मोहित सोमण: आजच्या सत्राची सांगता पडझडीनेच झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मध्यपूर्वेतील दबाव, इस्त्राईल इराण संघर्ष, क्रूड तेलाच्या किंमती बरोबर वाढलेला डॉलर व सोन्याचे दर यामुळे आशियाई बाजारात मरगळ आली आहे. परिणामी सकाळच्या सत्रातील घसरण बाजाराच्या शेवटीही कायम राहिली आहे.
आज एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांक ८४५.१२ अंकाने घसरत ७३३९९.७८ पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टी ५० निर्देशांक २४६.९० अंशाने घसरत २२२७२.५० पातळीवर स्थिरावला आहे. विशेषतः बँक निर्देशांकात आज मोठी पडझड झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ८५०.८३ अंशाने घसरण झाली असून निर्देशांक ५४०३३.५४ पातळीवर स्थिरावला होता. बँक निफ्टीत ७९१.३० अंशाने घसरण होत ४७७७३.२५ पातळीवर स्थिरावला आहे.
बीएसई (BSE) मिडकॅप १.५० टक्क्यांनी घसरला आहे व बीएसई स्मॉलकॅप १.५४ टक्क्यांनी घसरला आहे. बीएसई मिडकॅपमधील ११३ समभाग (Shares) घसरले आहेत व त्यामध्ये २३ समभाग आज वधारले. बीएसई स्मॉलकॅपमधील १६८ समभाग वधारले आहेत तर ९१२ कंपन्याचे समभाग आज घसरले आहेत.
एनएसई (NSE) मधील निफ्टी मिडकॅप १.५३ टक्क्यांनी घसरले आहेत. यामध्ये ५१ समभाग घसरले असून केवळ ९ समभागात आज वाढ झाली. निफ्टी स्मॉलकॅपमध्ये आज १.३६ टक्क्यांनी घट झाली आहे. ज्यामध्ये ६१ कंपन्याचे समभाग घसरून १३ कंपन्याचे समभाग आज वधारले आहेत.
निफ्टीतील क्षेत्रीय निर्देशांकात तेल व गॅस समभाग निर्देशांक वगळल्यास इतर सगळ्या क्षेत्रातील निर्देशांकात पडझड झाली आहे. निफ्टी तेल व गॅस (०.४१ %) वाढला असून सर्वाधिक नुकसान मिडिया (२.२३ %) समभागात झाली आहे. याशिवाय फायनांशियल सर्विसेस, आयटी, पीएसयु बँक, प्रायव्हेट बँक, हेल्थकेअर समभागात आज गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
बीएसईत आज ४०४९ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २९८५ समभाग आज गुंतवणूकदारांनी नाकारले आहेत तर ९१७ समभागांचे मूल्यांकन आज वाढले.यापैकी २७८ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम असून ४२१ समभाग आज मात्र लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
एनएसईत २७४७ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २१२७ समभाग गुंतवणूकदारांनी नाकारले आहेत तर ५२१ समभागांच्या मूल्यांकनात आज वाढ झाली. ५२ समभागांचे मूल्यांकन आज अप्पर सर्किटवर कायम राहिले असून २३७ कंपन्याचे समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
बीएसईत आजचे बाजारी भांडवल (Market Capitalisation) ३९४.६२ लाख कोटी तर एनएसईत ३९१.३१ लाख कोटी राहिले आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी वाढलेल्या दबावाने आज इक्विटी बाजारातील गुंतवणूक काढून घेतली आहे.गेल्या २ ते ३ दिवसात ७.५ लाख कोटींचे गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
बीएसईत नेसले, मारूती सुझुकी,भारती एअरटेल, रिलायन्स, एम अँड एम या समभागांचे मूल्यांकन आज वधारले आहे.बजाज फायनान्स,लार्सन, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक,बजाज फायनान्स, टीसीएस या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
एनएसईत ओएनजीसी, हिंदाल्को, मारूती, नेसले इंडिया, ब्रिटानिया, भारती एअरटेल या समभागात आज गुंतवणूकादारांचा फायदा झाला आहे. श्रीराम फायनान्स,विप्रो, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह,अदानी पोर्टस टाटा मोटर्स,एल अँड टी,अदानी एंटरप्राईज, बीपीसीएल,टेकएम, एचडीएफसी बँक, हिंदूस्थान युनिलिव्हर,टाटा कनज्यूमर,एक्सिस बँक,टीसीएस या समभागात आज घसरण झाली आहे.
क्रूड तेलाचे WTI निर्देशांकात संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ०.७४ टक्क्यांनी घसरण झाली व Brent निर्देशांकात ०.६८ टक्क्यांनी घसरण झाली असली तरी सकाळी क्रूड तेलाच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली होती.परिणामी आशियाई बाजारातील मध्यपूर्वेतील दबावाने क्रूड तेलाची किंमत वाढली असली तरी संध्याकाळी जागतिक क्रूड मध्ये घसरण झाल्याने एमसीएक्स क्रूड तेलाची किंचित घसरण झाली आहे. प्रति बॅरेल क्रूड किंमत १.३३ टक्क्यांनी कमी होत ७०५८ रुपयांवर पोहोचली आहे.सकाळी सोन्याच्या व चांदीच्या दरात देखील वाढ झाली होती.
