"बंगालमध्ये टीएमसी बांगलादेशी घुसखोरांना जमीन देते तर काँग्रेस पैसे"

नरेंद्र मोदींचा ममता बॅनर्जी आणि काँग्रेसवर घणाघात

    26-Apr-2024
Total Views |

mamata banerjee

कोलकाता : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज शुक्रवार, २६ एप्रिल २०२४ मतदान सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथे एका सभेला संबोधित केले. जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्ही सर्वजण खूप प्रेम देत आहात, असे वाटते की जणू माझा जन्म बंगालमध्ये झाला आहे किंवा बंगालच्या आईच्या कुशीत झाला आहे. इतके प्रेम मला कधीच मिळाले नाही.”
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर (टीएमसी) निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, टीएमसीच्या राजवटीत बंगालमध्ये एकच गोष्ट सुरू आहे आणि ती म्हणजे हजारो कोटींचे घोटाळे. ते म्हणाले की टीएमसी घोटाळा करते आणि बंगालच्या लोकांना त्याची किंमत मोजावी लागते.
 
बंगालच्या समृद्ध इतिहासाचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले, “एक काळ असा होता जेव्हा बंगालने संपूर्ण देशाच्या विकासाचे नेतृत्व केले होते. पण, आधी डाव्यांनी आणि नंतर तृणमूलने बंगालच्या महानतेला धक्का लावला, बंगालच्या सन्मानाला धक्का लावला आणि त्याचा विकास थांबवला.
बंगालच्या लोकांना दिल्या जाणाऱ्या केंद्रीय योजनांच्या फायद्यांचा संदर्भ देताना ते म्हणाले, “पंतप्रधान किसान सन्मान निधीचे ८,००० कोटी रुपये बंगालमधील ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पाठवण्यात आले आहेत. पण, टीएमसी सरकार तुम्हाला लुबाडण्याची एकही संधी सोडत नाही. बंगालच्या विकासासाठी मी जो पैसा बंगाल सरकारला पाठवतो तो टीएमसी नेते, मंत्री मिळून खातात.
 
पंतप्रधान म्हणाले, “माँ-माटी-मानुष बोलून सत्तेत आलेल्या टीएमसीने येथील महिलांचा सर्वात मोठा विश्वासघात केला आहे. मुस्लिम भगिनींना अत्याचारापासून वाचवण्यासाठी भाजप सरकारने तिहेरी तलाक रद्द केला तेव्हा टीएमसीने त्याला विरोध केला. संदेशखळीमध्ये महिलांवर इतके अत्याचार झाले आणि टीएमसी सरकारने शेवटपर्यंत मुख्य आरोपीला वाचवले.
पंतप्रधानांनी टीएमसीवर तुष्टीकरणाचा आरोपही केला. ते म्हणाले, “टीएमसी आणि काँग्रेसला एकत्र ठेवण्याचे सर्वात मोठे चुंबक म्हणजे तुष्टीकरण होय. हे दोन्ही पक्ष तुष्टीकरणासाठी काहीही करू शकतात. तुष्टीकरणासाठी या लोकांना राष्ट्रहितासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय मागे घ्यायचा आहे.”
ते म्हणाले, “तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये तुष्टीकरणाची स्पर्धा सुरू आहे. बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांना वसवण्यासाठी टीएमसी सरकार काम करते. हे घुसखोर तुमच्या जमिनी आणि शेतजमीन ताब्यात घेत आहेत आणि काँग्रेस अशा घुसखोरांना तुमची मालमत्ता वाटून देण्याचे बोलत आहे."