शेअर बाजार विश्लेषण: चार दिवसांनंतर बाजाराची धमाकेदार वापसी सेन्सेक्स ७३६४८.६२ निफ्टी २२३३६.४० पार

पीएसयु बँक समभागात तब्बल ३.०७ टक्क्यांनी वाढ या व्यतिरिक्त एमससीजी, फार्मा समभागात वाढ

    22-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज मोठी वाढ झाली आहे.सकाळच्या सत्रात निर्देशांकात झालेली वाढ आज अखेरच्या सत्रात कायम राहिली आहे.आज इक्विटी बाजारात सकारात्मकता दिसून आली आहे. एस अँड पी बीएसई सेन्सेक्स निर्देशांकात ५६०.२९ अंशाने वाढ झाल्याने सेन्सेक्स ७३६४८.६२ पातळीवर स्थिरावला आहे.
 
निफ्टी ५० निर्देशांक १८९.४० अंशाने वाढ होत २२३३६.४० पातळीवर स्थिरावला आहे.आज सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांकात अनुक्रमे ०.७७ व ०.८६ अंशाने वाढ झाली आहे. चार दिवसांच्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा बाजारात वाढ होत क्रूड तेल व सोने चांदीच्या भावातही घट झाली आहे.
 
बाजारातील गेले काही दिवस सातत्याने चालणारी घसरण पाहता आज बाजारात स्थैर्य पहायला मिळाले आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात आज मोठी वाढ झाली. सेन्सेक्स बँक निर्देशांक ५००.९६ अंशाने वाढत ५४२२१.७२ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३५०.७५ अंशाने वाढत ४७९२४.९० पातळीवर पोहोचला. आज विशेषतः बीएसई स्मॉलकॅपमध्ये १.२६ टक्क्याने वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅपमध्ये ०.९३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईवर मिडकॅप मध्ये ०.९४ टक्क्यांनी व स्मॉलकॅपमध्ये १.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
आज एनएसई क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये सगळ्या विभागात मोठी वाढ झालेली आहे. सर्वाधिक रेकॉर्ड वाढ पीएसयु बँकांत (३.०७ %) झाली असून फार्मा (१.३०%) ऑटो (०.९४%), एफएमसीजी (०.८४%) या समभागात सर्वाधिक वाढ झाली आहे.
 
आज बीएसईत एकूण ४०५७ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २६१९ समभागात वाढ व १२८५ समभागात घसरण झाली आहे. यामध्ये २३८ समभाग आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकनात राहिले आहेत तर १७ समभागात आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी किंमत राहिली आहे. ४५७ समभाग (Stocks) आज अप्पर सर्किटवर राहिले आहेत तर २४८ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
एनएसईत आज एकूण २७५४ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १८७५ समभागांच्या किंमतीत वाढ व ७६१ समभागांच्या मूल्यांकनात आज घसरण झाली आहे. ५२ आठवड्यातील सर्वाधिक किंमत राहिलेले आज १५१ समभाग होते तर ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी मूल्यांकनात राहिलेले एकूण २२ समभाग होते.यातील २०९ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले व ५३ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
जागतिक पातळीवरील आज सोने चांदीच्या व क्रूड तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली होती. पर्यायाने आशियाई बाजारातील क्रूड तेलाची किंमत नियंत्रणात दिसली नाही. गेले काही दिवस मध्यपूर्वेतील तणावामुळे क्रूड तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. इराण व इस्त्राईल मधील संघर्षाच्या काळात आज शांतता राहिल्याने घसरण होती.
 
मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात वाढ झाल्याने क्रूडचे दर आज नियंत्रित राहिले आहेत.WTI Future क्रूड निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.४५ टक्क्यांनी घसरण झाली. Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात आज संध्याकाळपर्यंत ०.५६ टक्क्यांनी घसरण झाली होती.
 
भारतीय एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) मध्ये क्रूड तेलाच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.९६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरेल ६८३१ रुपयांवर पोहोचली आहे.एमसीएक्सवर सोने व चांदीच्या निर्देशांकातही आज अनुक्रमे १.२६ व १.९४ टक्क्यांनी घसरण झाल्याने भारतीय सराफाबाजारात सोन्याचांदीच्या भावात एकूणच घसरण झाली आहे. शेअर बाजारात उत्तम संकेत मिळत असतानाच वोडाफोन आयडिया एफपीओ शेवटच्या दिवशी पूर्णपणे सबस्क्राईब झाला आहे.
 
आज मध्यपूर्वेत शांतता राहिल्याने कंपनीच्या तिमाही निकालावर गुंतवणूकदारांनी भर दिला आहे.आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण न झाल्याने आज बाजारातील स्थैर्य कायम राहिले आहेत. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारला असल्याने भारतीय रुपया ८३.२७ रूपयांवर स्थिरावला आहे.
 
अमेरिकन शेअर बाजारातील DOW शेअर बाजारात तेजी वगळता S & P 500 , NASDAQ शेअर बाजारात आज नुकसान झाले आहे. युरोपातील तिन्ही FTSE 100, DAX, CAC शेअर बाजार उसळले आहेत.आशियाई बाजारातील NIKKEI , HANG SENG बाजार वधारले असून SHANGHAI बाजारात आज नुकसान झाले आहे.
 
