नकार दिल्याच्या रागातून काँग्रेस नेत्याच्या मुलीची फयाझने केली हत्या!

    19-Apr-2024
Total Views |
Congress Corporator's daughter stabbed to death

नवी दिल्ली : कर्नाटकातील हुबळी येथे नेहा हिरेमठ या २४ वर्षीय तरुणीची फयाझ नावाच्या मुलाने चाकू भोसकून हत्या केली. नेहा हिरेमठ या काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी होती. फयाझने महाविद्यालयाच्या आवारात तरुणीवर वार केले.ही घटना बी व्ही भूमराद्दी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात घडली. नेहा तिथे MCA च्या प्रथम वर्षात शिकत होती. बेळगावी जिल्ह्यातील सावदट्टी येथील फयाझ हा याच महाविद्यालयातून बीसीएचे शिक्षण घेत होता आणि तो नेहाचा वर्गमित्रही होता.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फयाझ महाविद्यालयाबाहेर नेहाची वाट पाहत होता आणि नेहा बाहेर येताच त्याने तिच्यावर वार केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फयाझने आपला चेहरा झाकल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. दरम्यान नेहा रक्ताथारोळ्यात खाली पडल्यावर फयाझने तिथून पळ काढला.सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, जेव्हा फयाझ नेहासमोर पहिल्यांदा येतो तेव्हा नेहा पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण फयाझ तिला पकडतो आणि तिला खाली पडून तिच्यावर चाकूचे वार करतो. यानंतर, आजूबाजूला जमलेल्या लोकांनी पीडितेला KIMS रुग्णालयात दाखल केले, परंतु गंभीर जखमांमुळे नेहाचा रुग्णालयात मृत्यू झाला.




या प्रकरणी पोलिसांनी आता फयाझविरोधात तक्रार दाखल केली आहे. फयाझ मुलीवर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता आणि मुलीने त्याला नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत फयाझ महिनोनमहिने तिचा पाठलाग करत असे. घटनेच्या दिवशी नेहा समोर आल्यावर त्याने तिच्या मानेवर वार केले, यावरून त्याचा हेतू नेहाला मारण्याचा होता हे स्पष्ट होते.या प्रकरणाबाबत बोलताना शहर पोलीस आयुक्त रेणुका एस सुकुमार यांनी सांगितले की, आधी दोघेही एकत्र बीसीएचे शिक्षण घेत होते. पण, बीसीएनंतर नेहाने MCA चे शिक्षण सुरु ठेवले.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फयाझला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात फयाझने प्रेमात नकार दिल्यानंतर असे कृत्य केल्याचे तपास अधिकारी सांगतात. या प्रकरणी नेहाच्या मित्र आणि नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे, जेणेकरून हत्येमागचा खरा हेतू काय होता हे कळू शकेल? नेहाच्या कुटुंबीयांनी आतापर्यंत ते फयाझला ओळखत नसल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे सर्व नेते नेहाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. यावेळी अभाविपनेही महाविद्यालयासमोर निदर्शने करत आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे.