रामनवमीच्या पूर्वसंध्येला १० घरांवर आणून ठेवले दगड! पोलीसांची कारवाई
16-Apr-2024
Total Views |
रांची : पाचशे वर्षांनंतर हिंदूंच्या आनंदाला पारावार नाही, कारण यंदाची रामनवमी ही विशेष असणार आहे. रामलला मंदिर विराजमान झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या रामनवमीसाठी रामभक्तांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र, या सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला आहे. झारखंड पोलीसांनी वेळीच सावध होऊन हा हल्ला रोखण्याची कामगिरी केली. पोलीसांना रांचीतील काही घरांच्या छतावर मोठ्या प्रमाणावर संशयास्पदरीत्या दगड उचलून आणण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीसांनी या प्रकरणात नोटीस जाहीर केली आहे. मुख्य रस्त्यालगतच्या सर्व घरांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. लेक रोड, हिंद पईठ रोड इतर भागात पोलीसांनी ड्रोनद्वारे पाहणी केली. यावेळी आढळलेले दगड पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलीसांनी या प्रकरणी अशा समाजकंटकांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे. जर का श्रीराम नवमीच्या दिवशी कुठल्याही प्रसंगावेळी दगडफेकीसारखा प्रसंग घटला तर कारवाईत कुठलीही कसूर सोडणार नाही, असेच पोलीसांनी बजावले आहे.
येत्या हिंदू सणानिमित्त कुठल्याही प्रकारे अफवा पसरवणे, समाजकंटकांमार्फत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रसंग घटना तर संबंधित आरोपी कठोर कारवाईस पात्र राहिल, अशा कडक सूचना रांची पोलीसांनी दिल्या आहेत. यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीसांनी १७ एप्रिल रोजी साजरी केल्या जाणाऱ्या रामनवमीसाठी विशेष खबरदारी घेतली आहे. २०२३ मध्ये रामनवमीच्या निमित्त देशात काही ठिकाणी समाजकंटकांनी शोभायात्रांवर दगडफेकीसारखे प्रकार केले होते. याला आळा घालण्यासाठी पोलीसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.