"शाळेत नमाज पठण करायचे असल्यास शाळा सोडा"; धार्मिक प्रार्थनेसाठी परवानगी मागणारी याचिका कोर्टाने फेटाळली

    17-Apr-2024
Total Views |
 namaz
 
लंडन : ब्रिटनमधील एका शाळेतील मुस्लिम विद्यार्थिनीने शाळेच्या आवारात नमाज पठण करण्यावर बंदीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण त्या याचिकाकर्त्या मुलीली न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने विद्यार्थिनीची याचिका फेटाळून लावत तिला शाळेत शिकायचे असेल तर शाळेचे नियम पाळावे लागतील, असे स्पष्टपणे सांगितले.
 
विद्यार्थिनी किंवा तिच्या पालकांना शाळेचे कोणतेही नियम आवडत नसतील तर ते शाळा सोडण्यास मोकळे आहेत, असेही आपल्या निर्णयात न्यायालयाने ठणकावून सांगितले. हे प्रकरण ब्रेंटमधील मायकेला कम्युनिटी स्कूलशी संबंधित आहे, जे ब्रिटनमधील सर्वात कठोर नियम असलेल्या शाळांपैकी एक आहे. या शाळेत धार्मिक शिक्षणास सक्त मनाई आहे. या शाळेच्या आवारात कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी आहे.
 
 
या शाळेत ७०० मुले शिकतात, त्यापैकी निम्म्याहून अधिक मुस्लिम आहेत. या शाळेत नमाजावर बंदी असतानाही मार्च २०२३ मध्ये ३० शाळकरी मुलांनी स्वेटर पसरवून त्यावर नमाज पठण केले. यानंतर शाळेने कडक कारवाई करत सर्वांना ताकीद दिली. यानंतर शाळकरी मुलीने उच्च न्यायालयात अपील केले होते.
 
या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती लिंडेन यांनी आपल्या ८३ पानांच्या निर्णयात म्हटले आहे की, या शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांना सांगितले जाते की, या शाळेत धार्मिक कार्यांना जागा नाही. ही शाळा अधार्मिक शाळा म्हणून बांधण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, संस्थापक आणि मुख्य शिक्षिका कॅथरीन बिरबल सिंग यांनी हा निर्णय “सर्व शाळांचा विजय”असल्याचे सांगितले.
 
 
सिंग म्हणाल्या की,“शाळेने मुलाला आणि त्याच्या आईला त्यांचे मत बदलण्यास भाग पाडू नये कारण त्यांनी ठरवले आहे की त्यांना शाळेबद्दल काही आवडत नाही,” असे शाळेने उच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सांगितले. जर पालकांना मायकेला सारखे काहीतरी आवडत नसेल तर त्यांनी त्यांच्या मुलांना आमच्याकडे पाठवण्याची गरज नाही."