काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने खूप मोठी चूक केली : विशाल पाटील

    16-Apr-2024
Total Views |

Vishal Patil 
 
सांगली : काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने सांगलीमध्ये खूप मोठी चूक केली आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी केली आहे. सागंली लोकसभेची जागा उबाठा गटाला गेल्याने विशाल पाटील नाराज असून त्यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाचा आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यानंतर त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
विशाल पाटील म्हणाले की, "मी सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यानंतर त्या सर्वांचा सूर असा आला की, आपण अर्ज भरायला हवा. पक्षाने आणि महाविकास आघाडीने याठिकाणी खूप मोठी चूक केलेली आहे. भाजपचा पाडाव करण्यासाठी सक्षम उमेदवार देणं गरजेचं होतं पण तसं घडलं नाही. त्यामुळे अजूनही आपण पक्षाकडून अर्ज भरून त्यांच्याकडे मागणी करावी असा निर्णय सर्वांनी कळवला."
 
हे वाचलंत का? -  साताऱ्यात भाजपतर्फे उदयनराजेंना उमेदवारी जाहीर!
 
"सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाशी निगडित असलेल्या जवळजवळ ३८ हजार कार्यकर्त्यांना आम्ही काय निर्णय घ्यावा याबाबत विचारणा केली. त्यानंतर आलेला निकाल आम्ही काही वेळात जाहीर करु. पण त्यातलाच एक भाग म्हणून काल मुहूर्तावर काँग्रेस पक्षाच्या वतीने परंपरेनुसार एक पक्षाचा आणि एक अपक्ष असा अर्ज मी भरला," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "१९ तारखेला पक्षाने उमेदवारी दिली नाही तर पुढची चर्चा होईल. सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाच्या ताकदीबद्दल सारासार विचार केल्यास १९ तारखेला ३ वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाच्या एबी फॉर्ममध्ये माझ्या नावाचा समावेश असेल," असेही ते म्हणाले