बीएसईतील कंपन्याचे आज बाजार भांडवल (Market Capitalisation) ३९७.९७ लाख कोटी व एनएसईत एकूण कंपन्याचे बाजार भांडवल ३९४.४९ लाख कोटी राहिले आहे.
 
बीएसईत आज लार्सन एक्सिस बँक,बजाज फायनान्स विप्रो,अल्ट्राटेक सिमेंट,आयसीआयसीआय बँक,एसबीआय,इन्फोसिस, टायटन कंपनी,एशियन पेंटस एचसीएलटेक,कोटक महिंद्रा,नेस्ले,टाटा मोटर्स, भारती एअरटेल, पॉवर ग्रीड,सनफार्मा,टीसीएस, मारूती सुझुकी,बजाज फिनसर्व्ह,रिलायन्स या समभागात आज गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.एनटीपीसी,एचडीएफसी, इंडसइंड बँक,टाटा स्टील या समभागात आज गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
एनएसईत आज टाटा कनज्यूमर, बीपीसीएल,आयशर मोटर्स, बजाज फायनान्स,श्रीराम फायनान्स, हिरो मोटोकॉर्प,एक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट,विप्रो,कोल इंडिया, ब्रिटानिया,एचसीएलटेक,इन्फी,सनफार्मा, अदानी एंटरप्राईज समभागात गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.एनटीपीसी,एचडीएफसी बँक,जेएसडब्लू स्टील, इंडसइंड बँक, बजाज ऑटो या समभागात आज गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
आज बँक निफ्टीवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले,'बँक निफ्टी निर्देशांकाने सतत तेजीचे सामर्थ्य दाखवले कारण त्याने खालच्या स्तरावरून खरेदीचा पाठपुरावा केला.सध्या, तो ४८००० च्या आसपास एक महत्त्वपूर्ण प्रतिकार पातळी गाठत आहे, जो कॉलच्या बाजूने सर्वाधिक खुल्या व्याजाने चिन्हांकित आहे.या पातळीच्या वर एक निर्णायक ब्रेक अपेक्षित आहे.पुढील शॉर्ट कव्हरिंग हालचाली सुरू करण्यासाठी, ४७६००-४७५००स्तरांवर तात्काळ समर्थन आहे,हे सूचित करते की या समर्थन क्षेत्राकडे कोणतीही डुबकी खरेदीची संधी देऊ शकते.'
 
आज निफ्टीतील हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले,'निफ्टीने सलग दुस-या सत्रात वाढ केल्याने बुल्सचे बाजारावर वर्चस्व कायम राहिले.जवळच्या काळातील महत्त्वाच्या मूव्हिंग ॲव्हरेजवर पुन्हा दावा केल्यानंतर कल सकारात्मक झाला आहे. जोपर्यंत ते २२१५० च्या वर राहील तोपर्यंत बुल्ससाठी भावना अनुकूल राहण्याची अपेक्षा आहे.वरच्या बाजूने, निर्देशांक संभाव्यतः २२६००-२२७०० च्या दिशेने जाऊ शकतो, उलट २२१५० च्या खाली घसरल्याने निर्देशांकात एकत्रीकरण होऊ शकते.
 
आज बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, ' शुक्रवारच्या रीबाऊंडच्या पुढे बाजाराने पुनर्प्राप्ती मजबूत केली आणि जवळपास एक टक्के वाढ केली. दृढ जागतिक संकेतांमुळे एक उत्साही सुरुवात झाली, त्यानंतर बहुतेक सत्रासाठी श्रेणी बंधनकारक होती.तथापि,शेवटच्या तासात निवडक हेवीवेट्समध्ये खरेदी केल्याने नफ्यात आणखी वाढ झाली. अखेरीस, ते २२३३६.४० स्तरावर दिवसाच्या उच्च पातळीवर स्थिरावले. सर्व प्रमुख क्षेत्रांनी या वाटचालीला हातभार लावला ज्यामध्ये ऑटो, बँकिंग आणि एफएमसीजी सर्वाधिक लाभधारक होते.व्यापक निर्देशांकांनी देखील या हालचालीशी समक्रमितपणे व्यापार केला आणि १% -१.४ % च्या श्रेणीत वाढ केली.
 
सहभागी जागतिक आघाडीवर स्थिरतेचा आनंद घेत आहेत तर कमाई आतापर्यंत संमिश्र संकेत देत आहे. निर्देशांकाच्या आघाडीवर, निफ्टीने त्याची अल्पकालीन मूव्हिंग सरासरी म्हणजेच २० DEMA वर पुन्हा दावा केला आहे परंतु विक्रमी उच्चांकाकडे इंच टिकण्यासाठी टिकाव महत्त्वपूर्ण आहे.सर्वांमध्ये, व्यापाऱ्यांनी हेज्ड पध्दत सुरू ठेवली पाहिजे आणि स्टॉक निवडीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.'