“...म्हणून लता दीदी माझ्या फोनची वाट पाहात होत्या”, महेश कोठारे रमले जुन्या आठवणींत

Total Views |

lata didi  
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि दिग्दर्शक-अभिनेते-निर्माते महेश कोठारे यांच्यात एक समान धागा असून त्याबद्दल महेश कोठारे यांनी ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा with कलाकारच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली असता माहिती दिली. सध्या ‘झपाटलेला ३’ चित्रपटामुळे महेश कोठारे (Mahesh Kothare) चर्चेत असून याही चित्रपटात कोणती नवी टेक्नॉलॉजी पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
 
महेश कोठारे म्हणाले की, “भारतरत्न लता मंगेशकर आणि माझं एक वेगळं नातं आहे. त्यांचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर. याचा एक खास किस्सा आहे. तो असा की, लता दीदी आणि माझी थेट ओळख नव्हती. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींना मी एकदा सांगितलं की मला माझ्या वाढदिवशी लता दीदींसोबत बोलायचं आहे. त्यांनी मला एक फोन नंबर दिला आणि सांगितलं की यावर फोन कर थेट त्याच फोन उचलतील. त्याप्रमाणे मी फोन केला आणि लता दीदी माझ्याच फोनची वाट पाहात होत्या. त्यांनी फोन उचलताच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या”.
 
दरम्यान, लता मंगेशकर यांनी महेश कोठारे यांच्या बाल वयातील तीन गाण्यांना आवाज दिला होता. त्यातील एक लोकप्रिय गाणं म्हणजे ‘तु कितनी अच्छी है.. ओ मॉं’ हे निरुपा रॉय आणि महेश कोठारे यांच्यावर चित्रित झालेल्या राजा और रंक मधील गाणं लता मंगेशकर यांनी गायले होते.
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.