रामललांसाठी 'छप्पन भोग'चा नैवेद्य तर भाविकांना 'धनिया पंजीरी'चा प्रसाद
16-Apr-2024
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी) : पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत भव्य श्रीरामाचे (Shri Ram) मंदिर उभे राहते आहे. श्रीरामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर आता रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहे. मंदिरसुद्धा अतुलनीय अशा सजावटीने तयार झाले आहे. रामनवमीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना 'धनिया पंजीरी' प्रसाद म्हणून देण्यात येणार असून रामललासाठी एका अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली छप्पन भोग तयार होत असल्याची माहिती श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासचे महामंत्री चंपत राय यांनी माहिती दिली.
मंदिरात येणारे दर्शनार्थी सात रांगांमधून मंदिरापर्यंत पोहोचतील. दर्शन मार्गावर सावली देण्यासाठी जर्मन हँगर्स बसवण्यात आले आहेत. तसेच उन्हाच्या तडाख्यात दर्शनार्थींचे पाय भाजू नये यासाठी मॅट टाकल्या जात आहेत. दर्शन मार्गावर पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.