‘पुष्पा २’ने’ ‘अॅनिमल’, ‘जवान’ना मागे टाकत रचला इतिहास, कमावले १००० कोटी!

    16-Apr-2024
Total Views |

pushpa 2 
 
 
मुंबई : “पुष्पा फ्लावर नही फायर है” असं म्हणत प्रेक्षकांनी अक्षरश: अल्लू अर्जूनला डोक्यावर घेतले होते. आता चाहते ‘पुष्पा २’ (Pushpa 2 : The Rule) ची वाट पाहात असून या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच अनेक हिंदी चित्रपटांना मागे टाकले आहे. चित्रपट यशस्वी होण्यामागे दोन महत्वाची कारणे असतात. त्यापैकी एक म्हणजे प्रेक्षकांना प्रतिसाद आणि दुसरं म्हणजे बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन. अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शनानंतर १०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिस कलेक्शन करतात. पण ‘पुष्पा २’ (Pushpa 2 : The Rule) या चित्रपटाच्या तिकीट विक्रीनेच १००० कोटी कमावले आहेत.
 
बहुचर्चित ‘पुष्पा २’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाने प्रदर्शनापुर्वी अनोखा विक्रम केला आहे. पुष्पा २ चित्रपटाच्या तिकीट विक्रीची रक्कन समोर आली असून ती १००० कोटी इतकी झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने ‘अॅनिमल’, ‘पठाण’, ‘गदर २’ चित्रपटाला कित्येक पटीने मागे टाकले आहे.
 
कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला की बॉक्स ऑफिस कलेक्शन ३०० -४०० कोटींचे झाले असे आपण ऐकतो. पण जागतिक स्तरावर तो चित्रपट दुप्पट किंमत कमावतो आणि १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करतो. आत्तापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत प्रदर्शनानंतर अनेक चित्रपट १००० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाले आहेत. पण ‘पुष्पा २’ याला अपवाद ठरला असून या चित्रपटाची तिकीट विक्रीचीच किंमत १००० कोटी झाली आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटाने भारतात ५००-६०० कोटी कमावले होते आणि जगभरात १००० कोटींचा गल्ला जमवला होता. आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाने ३८७ कोटी देशात आणि २००० कोटी जागतिक स्तरावर कमावले होते.
 
'पुष्पा २ - द रुल' हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे बजेट ५०० कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांच्या यादीत 'पुष्पा २'चा समावेश असून 'पुष्पा : द राइज' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.