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीज कंपनी म्हणाली, 'इराण आणि इस्रायल यांच्यातील भू-राजकीय तणावामुळे सोमवारी भारतीय इक्विटी बेंचमार्कमध्ये मोठी घसरण झाली.अखेरीस, निफ्टीने दिवसाचा दिवस नकारात्मक क्षेत्रामध्ये २२२७३ वर स्थिरावला. तांत्रिक दृष्टीकोनातून,निर्देशांक दैनंदिन स्तरावर वाढत्या चॅनेल पॅटर्नमध्ये एकत्रित होत आहे, तर साप्ताहिक स्केलवर, त्याने शूटिंग स्टार पॅटर्न तयार केला आहे. चॅनेल पॅटर्नची खालची सीमा सुमारे २२००० स्तरांवर स्थित आहे, ज्यामुळे ते महत्त्वपूर्ण समर्थन स्तर बनते. एकंदरीत,आम्ही २२५०० वर तात्काळ अडथळ्यासह, Q4FY24 कमाईपूर्वी २२०००० ते २३००० च्या मर्यादेत व्यापार करेल अशी अपेक्षा करत आहोत.
निफ्टी बँक निर्देशांक ४७७७३ च्या आसपास नकारात्मक झोनमध्ये बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या,बँक निफ्टी निर्देशांकाने साप्ताहिक स्केलवर डोजी कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे आणि डोजी मेणबत्तीच्या खालच्या स्थितीत ठेवली आहे, जे अल्पकालीन कमकुवतपणा दर्शवते. बँक निफ्टीसाठी अल्पकालीन समर्थन पातळी ४७००० आणि ४६४०० वर, प्रतिकार पातळी ४८००० आणि ४९०६० वर दिसून आली.'
बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,'भू-राजकीय तणाव आणि अपेक्षेपेक्षा जास्त असलेल्या यूएस चलनवाढीने गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम केला आणि निर्देशांक कमी नोंदीकडे खेचले.त्यांच्या समृद्ध मूल्यांकनामुळे आणि Q4FY24 मध्ये कमाईच्या वाढीमध्ये मध्यम अपेक्षा असल्यामुळे मिड- आणि स्मॉल-कॅप निर्देशांकांचे मोठे नुकसान झाले.दुसरीकडे, युरोपियन बाजार सकारात्मक नोटवर उघडला तर तेलाच्या किमती कमी झाल्या कारण बाजारातील सहभागींना अपेक्षा होती की राजनयिक प्रयत्नांमुळे मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता आहे."
बाजारातील निफ्टीतील हालचालीविषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले,'निफ्टी अलीकडेच एका महत्त्वपूर्ण मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली एकत्रीकरणातील बिघाडामुळे घसरला.याव्यतिरिक्त, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) मंदीचा क्रॉसओव्हर दर्शवितो.अल्पकालीन भावना मंदीचा दिसतो, जरी सध्या लक्षणीय घट अपेक्षित नाही.त्याऐवजी निर्देशांक २२००० आणि २२४०० च्या दरम्यान चढ-उतार होण्याची शक्यता आहे.जोपर्यंत निर्देशांक २२४०० च्या खाली राहील तोपर्यंत विक्रेत्यांना कायम राहण्याची अपेक्षा आहे."
आज दोन्ही बँक निर्देशांकातही मोठी घट झाली होती यावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले,' बँक निफ्टी निर्देशांकाने इंट्राडे बाउन्स दरम्यान दृश्यमान विक्रीसह मजबूत मंदीच्या दबावाचा सामना करणे सुरू ठेवले आहे. निर्देशांक ४७५०० वर त्याच्या समर्थनाची चाचणी घेण्यास तयार आहे,जो २० -दिवसांच्या मूव्हिंग सरासरी (20DMA) सह संरेखित आहे. या पातळीच्या वर ठेवण्यात अयशस्वी ४८५०० ते ४८६०० झोनमध्ये ५०००० च्या वरच्या दिशेने जाण्यासाठी एक निर्णायक ब्रेक आवश्यक आहे.
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले,'आज निफ्टी १.१० % ने २२२७२ वर नकारात्मक नोटवर बंद झाला, तर सेन्सेक्स १.१४ % ने खाली ७३३९९ वर बंद झाला. तर निफ्टी ऑइल अँड गॅसने आज अनुक्रमे ०.४१ % ने वाढ केली.आठवड्याच्या शेवटी इराण आणि इस्रायल यांच्यातील भू-राजकीय तणावामुळे जागतिक जोखीम भावना बिघडली. सकारात्मक घरगुती मॅक्रो इकॉनॉमिक आकडेवारीने बाजाराला मोठ्या घसरणीपासून संरक्षण दिले. CPI मार्च २०२४ मध्ये ५.०९ % च्या तुलनेत ४.८५% होता.फेब्रुवारी २०२४ नंतर औद्योगिक उत्पादन फेब्रुवारी २०२४ च्या तुलनेत ५.७ % ने वाढले जे जानेवारी 2024 मध्ये ३.८ % होते.
निफ्टीमध्ये श्रीराम फायनान्स,विप्रो,एल अँड टी,आयसीआयसीआय बँक आणि बजाज फिनसर्व्ह यांचा सर्वाधिक तोटा झाला, तर लाभधारक ओएनजीसी, हिंदाल्को इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे समभाग ठरले आहेत.'