर कमी होण्याच्या आशा कमी झाल्यामुळे आज सोन्याच्या किमती घसरल्या.
 
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) मार्गदर्शक तत्त्वांमुळे बीएसईने वाढीव नियामक शुल्क भरावे अशी विनंती केल्याने स्टॉक एक्सचेंजला FY24 साठी ९६ कोटी रुपये अधिक GST खर्च होऊ शकतो. निर्देशामुळे बंद होताना बीएसई स्टॉकमध्ये १३.६८ % पेक्षा जास्त घट झाली. ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्सच्या प्रीमियम मूल्यावर नियामक शुल्काचा आधार घेण्याऐवजी, सेबीने विनंती केली की त्या करारांचे काल्पनिक मूल्य वापरले जावे.आदेशाच्या परिणामी BSE SEBI ला देणाऱ्या नियामक शुल्कात लक्षणीय वाढ होईल. पर्यायांमध्ये काल्पनिक मूल्य असते जे प्रीमियम मूल्यापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असते.हे मूल्य अंतर्निहित किंमतीने कराराच्या आकाराचा गुणाकार करून निर्धारित केले जाते.
 
निफ्टीमध्ये आयसीआयसीआय बँक,इंडसइंड बँक,एसबीआय,अल्ट्राटेक सिमेंट आणि ॲक्सिस बँक यांचा सर्वाधिक फायदा झाला, तर नुकसान झालेल्यांमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज,अपोलो हॉस्पिटल्स, बजाज ऑटो, एचडीएफसी लाईफ आणि हीरो मोटोकॉर्प यांचा समावेश आहे.'
 
बाजारातील रुपयांवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, "रुपयाने ०.१२ ची घसरण अनुभवली, ८३.४७ वर व्यापार झाला. निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्याने RBI च्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना न जुमानता रुपया कमजोर झाला आहे. निवडणुका चालू असताना, रुपयाची अस्थिरता कायम राहण्याची अपेक्षा आहे.पुढे पाहता, या आठवड्यात महत्त्वाच्या घटनांचा समावेश आहे. बुधवारी रात्रीचा यूएस व्याजदराचा निर्णय आणि शुक्रवारी संध्याकाळी यूएस नॉन-फार्म पेरोल आणि बेरोजगारी डेटा या घटना डॉलर इंडेक्स आणि रुपया दोन्हीसाठी नवीन ट्रिगर प्रदान करतील.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी भाष्य करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,'भारतीय बेंचमार्क निर्देशांकांनी पुनरुत्थान केले, यूएस टेक तिमाही कमाईमध्ये उत्साह आणि यूएस १० वर्षांच्या उत्पन्नातील घसरणीमुळे मदत झाली.चौथ्या तिमाहीतील मजबूत कामगिरीमुळे स्थानिक पातळीवर,बँक निफ्टीने उत्कृष्ट कामगिरी केली. मध्य पूर्व तणावात सहजता,स्थिर कमाईसह,बाजारातील सकारात्मक भावना कायम राखणे अपेक्षित आहे,FED धोरण आणि यूएस नॉन-फार्म पेरोल डेटा एकूण बाजारातील गतिशीलता ठरवेल."
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट निरज शर्मा म्हणाले, ' सेन्सेक्स आणि निफ्टी सारख्या प्रमुख निर्देशांकांमध्ये लक्षणीय वाढ, सकारात्मक जागतिक संकेत, बँकिंग आणि वित्तीय सेवा समभागांमध्ये जोरदार खरेदी यामुळे भारतीय शेअर बाजारांनी मजबूत दिवसाचा आनंद लुटला.शेअर बाजारातील अस्थिरता नजीकच्या भविष्यात वाढण्याची अपेक्षा आहे कारण अस्थिरता निर्देशांक इंडिया VIX १२% ने वाढला आहे. तांत्रिक दृष्टीकोनातून, निर्देशांकाने २२६३० चा अडथळा ओलांडला आहे आणि त्याच्या वर बंद होण्यात यश मिळविले आहे,ज्यामुळे ताकद सूचित होते.
 
परिणामी, निफ्टी २२७७६ चा सार्वकालिक उच्चांक मोडण्याचा प्रयत्न करू शकतो आणि निर्देशांक त्याच्यावर टिकून राहिल्यास, रॅली २३०००-२३१०० च्या पातळीवर वाढू शकते.अल्प मुदतीसाठी,२२५०० आणि २२३०० मजबूत समर्थन पातळी म्हणून काम करतील तर २२७८०आणि २३००० निर्देशांकासाठी अडथळा म्हणून काम करतील.
 
बँक निफ्टी १२२३ अंकांनी वाढून ४९४२४ वर नवीन सार्वकालिक उच्च पातळीवर बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या, बँक निफ्टी ४८५०० च्या प्रतिकाराच्यावर बंद झाला आहे आणि ४९०००-४९५०० चे अल्पकालीन लक्ष्य जवळपास गाठले आहे.तेजीचा वेग पाहता बँक निफ्टी अल्पावधीत ५०००० च्या पातळीची चाचणी घेईल.'