महिला खासदाराबद्दल बोलताना राऊतांची जीभ घसरली! म्हणाले, "नाची, डान्सर..."

    18-Apr-2024
Total Views |

Sanjay Raut 
 
अमरावती : एका महिला खासदाराबाबत बोलताना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. गुरुवारी अमरावती येथे त्यांनी सभा पार पडली. यावेळी त्यांनी महायूतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविषयी त्यांनी अतिशय खालच्या शब्दात टीका केली.
 
संजय राऊत म्हणाले की, "तुम्हाला बाई खुणावेल. ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला ती प्रेमाने बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका. पुराणामध्ये काय घडलं. विश्वमित्राचंसुद्धा हरण झालं. ऋषीमुनिसुद्धा गेले. पण आपण सगळ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सावध राहायला हवं. डोळा मारला की, जायचं नाही. ते आपलं काम नाही. आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे. ही लढाई देशाची आहे. ही लढाई बळवंत वानखेडे आणि त्या नाचीची नाही. डान्सरशी, बबलीशी नाही. ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? -  सुनेला दिल्लीत पाठवा, लेकीला गल्लीत राहूद्या : नीलम गोऱ्हे
 
ते पुढे म्हणाले की, "ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, ज्या बाईने मातोश्रीविषयी आणि हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले त्या बाईचा पराभव करणं हे शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आहे. तिच्या पराभवात शिवसेनेचं योगदान मोठं असलं पाहिजे," असेही ते म्हणाले.