मुंबई: काल शेअर बाजारात मोठ्या दिमाखात निर्देशांकात वाढ झाली होती.आज मात्र ईद - उल - फितर निमित्त आज शेअर बाजार बंद राहणार आहे. बुधवारी ब्लू चीप कंपन्यांच्या समभागात ०.४९ टक्क्यांनी वाढ झाली होती.
आज बीएसई व एनएसई दोन्ही एक्सचेंज ईदनिमित्त बंद राहणार आहेत. आज डेट, इक्विटी बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे. बीएसईत बुधवारी बाजार ०.४७ टक्क्यांनी वाढत ७५०३८.१५ पातळीवर बंद झाला होता. आज एमसीएक्स (Multi Commodity Exchange) सकाळी ९ ते ५ या वेळात बंद राहणार आहे.
दुपारी पाचनंतर आज एमसीएक्स पुन्हा चालू होईल. यानंतर सतरा तारखेला रामनवमी निमित्त बाजार बंद राहणार आहे. याशिवाय बाजारात महाराष्ट्र दिन १ मे, बकरी ईद जून १७, मोहोरम १७ जुलै, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट ,महात्मा गांधी २ ऑक्टोबर,दिवाळी १ नोव्हेंबर, गुरूनानक जयंती नोव्हेंबर १५, नाताळ २५ डिसेंबर या दिवशी बंद राहणार आहे.