शेअर बाजार विश्लेषण: आज सकाळी चढ्या बाजाराची अनपेक्षित कलाटणी सेन्सेक्स ४५४.६९ व निफ्टी १५२.०५ अंकाने घसरला बाजारात गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचे नुकसान

मिडिया समभागात तेजी बाकी समभागात पडझड कायम

    18-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात शेवटच्या सत्रात मोठी अनपेक्षितपणे घसरण झाली. बीएसईत सेन्सेक्स निर्देशांकात ४५४.६९ अंशाने घसरण होत सेन्सेक्स ७२४८८.९९ पातळीवर स्थिरावला आहे.एनएसईत निफ्टी ५० निर्देशांक आज १५२.०५ अंशाने घसरत २१९९५.८५ पातळीवर घसरला आहे.
 
सकाळी बाजार उघडल्यानंतर तेजीत राहिलेले दोन्ही सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात आज अखेरीस मोठी घसरण झाली आहे. एस अँड पी बीएसई बँक निर्देशांकात ५८४.८८ अंकाने घसरत ५३१७८.३४ पातळीवर पोहोचला आहे.निफ्टी बँक निर्देशांकात आज ४१५.३५ अंशाने घसरत ४७०६९.४५ पातळीवर निर्देशांक पोहोचला आहे. आज दोन्ही बँक निर्देशांकात अनुक्रमे १.९ व ०.८७ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
 
बीएसई मिडकॅप व लार्जकॅप समभागात आज घसरण झाल्याने आज बाजारात मोठी पडझड झाली आहे. मिडकॅप आज ०.०३ टक्क्यांनी व लार्जकॅपमध्ये ०.६० टक्क्यांनी घसरण झाली आहे.बीएसई स्मॉलकॅपमध्ये आज ०.२७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव कायम राहिल्याने आज गुंतवणूकादारांनी आपले आखडते हात घेतले आहे. विक्रीसाठी वाढलेल्या दबावाला बळी पडत अखेरीस इंट्राडे व्यवहारात पडझड झाली आहे.
 
बीएसईत बहुतांश निर्देशांक उतरलेले असताना निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्येही घसरण झाली आहे.निफ्टी मिडकॅप ०.४९ टक्क्यांनी व निफ्टी स्मॉलकॅपमध्ये ०.२८ टक्क्यांनी घट झाली आहे. एनएसईत निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात मिडिया वगळता सगळ्या प्रकारच्या समभागात पडझड झाली आहे.सकाळप्रमाणे मिडिया समभागात आज चढेभाव दिसले तरी इतर समभागात अखेरीस गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.सर्वाधिक नुकसान हेल्थकेअर,कनज्यूमर ड्युरेबल्स, एफएमसीजी,फार्मा,तेल गॅस व प्रायव्हेट बँक या समभागात झाले आहे.
 
आज बीएसीईत एकूण ३९२९ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १७६१ समभाग आज तेजीत राहिले असून २०४७ समभागांच्या मूल्यांकनात आज घसरण झाली आहे.यातील २११ समभाग आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकनात राहिले आहेत. तर ११ समभागांचे ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी मूल्यांकन आज राहीले होते. केवळ १ कंपनीचा समभाग आज लोअर सर्किटवर राहिला आहे.
 
