“जितके चित्रपटात गुंतवले तितके पैसे...” रणदीपने दिलं कमाईबद्दलच उत्तर
17-Apr-2024
Total Views |
रणदीप हुड्डा दिग्दर्शित, अभिनित आणि निर्मित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाने यशस्वीपणे चित्रपटगृहात चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे.
मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) चित्रपट रणदीप हुड्डा याने दिग्दर्शित आणि अभिनित करुन प्रेक्षकांची मने जिंकली. २२ मार्च रोजी हिंदीत आणि २९ मार्च रोजी मराठीत प्रदर्शित झालेल्या या (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही यशस्वी कलेक्शन केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील हा भव्य चरित्रपट साकारण्यासाठी चक्क रणदीप हुड्डा याने त्याचे मुंबईतील घर विकले होते. मात्र, आता या घराबद्दल त्याने महत्वाचा खुलासा केला असून आपल्या वडिलांनी कशी साथ दिली याबद्दलही भाष्य केले आहे.
रणदीप हुड्डा म्हणाला, "स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीसाठी मी मुंबईतील घर विकून जे पैसे गुंतवले होते त्यांची परतफेड सुदैवाने चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून झाली आहे. आता मी मस्करीत माझ्या वडिलांना म्हणतो की तुम्ही अजुन प्रोपर्टी विकत घ्या म्हणजे मी माझ्या पुढच्या चित्रपटांसाठी त्या विकून भांडवल उभे करेन आणि चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून कमवेन".
पुढे बोलताना रणदीप म्हणाला की, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही पैसे गुंतवले होते. कारण मी सढळ हाताने खर्च करणारा माणूस आहे. म्हणूनच माझ्या वडिलांनी मुंबईत काही घरं खरेदी केली होती", असे म्हणत रणदीप म्हणाला की स्वातंत्र्यवीर चित्रपट पुर्ण करण्यासाठी दोन वर्ष लागल्यामुळे अन्य कोणत्याही प्रोजेक्टचा मी भाग झालो नाही.
आपल्या वडिलांबद्दल बोलताना रणदीप असं देखील म्हणाला की, “बऱ्याचदा सामान्य कुटुंबातील वडिल आपली पुंजी सहजासहजी देताना विचार नक्की करतील. पण माझ्या वडिलांनी कुठलाही विचार न करता माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पाठिंबा दिला.दरम्यान, आत्तापर्यंत या चित्रपटाने जवळपास ३० कोटीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चरित्रपटात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिन्ना, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बॉस, भिकाजी कामा, मदनलाल धिंगरा, भगत सिंह इत्यादि क्रांतिकराकांच्या भूमिकाही चित्रपटात पाहायला मिळत आहेत.