‘चला हवा येऊ द्या’ बंद होणार का? भारत गणेशपुरे स्पष्टपणेच म्हणाले...
09-Mar-2024
Total Views |
झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे देखील हिंदी कार्यक्रमात दिसत आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) बंद होणार अशा चर्चा आहेत. शिवाय कार्यक्रमाचे सुत्रसंचालक निलेश साबळे देखील दिसत नसल्यामुळे या चर्चा अधिकच वाढू लागल्या आहेत. आता ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) सुरु राहणार की बंद होणार याबद्दल अभिनेते आणि या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असणाऱ्या भारत गणेशपुरे यांनी महत्वपुर्ण माहिती दिली आहे.
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून निलेश साबळे बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके या दोघांचीही हिंदी रिअॅलिटी शोमध्ये दिसले. त्यामुळे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार की काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. याबद्दल गणेशपुरे यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ विषयी माहिती देत म्हटले, "सध्या तरी आम्ही सोशल मीडियावर या कार्यक्रमाविषयीच्या चर्चा ऐकत आहोत. पण, चॅनेलकडून आम्हाला अद्याप तरी असा कोणताही मेसेज आलेला नाही. चला हवा येऊ द्याचं मार्च महिन्यातील शुटिंगचं शेड्युल लागलेलं आहे. हे शेड्युल आम्हाला कळवण्यातही आलं आहे. त्यामुळे तसं या महिन्यात शुटिंग होईल. मात्र, हा कार्यक्रम बंद होणार असल्याचं अधिकृतरित्या तरी आम्हाला काही कळवण्यात आलेलं नाही," असं भारत गणेशपुरे म्हणाले.
त्यामुळे सध्या तरी प्रेक्षकांना हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. पण भविष्यात सुरु राहिल की नाही यासाठी वाहिनीकडून अधिकृत माहिती मिळाल्याशिवाय समजणार नाही हे देखील तितकेच खरे.