एनएसईत आज एकूण २७३० समभागाचे ट्रेडिंग झाले असताना १३३१ समभागांच्या मूल्यांकनात वाढ झाली असून १३३१ समभागांच्या मूल्यांकनात आज घसरण झाली आहे. यांमधील १२७ समभाग ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकनात राहिले होते तर ८ समभागांचे आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी मूल्यांकन राहिले आहे.आज एनएसईत १६१ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ३६ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
बीएसईत आज एकूण बाजारी भांडवल (Market Capitalisation) ३९२.८९ लाख कोटी रुपये राहिले आहे. आज बाजारात ९ लाख कोटींचे नुकसान गुंतवणूकदारांना झाले. एनएसईचे एकूण बाजारी भांडवल ३८९.५७ लाख कोटी ठरले आहे. रुपयांच्या तुलनेत डॉलरची किंमत आज किंचित घसरली असल्याने डॉलर ८३.५३ रुपयांवर पोहोचला आहे. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या किमतीत घट झाली असून सोने १० ग्रॅमसाठी साधारण ७४१४० रुपयांवर पोहोचले आहे. रुपयांची किंमत आज वधारला असल्याने संथ असलेल्या सोन्याच्या भावात घट झाली आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावामुळे क्रूड तेलाच्या किंमती वाढल्या असताना आज मात्र घटलेल्या मागणीमुळे व आंतरराष्ट्रीय घडामोडीत स्थिरता आल्याने बाजारातील क्रूड तेलाचे भाव व निर्देशांकात घट झाली आहे.संध्याकाळपर्यंत WTI Future क्रूड निर्देशांकात ०.४४ टक्क्याने व Brent ०.६२ टक्क्यांनी घट झाली आहे. भारतातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange) निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.७० टक्क्यांनी घट होत क्रूड तेल ६८५० रुपये प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
 
आज परदेशी गुंतवणूकदारांनी ४४६८ कोटी रुपयांचे व देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २०४०.३६ कोटींचे समभाग विकल्याने आज बाजारात नकारात्मकता कायम राहिली आहे.आज ब्लू चिप शेअर्समध्ये १ ते २ टक्क्यांनी पडझड होतानाच आशियाई बाजारात मध्यपूर्वेतील देशांमध्ये वाढणारा तणावाचा प्रभाव कायम राहिला आहे. क्रूड तेलात घट झाली असली तरी बाजारात आज उत्साहावर्धक वातावरण राहिले नाही. परिणामी बाजारात ९ लाख कोटींचे गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
बीएसईत आज भारती एअरटेल, पॉवर ग्रीड, इन्फोसिस, लार्सन या समभागात वाढ झाली तर नेस्ले इंडिया,टायटन कंपनी, एक्सिस बँक,एनटीपीसी,टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह,आयसीआयसीआय बँक,एचडीएफसी बँक,अल्ट्राटेक सिमेंट, सनफार्मा, बजाज फायनान्स, मारूती सुझुकी या समभागात आज नुकसान झाले आहे.
 
एनएसईत आज भारती एअरटेल, पॉवर ग्रीड, बजाज ऑटो हिंदाल्को, इन्फी, एचडीएफसी बँक, टाटा कनज्यूमर, आयशर मोटर्स, अदानी पोर्टस, बीपीसीएल या समभागात वाढ झाली असून अपोलो हॉस्पिटल, नेसले इंडिया, टायटन, एक्सिस बँक, डिवीज, अदानी एंटरप्राईज, एनटीपीसी, सिप्ला,टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, हिरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय बँक,श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, सन फार्मा, एचडीएफसी बँक या समभागात आज गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना,असित सी. मेहता इन्व्हेस्टमेंट इंटरमीडिएट्स लिमिटेड येथील AVP टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्ह रिसर्च हृषिकेश येडवे यांच्या म्हणण्यानुसार, "चालू असलेल्या भू-राजकीय चिंतेमुळे प्रचंड अस्थिरतेमुळे निफ्टी निर्देशांकाने दिवसाची समाप्ती नकारात्मक क्षेत्रामध्ये २१९९६ वर केली, तांत्रिक दृष्टिकोनातून जर निर्देशांकात २२००० पातळीच्या वर टिकून राहिल्यास,२२३००-२२५०० च्या दिशेने एक रिलीफ रॅली शक्य आहे, याउलट, २१९५० च्या खाली टिकून राहिल्यास २१८०० -२१७०० च्या दिशेने आणखी कमजोरी येऊ शकते.
 
