"माझी चुक झाली मला माफ करा- शरद पवार''

    22-Apr-2024
Total Views |
sharad pawar
 
अमरावती : आज दि. २२ एप्रिल २०२४ ला अमरावतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिविकास आघाडीचे मुख्य नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, य़शोमती ठाकुर उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मला माफ करा माझी चुक झाली असं विधान केलं आहे.
 
यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टिका केली. पाच वर्षांपुर्वी माझी चुक झाली. आम्ही ज्यांना पाठींबा दिला, ज्यांना निवडुण द्या म्हणुन मी जाहीर सभा घेतल्या ते खासदार झाले. पाच वर्षांपासुन मनात होतं की अमरावतीकरांना सांगावं की आमची चुक झाली. आता ती चुक दुरुस्त करायची आहे असं शरद पवार म्हणाले.
 
२०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष खासदार म्हणुन निवडुण आल्या होत्या. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठींबा दर्शवला होता. विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी २०२४ च्या निवडणुकीपुर्वी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्या आता पुन्हा महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. मागिल निवडणुकीत नवनीत राणा यांनी ३६९५१ मतांनी विजय मिळवला होता.