मुंबई: खुशखबर ! आता प्रधानमंत्री आवास योजनेने आपल्या कक्षा रुंदावल्या आहेत. आता नोकरी पेशा माणसाबरोबर स्वयंरोजगार मिळवणारा छोट्या उदयोजक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतो.छोटे व्यापारी, छोटे दुकानदार व हातावर पोट असणाऱ्या उद्योजकांना या योजनेचा लाभ होऊ शकतो. या योजनेत सरकारने काही बदल केले असल्याने लवकरच या योजनेचा लाभ विविध स्तरांवर होण्याची शक्यता आहे.
निवडणूकीतील धामधुमीत सरकारने या योजनेचा विस्तार केला आहे. एका प्रसारमाध्यमांनी या बातमीचा खुलासा केला आहे. त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे परवडणारी घरं समाजातील व्यापक स्तरावर मिळवण्यासाठी या योजनेचा लाभ मिळू शकतो.सध्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना व्याजावर २.६७ लाखांचा लाभ होत आहे. या योजनेत जास्तीत जास्त वीस वर्षांचा कालखंड कर्ज परतावा मुदत म्हणून घेता येतो.यातील घरांची जास्तीत जास्त क्षेत्रफळ २०० स्क्वेअर मीटर असते.
काय बदलू शकते?
घर खरेदी करण्यासाठी सध्या घराची किंमत बेस म्हणून पकडली जाते. नवीन बदलात त्या व्यक्तीचे उत्पन्न हे घरावर मिळणाऱ्या कर्जासाठी विचारात घेता येऊ शकते. तसेच नवीन बदलात ३० लाखांपर्यंत घरावर सबसिडी मिळू शकते. सध्याच्या तरतूदीत जास्तीत जास्त १२ लाखांचे कर्ज मिळू शकते. सरकारच्या अनुसार सबसिडी मिळालेल्या घराची तिकिट साईज २५ लाखांपर्यंत असू शकते. या घरांवर व्याजाचा दर ४ टक्के असण्याची शक्यता आहे. सध्याच्या योजनेत सबसिडी दर ३ ते ६.५ टक्के आहे.
भाड्याने चाळीत, झोपडपट्टीत अथवा अनाधिकृत वस्तीतील वर्गाला या योजनेचा आधार मिळू शकतो आगामी काळात या योजनेचा लाभ १० दशलक्ष घरांना व्हावा या उद्देशाने मोदी सरकारने योजनेत बदल करण्याचे ठरवले आहे.केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पीएमएवायसाठी ची तरतूद ६६ टक्क्यांनी वाढवून ७९०००० कोटी रुपये करण्याची घोषणा केली.केंद्राने PMAY अंतर्गत २०२१ मध्ये क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (CLSS) बंद केली होती,जी उत्पन्नावर आधारित अनुदानित गृहकर्ज प्रदान करते. CLSS अंतर्गत, २५००००० घरांना वित्तपुरवठा करण्यात आला आणि ५९००० कोटी रुपयांची सबसिडी पाच वर्षांमध्ये वाढवण्यात आली.
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) योजना जून २०१५' मध्ये सुरू करण्यात आली होती,ज्याचे उद्दिष्ट सर्व पात्र शहरी लाभार्थ्यांना मूलभूत सुविधांसह पक्की घरे प्रदान करणे आहे. आता पुढील पाच वर्षांत आणखी २० दशलक्ष घरे जोडण्याचे या मिशनचे उद्दिष्ट आहे.