निफ्टी बँक निर्देशांकाची सुरुवात वरच्या अंतराने झाली परंतु विक्रीच्या दबावामुळे तो उच्च पातळी राखण्यात अयशस्वी झाला आणि ४७०६९ च्या आसपास बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या, जर निर्देशांकाला ४६८००पातळीचा पाठिंबा असेल, तर ४८००० च्या दिशेने पुलबॅक रॅली नाकारता येत नाही. ४६८०० पातळीच्या खाली टिकून राहिल्यास ४६८००-४५८०० च्या दिशेने आणखी कमजोरी येऊ शकते.बँक निफ्टीसाठी अल्पकालीन समर्थन पातळी ४६८०० आणि ४५८०० वर ओळखल्या जातात, तर प्रतिकार पातळी ४८००० आणि ४९०६० वर आहेत".
 
आजच्या पडझडीवर विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' आज निफ्टी ०.६९ % घसरत २१९९५ वर बंद झाला, तर सेन्सेक्स ०.६२ % घसरून ७२४८८ वर बंद झाला.तर निफ्टी मीडिया हे क्षेत्र होते ज्याने आज अनुक्रमे ०.७७ % ची कामगिरी केली.अशोक लेलँड लिमिटेड, व्यावसायिक वाहनांची उत्पादक कंपनी, दक्षिण भारतीय बँकेसोबत डीलर फायनान्स करार आहे. अशोक लेलँडच्या निवेदनानुसार.बँकेच्या डीलर क्रेडिट उपक्रमांतर्गत,व्यवसायाने डीलर्सना वित्तपुरवठा करण्यासाठी एक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.
 
ब्रिटीश संरक्षण मंत्रालयाच्या £१.२ -बिलियन डिजिटल आणि IT व्यावसायिक सेवा फ्रेमवर्कमध्ये पुरवठादार म्हणून मास्टेकचा समावेश केल्यामुळे मास्टेक ८ % वाढीसह बंद झाला. UK संरक्षण मंत्रालयाच्या डिजिटल आणि व्यावसायिक सेवा फ्रेमवर्कच्या संदर्भात, Mastek ला समाधान, एंटरप्राइझ आणि टेक आर्किटेक्चर, डेटा, इनोव्हेशन, टेक ॲश्युरन्स आणि माहिती व्यवस्थापन प्रदान करण्याचे काम देण्यात आले आहे.भारती एअरटेल, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन,हिंदाल्को, बजाज ऑटो, एलटीआय माइंडट्री हे निफ्टीमध्ये वाढले तर अपोलो हॉस्पिटल, नेस्ले, ओएनजीसी, ॲक्सिस बँक आणि टायटन कंपनी निफ्टीमध्ये सर्वाधिक तोट्यात होते.'
 
आजच्या निफ्टीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले, "बँक निफ्टी निर्देशांक मंदीच्या नियंत्रणाखाली राहतो, कोणत्याही वरच्या हालचालींना आक्रमक विक्रीचा सामना करावा लागतो, जो व्यापाऱ्यांमध्ये प्रचलित "सेल ऑन राईज" भावना व्यक्त करतो. निर्देशांकाचा प्रमुख प्रतिकार ४८००० वर आहे, जेथे लक्षणीय कॉल लेखन क्रियाकलाप दिसून आला आहे, या स्तरावर मजबूत प्रतिकार दर्शविते, एकूण बाजाराचा टोन मंदीचा आहे आणि विक्रीचा दबाव कायम राहिल्यास, निर्देशांक ४६५०० वर त्याची पुढील प्रमुख समर्थन पातळी तपासू शकेल, जेथे १०० दिवसीय घातकीय मूव्हिंग एव्हरेज (EMA) स्थित आहे."
 
आजच्या निफ्टीतील हालचाली विषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले, ' "इंडेक्स 21EMA च्या क्रिटिकल मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली राहिल्याने निफ्टी कमजोर होत राहिला. तथापि, तासाच्या चार्टवर, निर्देशांकाने तेजीचा विचित्र पॅटर्न तयार केला आहे, जो नजीकच्या काळात संभाव्य तेजीच्या उलट सूचवितो. याव्यतिरिक्त, तेजीचे विचलन स्पष्ट आहे. प्रति तासाच्या चार्टवर, निर्देशांक २२२०० /२२३०० कडे वाढू शकतो.