मुंबई (प्रतिनिधी) : श्री रेवा सेवा समन्वय समिती, भरूच (RSS Bharuch) आणि डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, वडोदरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबुद्ध नागरिक गोष्ठीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी पंच प्रणच्या आधारे समाजातील सज्जन शक्ती संघटित होऊन समाज परिवर्तनाकरीता कार्य करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले. तसेच आचरणातून समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, सज्जन शक्तीचे जाळे निर्माण करण्यासाठी विशेष प्रयोग केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
रा.स्व.संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी म्हणाले की, जगातील सर्वात प्राचीन संस्कृती व परंपरेचे आपण वाहक आहोत, समाजजीवनात वेळोवेळी येणाऱ्या दोषांमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडविण्याची आपली परंपरा राहिली आहे, पण त्या आधारे समाजातील सज्जन शक्ती जसे की अध्यात्म, शिक्षण, कला, उद्योग शक्ती. समाजातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन सुसंस्कृत होईल आणि त्यातूनच संपूर्ण समाज सुसंस्कृत होईल.
यावेळी सेवा, आरोग्य, पर्यावरण, कला, साहित्य, लेखन उद्योग, सामाजिक परिवर्तन या क्षेत्रात कार्यरत असलेले प्रबुद्ध नागरिक उपस्थित होते व उपस्थितांनी आपल्या प्रकल्पाबाबत आपले विचार व मते मांडली.